Events

डोंबिवली रोझ फेस्टिवल २०१८

About event: डोंबिवलीत भव्य राज्यस्तरीय गुलाब प्रदर्शन अगदी धकाधकीच्या जीवनाने त्रस्त झालेल्या समस्त डोंबिवलीकरांसाठी नवीन वर्षाच्या सुरवातीलाच एक गोड बातमी आहे. यंदाही डोंबिवलीकर मासिकाचे संपादक व नामदार रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून 3 आणि 4 फेब्रुवारीला रामनगर येथील बालभवन येथे डोंबिवली रोझ फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. गुलाबांच्या फुलांची नजाकत काही औरच असते. त्याचे मनमोहक रुप, आकर्षक रंग, ताजा टवटवीत डौलदारपणा आणि सर्वात महत्त्वाची त्याची अतुलनीय अशी रोमँटीक व्हॅल्यू अबालवृध्दांच्या मनाला नक्कीच साद घालते. इंडियन रोझ फेडरेशन ह्या अखिल भारतीय गुलाबप्रेमी संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील मोठमोठ्या गुलाब शेती करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना डोंबिवली रोझ फेस्टिवलमध्ये निमंत्रित करण्यात आले असून मुंबई, पुणे, वांगणी, पनवेल, शहापूर, नागपूर येथून प्रदर्शक सहभागी होणार आहेत. डोबिवली रोझ फेस्टिवलकरिता गौरवास्प्द गोष्ट म्हणजे ठाणे जिल्ह्यातील दोन प्रमुख गुलाब उत्पादक कल्याणचे डॉ. म्हसकर व वांगणीचे मोरे बंधू यांचा सहभाग प्रदर्शनात होत आहे. दोघांनीही गुलाब लागवडीत खरोखर पथदर्शक काम केलं आहे. डॉ.म्हसकर कल्याण डोंबिवलीतील प्रख्यात प्रसृतीतज्ज्ञ असून ते सच्चे गुलाबप्रेमी आहेत. त्यांच्या सरळगावच्या बागेत जवळपास 250 प्रकारचे फक्त गुलाब आहेत. डोंबिवली रोझ फेस्टिवलमध्ये सर्वसामान्य डोंबिवलीकरांना केवळ छानछान गुलाब पहायला मिळणार नाहीत तर त्यांच्या घराच्या बागेतील गुलाब प्रदर्शनात मांडता येणार आहेत. गुलाब प्रदर्शनाव्यतिरिक्त फेस्टिवलमध्ये आकर्षक पुष्परचना सजावट पण आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये गुलाब फुलाला केंद्र स्थानी ठेवून अन्य फुले वापरण्यात येणार आहेत स्थळ - बालभवन, डॉ. राव बंगल्यासमोर, रामनगर, डोंबिवली (पूर्व) शनिवार दि. 3 फेब्रुवारी 2018 आणि 4 फेब्रुवारी 2018 वेळ : सकाळी 10 ते रात्रौ 10 वाजेपर्यंत.

Organizer: नामदार रविंद्र चव्हाण, अध्यक्ष, डोंबिवलीकर रोझ सोसायटी
Date: 03 February, 2018 to 04 February, 2018
Time: 10:00AM

Contact person: सचिन बाबर (9769 646688) / मनोज पांडे (98196 22666) / राजन आभाळे ( 91677 91859 ) / भूषण पत्की ( 88791 28675 )

Venue:

नमो रमो नवरात्री
Organizer: ना. रविंद्र चव्हाण, राज्यमंत्री महाराष्ट्र
Date: 25 September, 2017 06:29PM
Time: 06:29PM
Venue: वै. ह. भ. प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल, घरडा सर्कल, डोंबिवली

नमो रमो नवरात्री

About event: नमो रमो नवरात्रौत्सवात आज आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत.. अत्याधुनिक साऊंड सिस्टीम सह दिमाखदार आणि आकर्षक रोषणाईमध्ये आपल्या सिंधुदुर्गातील सुप्रसिद्ध गोफ नृत्य बघायला आपण उत्सुक आहात ना !!! गोफ नृत्य व नवरात्रोत्सव याचे अजोड नाते आहे.गुजरात व राजस्थान या राज्यांमध्ये हा खेळ प्रामुख्याने खेळला जातो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील प्राथमिक शाळा हिर्लोक गेली ३ वर्षे ठिकठिकाणी हा खेळ सादर करत आहे तर मग डोंबिवलीतील भव्य दांडिया जल्लोषात सर्वांनी नक्की सामील व्हा. स्वागतोत्सुक: रविंद्र चव्हाण

Chief Guest: मराठी सिनेतारका व कलाकार व समस्त पदाधिकारी

Organizer: ना. रविंद्र चव्हाण, राज्यमंत्री महाराष्ट्र
Date: 24 September, 2017 06:30PM
Time: 06:30PM
Venue: ठिकाण : वै. ह. भ. प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल, घरडा सर्कल, डोंबिवली (पूर्व)

नमो रमो नवरात्री

About event: आग्रहाचे निमंत्रण.. सांस्कृतिक शहर मानल्या जाणाऱ्या आपल्या डोंबिवली शहराची शान वाढवण्यासाठी नवरात्रीच्या मंगल समयी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व डोंबिवलीकरांनी या आनंदमयी उत्सवात अधिक भर घालण्यासाठी उपस्थित रहावे ही विनंती.

Organizer: नामदार रविंद्र चव्हाण, भारतीय जनता पार्टी
Date: 21 September, 2017 to 30 September, 2017
Time: 11:04AM
Venue: ठिकाण : वै. ह. भ. प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल, घरडा सर्कल, डोंबिवली (पूर्व)

Bhagyodar Health Membership Card Launch

Chief Guest: नामदार रविंद्र चव्हाण, भारतीय जनता पार्टी

Organizer: Bhagyoday Nediservices Pvt. Ltd.
Date: 20 September, 2017 05:00PM
Time: 05:00PM
Venue: Brahman Sabha, Dombivli (East)