वैद्यकीय शिक्षण विभाग

कार्यासन

आयु 1 / 2

शैक्षणिक वर्ष 2016-17 चे आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांचे प्रवेश केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे एक खिडकी पध्दतीनुसार करण्यात आले.

शासकीय आयुर्वेद रुग्णालय, नांदेड येथे सशुल्क पंचकर्म विभाग सुरु करण्यात आला

राज्य आयुष सोसायटीची स्थापना व नोंदणीकरण करण्यात आले.

जळगाव येथे "शासकीय एकात्मिक वैद्यकीय शैक्षणिक संकुल ( Medical Hub )" स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली.

आरोग्यमहाशिबीर

  • नाशिकयेथे "आरोग्यमहाशिबीर" आयोजितकरण्यातआले.
  • नंदुरबारयेथे "महाआरोग्यशिबीर" आयोजितकरण्यातआले.

"रज:कालस्वास्थ्यनियोजनसप्ताह" आयोजन

राज्यशासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागा मार्फत दिनांक 21 जुन 2017 रोजी आंतरराष्ट्रीय योगदिननिमित्त "मध्यवर्तीकार्यक्रम" भव्यस्वरुपात आयोजित करण्यात येत आहे.

राज्यामध्ये अवयवदान जनजागृती करण्यात आली

आयुषसंचालनालयाच्या अधिपत्या खालील सर्व आयुर्वेद महाविद्यालयांमध्ये एप्रिल ते जून  2017 या महीन्याच्या प्रत्येकी १ ते ७ तारखेच्या कालावधीमध्ये महाविद्यालयीन स्तरावर "राष्ट्रीय मधुमेह अभियान" राबविण्यातआलेले आहे.

१०

शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात तात्पुरत्या नियुक्तीने कार्यरत असलेल्या २४ सहाय्यक प्राध्यापकांना शासकीय सेवेत नियमित करण्यात आले.

११

वैद्यकीयअधिकाऱ्यांना सुधारीत दराने व्यवसायरोध भत्ता मंजूर करण्यात आला.

१२

खाजगीशासन अनुदानित आयुर्वेद व युनानी संस्थेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शासनाने शासननिर्णयदि. 10-08-2016 अन्वये सेवानिवृत्तीवेतन व उपदान योजना मंजूर करुन लागू केलीआहे.

१३

खाजगी शासन अनुदानित आयुर्वेद व युनानी संस्थेतील शिक्षक पदांची भरती प्रक्रिया शासनामार्फत स्वतंत्र निवड मंडळामार्फत करण्यास मंत्रीमंडळाने नुकतीच मंजूरी दिली आहे.

१४

शासकीय व खाजगी शासन अनुदानितआयुर्वेद व युनानी महाविद्यालयातील अध्यापकांचे पी. जी. अर्हते बाबत शासनाने उचित निर्णय घेतल्याने त्यांचे मान्यतेचे व वाढीव ग्रेड पे , नामाभिधानासह मंजूरीचे लाभ अदा करण्यास सुलभ झाले आहे.

15

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या प्रशासन नियंत्रणाखालील आयुष संचालनालय व त्यांच्या अधिपत्याखालील विभागप्रमुख, प्रादेशिक कार्यालय प्रमुख, कार्यालय प्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या क्षेत्रिय अधिकाऱ्यांना वाढीव वित्तिय अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.

