अनेक वर्षांपासूनचे समस्त डोंबिवलीकरांचे व माझे स्वप्न काल साकार झाले.
शालेय शिक्षणासोबत वेदांचे अध्ययन, संस्कृत पठण तसेच याज्ञिकीचे शिक्षण देणारे केंद्र आपल्या डोंबिवली शहरात असावे,
भारतीय वेदसंस्कृती आपल्या डोंबिवली परिसरातील पुढच्या पिढीत रुजावी म्हणून
वेदपाठशाळा सुरू करण्याचा मानस अनेक वर्षांपासून विद्यमान महासंघाच्या विचाराधीन होता.
आता आम्ही `डोंबिवलीकर प्रतिष्ठान’च्या माध्यमातून वेदपाठशाळेसाठी
सुसज्ज वास्तू उपलब्ध करून दिल्यामुळे वेदपाठशाळेचे स्वप्न आता प्रत्यक्षात साकार झाले आहे.
आपल्या भारतीय संस्कृतीचं प्रतिक आपल्या डोंबिवलीसारख्या सांस्कृतिक शहरात उभारले जाणं हे ईश्वरी संकेतच आहे.
ब्राह्मण महासंघ, डोंबिवली संचालित सदर वेदपाठशाळेची वास्तू सुपुर्द करण्यासाठी आयोजित केलेल्या समारंभास लक्षणीय उपस्थितीवरून सर्वांना झालेला हा आनंद उत्स्फूर्तपणे दिसत होता.
तसेच
अजून एक जिव्हाळ्याचा विषय म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि डोंबिवलीकर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने संचालित …आपलं घर
डोंबिवली सांस्कृतिक नगरी आहे, सुशिक्षित लोकांचं माहेरघर तरीही असे अनेक जेष्ठ नागरिक आहेत की जे आर्थिक व कौटुंबिक परिस्थितीमुळे परावलंबी जीवन जगत आहेत. त्यांना हक्काची वास्तू देण्याचं आम्ही ठरवलं आहे. ज्या ठिकाणी 50 सुसज्ज बेडस्ची व्यवस्था असेल. जेष्ठ नागरिकांना विरंगुळा म्हणून ऍक्टिव्हिटी रूम असेल. ज्यामध्ये वाचन, संगीत, बैठे खेळ किंवा स्वत:चे छंद जोपासण्यासाठी व्यवस्था असेल. उतार वयात होणाऱ्या आरोग्य समस्या लक्षात घेऊन एक रुग्णसेवेची वेगळी सुसज्ज खोली निर्माण करण्यात येणार आहे. वैद्यकीय तपासणी, नर्सिंग याबरोबरच वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक व्यक्ती आणि संस्थांचा आवर्जून सहभाग असलेले कार्यक्रम आयोजित केले जातील. जेणेकरून जेष्ठ नागरिकांना
आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात आपलं कोणीतरी आहे ही भावना मानसिक बळ देईलच पण नव्यानं जगण्याची ऊर्जाही देईल…..
आपलं घर या संकल्पनेला आपला सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग असणार हा सर्वांच्या साक्षीने एक आत्मविश्वास निर्माण झाला…सर्व मान्यवरांचे व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार !
Leave Your Comment