भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर कोण? असं म्हटलं, तर डॉ. आनंदीबाई जोशी हे नाव आपसूकच आपल्या मुखातून येतं. ज्यावेळी महिलांना प्राथमिक शिक्षण घेण्यासाठीही संघर्ष करावा लागत होता त्यावेळी आनंदीबाईंनी थेट वैद्यकशास्त्राचा अभ्यास करून डॉक्टर होण्याचा बहुमान मिळवला. महिलांच्या उद्धारासाठी त्यांनी उचललेलं हे क्रांतिकारी पाऊल आज वैद्यकशास्त्रच नाही तर विविध क्षेत्रात महिलांना कार्य करण्यासाठी बळ देत आहे. ‘आता माझी पाळी’ या उपक्रमाची सुरुवात आनंदीबाईंच्या नावाप्रमाणेच आनंदी व्हावी, हाच यामागचा हेतू आहे. मासिक पाळीचा स्वीकार महिलांसह पुरुषांनीही करावा आणि तितक्याच आनंदात त्याचा प्रचार व प्रसार करावा, हेच ‘आता माझी पाळी’चे ध्येय आहे. महिलांच्या आरोग्यासाठी तळमळीने सातासमुद्रापार जाणाऱ्या आनंदीबाईंसारखं सर्व महिलांनी आता या कोशातून बाहेर यायला हवं आणि हक्काने म्हणावं… “आता माझी पाळी!” नोंदणीसाठी शेजारील ‘आनंदी फॉर्म’ भरा.