कार्यासन

प्रशा 1

16

राज्य मंत्रीमंडळाच्या दिनांक 4.10.2016 च्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार केंद्र शासनाच्या कुटुंब व आरोग्य कल्याण विभागाच्या मार्फत बाराव्या पंचवार्षिक योजना कालावधीत (2012-17) मध्ये National Program for Prevention and Control of Cancer, Diabetes, CVD & Stroke(NPCDCS) या कार्यक्रमांतर्गत या विभागाच्या नियंत्रणाखालील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालय, औरंगाबाद या संस्थेस शासन निर्णय, क्रमांक : राकसं-2016/प्र.क्र.424/प्रशा-1,  दिनांक :  15 ऑक्टोबर, 2016 अन्वये राज्य कर्करोग संस्थेचा (State Cancer Institute ) दर्जा प्रदान करण्यात आला आहे. सदर केंद्र पुरस्कृत कार्यक्रमांतर्गत “राज्य कर्करोग संस्था”स्थापन करण्यासाठी रु.120 कोटीचा प्रस्ताव असून केंद्र व राज्य हिश्श्याचे 60:40 असे प्रमाण आहे. त्यापैकी राज्य हिश्याचे रुपये 48.00 कोटी इतक्या वित्तीय दायित्वासही उक्त शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.  याविषयी   केंद्र शासनाने त्यांच्या  हिश्श्यामधून 1 ला हप्ता म्हणून रु.34,30,70,000/- व 4,06,90,000/- असे एकूण रु.38,37,60,000/- इतकी रक्कम बांधकाम व यंत्रसामुग्री खरेदीकरीता उपलब्ध  करुन दिलेले आहे.  सदरहू रक्कम अर्थसंकल्पीत करुन घेण्याकरीता लेखाशीर्ष व नवीन सीआरसी कोड घेण्याची कार्यवाही सुरु आहे.

कार्यासन

अधिनियम

17

अवयवदान जनजागृती करण्यासाठी महा अवयवदान अभियान राबविण्याबाबत दिनांक 04.08.2016 रोजी मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला.त्याअनुषंगाने दिनांक 06.08.2016 रोजीच्या शासन निर्णयानुसार दिनांक 30.08.2016 ते 01.09.2016 रोजी महा अवयवदान अभियान राबविण्यात आला.

18

महाराष्ट्र परावैद्यक परिषद विधेयक, 2011 मध्ये सुधारणा करणेबाबत दिनांक 29.11.2016 रोजी मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला. तसेच दिनांक 01.07.2017 रोजी महाराष्ट्र परावैद्यक परिषद अधिनियम, 2011 व महाराष्ट्र परावैद्यक परिषद (सुधारणा) अधिनियम, 2017 अंमलात आले आहेत.

19

पंडित दीनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियान अंतर्गत राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये पथदर्शी आरोग्य पूर्व तपासणी मोहीम दिनांक 01 मे 2017 ते 27 मे, 2017 दरम्यान राबविण्यात आली.

20

महाराष्ट्र ॲक्यूपंक्चर चिकित्सा पध्दती अधिनियम, 2015 दिनांक 01.07.2017 रोजी अंमलात आला आहे.

21

वैद्यकीय क्षेत्रातील कट प्रॅक्टीस विरोधात कायद्याचा मसुदा तयार करण्याकरिता दिनांक 28.07.2017 रोजीच्या शासन निर्णयान्वये श्री. प्रवीण दिक्षित, निवृत्त पोलीस महासंचालक, यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली.

कार्यासन

शिक्षण 1

22

जळगांवयेथेवैद्यकीय, दंत, आयुर्वेद, होमिओपॅथी व भौतिकोपचार महाविद्यालयांची निर्मिती करुन “शासकीय एकात्मिकवैद्यकीयशैक्षणिक संकुल (Medical Hub) ” सुरु करण्याबाबतच्या प्रस्तावाला दिनांक 25.4.2017 रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.    सदर  संकुलामध्ये 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, 50 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय दंत महाविद्यालय, 50 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय आणि 40 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय भौतिकोपचार महाविद्यालय सुरु करण्यास शासनाने दि. 11.05.2017 च्या शासन निर्णयान्वये मान्यता प्रदान केली आहे.

 

 

 

कार्यासन

शिक्षण 2

23

एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमाच्या 15 टक्के अखिल भारतीय स्तरावरील (All India Quota) शिल्लक राहिलेल्या व राज्य शासनास प्रत्यार्पित करण्यात येणाऱ्या जागांवरील प्रवेश हे राज्यातील स्थानिक उमेदवारांमधून करण्याचा निर्णय (शासन निर्णय दिनांक 31.07.2017).

