महावितरण तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या काही प्रलंबित कामांचा परिणाम नागरिकांना सोसावा लागत असून यामुळे शासनाबद्दलची चुकीची प्रतिभा सर्वसामान्यांमध्ये पोहोचत आहे. पालघर जिल्ह्य़ात पुरेशा प्रमाणात रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) ठेवण्यात यावेत तसेच बिघाड झाल्यास दोन दिवसांमध्ये ट्रान्सफॉर्मर बदलण्याची व्यवस्था करण्यात यावी असे निर्देश महावितरणच्या मुख्य अभियंता यांना देण्यात आले.