24

सन 2016-17 चे वैद्यकीय अभ्यासक्रमाचे अभिमत विद्यापीठातील प्रवेश हे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष यांचेमार्फत करण्याचा निर्णय (शासन निर्णय दिनांक 20.08.2016).

सन 2017-18 पासून अभिमत विद्यापीठातील प्रवेश हे अखिल भारतीय स्तरावरुन केंद्र शासनामार्फत करण्यात येत आहेत.

25

खाजगी विनाअनुदानित महाविद्यालयातील वैद्यकीय व दंत पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या एकूण 67.5 टक्के जागा हया राज्यातील स्थानिक उमेदवारांमधून (Domiciled) भरण्याचा निर्णय(शासन निर्णय दिनांक 27.04.2017).

सदर निर्णयास मा.उच्च न्यायालयाने अंतरीम आदेशाद्वारे स्थगिती दिली आहे.

26

एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमाच्या संस्थात्मक कोटयातील प्रवेशसुध्दा राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष यांचेमार्फत भरण्याचा निर्णय (शासन निर्णय दिनांक 19.06.2017).

27

एम.बी.बी.एस./ बी.डी.एस. अभ्यासक्रमांप्रमाणेच राज्यातील आरोग्य विज्ञानाचे सर्व पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश हे नीट (NEET)या एकाच सामाईक प्रवेश परिक्षेद्वारे करण्याचा निर्णय (शासन निर्णय दिनांक 01.12.2016).

28

राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती येाजना/ पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना लागू करण्याचा निर्णय. यामध्ये सदर प्रतिपूर्ती शासकीय महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना देखील लागू.

(शासन निर्णय दिनांक 09.12.2016).

29

नक्षलग्रस्त आणि आदिवासी क्षेत्रामध्ये NGO मार्फत चालविण्यात येणाऱ्या आरोग्य केंद्रातील सेवा ही बंधपत्रित सेवा म्हणून ग्राहय धरण्यास मान्यता (शासन निर्णय दिनांक 25.10.2016).

कार्यासन

वैसेवा 4

30

दिनांक  20 जून 2017 रोजीमा.मंत्रीमंडळाच्या झालेल्या बैठकीत मान्यता दिल्यानुसार शासकीय दंत व वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कार्यरत असलेल्या व पदव्युत्तर पदवी धारण केलेल्या  7 दंतशल्यचिकित्सकांची सेवा शासन निर्णय दिनांक 21 जूलै 2017  नुसार सहायक प्राध्यापक पदावर समायोजित  करण्यात आली आहे.

31

दिनांक  18 जूलै 2017  रोजी मा. मंत्री मंडळाच्या झालेल्या बैठकीत मान्यता दिल्यानुसार वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अधिनस्तदंत व दंत शास्त्र विषयाशी संबंधित गट-अवगट-ब मधील पदे महाराष्ट्र लोक सेवा आयोगाच्या कार्यकक्षेतून वगळून ती स्वतंत्र निवड मंडळामार्फत भरण्यास शासन निर्णय दिनांक 29 जूलै 2017 नुसार निर्णय घेण्यात आला आहे.

32

दिनांक  7 जून 2017 रोजी मा. मंत्री मंडळाच्या झालेल्या बैठकीत मान्यता दिल्यानुसार शासकीय दंत महाविद्यालयातील व रुग्णालयातील तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील दंत शास्त्र विभागात तात्पुरत्या नियुक्तीने कार्यरत  17 सहायक प्राध्यापक व दंतशल्यचिकित्सक यांच्या सेवाशासन निर्णय दिनांक 15 जून 2017 नुसार नियमित करण्यात आल्या आहेत.

कार्यासन

वैसेवा 2

32

मा.मंत्रिमंडळाच्या दि.15/12/2016 रोजीच्या बैठकीतील निर्णयानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सरळसेवेन भरावयाची प्राध्यपक (गट- अ) व सहयोगी प्राध्यापक (गट-अ) ही पदे कायमस्वरुपी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेतून वगळणे.(शासन निर्णय दि.09/02/2017)

कार्यासन

औषधे 1

33

हाफकीन संस्था आणि हाफकीन महामंडळ यांचे संशोधन, सेवा, तंत्रज्ञान आणि उत्पादन यात सुधारणा करण्यासाठी आणि संस्थाच्या कामकाजाचा आढावा घेऊन त्यांचा दर्जा उन्नत करण्याच्या अनुषंगाने आराखडा तयार करण्यासाठी आंतराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय तज्ञ समिती स्थापना दि.06 जून, 2017 अन्वये करण्यात आली आहे. समितीने कामकाज सुरु केले आहे.

कार्यासन

वैसेवा 3

34

राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये तसेच आयुर्वेद महाविद्यालये व रुग्णालये यांच्या आस्थापनेवर विभागीय निवडमंडळ पुरस्कृत उमेदवार म्हणून तात्पुरत्या नियुक्तीने कार्यरत असलेल्या 210 उमेदवारांच्या सेवा दि.24.10.2016 पासून नियमीत करण्यात आल्या आहेत.

कार्यासन

प्रशा 2

35

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या नियंत्रणाखालील शासकीय वैद्यकीय / आयुर्वेद / दंत महाविद्यालये येथे सफाईगार व सुरक्षारक्षक अशा House Keeping च्या, कंत्राटदार / संस्थेकडून नेमल्या जाणाऱ्या, सामान्यरित्या पदांच्या सेवा बाह्यस्त्रोतांमार्फत घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

36

शासकीय वैद्यकीय/दंत महाविद्यालये व संलग्नित रूग्णालयांमधील डॉक्टरांच्या सुरक्षेसंदर्भात सल्लागार समिती गठित करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

37

शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि संलग्नित रूग्णालयांच्या सुरक्षेकरिता महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून सुरक्षारक्षक घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

 

38

यानुषंगाने राज्यातील 14 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयांकरिता 1100 सुरक्षा रक्षक टप्प्याटप्प्याने नियुक्त करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. यासाठी रू.33.77 कोटी खर्च अपेक्षित आहे.

39

शासकीय वैद्यकीय / दंत / आयुर्वेद महाविद्यालये व त्यास संलग्नित रूग्णालये, प्रशिक्षण / आरोग्य पथके इत्यादींकरीता यंत्रसामुग्री, औषधे व शल्योपचार सामुग्री व तत्सम बाबीं खरेदी करण्यासाठी राज्यस्तरीय खरेदी समितीच्या संरचना सुधारित करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

40

शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि संलग्नीत रूग्णालयांच्या सुरक्षेकरिता महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून घेण्यात येणाऱ्या सुरक्षा रक्षकांच्या मेहनताना अदा करण्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद होईपर्यंत सदरचा खर्च स्वीय प्रपंजी (PLA)खात्यामधून करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

41

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा / सुविधाकरिता सामाजिक जबाबदारी अंतर्गत (CSR)सहाय्य प्राप्त करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

सामाजीक दायीत्व अंतर्गत (सी.एस.आर.), दानशूर व्यक्ती, संस्था, बँका, कंपन्या व इतरांच्या माध्यमातून मिळणाऱ्या देणग्या काही अटींच्या अधीन राहून स्विकारण्याचे अधिकार यथास्थिती संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन आणि संचालक, आयुष संचालनालय यांना देण्यात आले आहेत.

42

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संलग्नित रूग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांना मदत करण्यासाठी रूग्‍ण मित्र योजना राबविण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यासाठी समिती गठीत करणेबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

43

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागास प्रशासकीय आणि वित्तीय अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्यासंदर्भात अभ्यास करून उचित प्रस्ताव सादर करण्याकरिता समिती गठीत करणेबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

44

शासकीय वैद्यकीय / दंत महाविद्यालययांशी संलग्नित रूग्णालयातील मोफत वैद्यकीय सेवांसाठी लाभार्थी निश्चित करणेबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयानुसार शासकीय वैद्यकीय / दंत महाविद्यालय संलग्नीत रूग्णालयांकडून दिल्या जाणाऱ्या मोफत सुविधांचा लाभ देण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांच्या व्याप्तीमध्ये वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे.