आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या दूरदर्शी आणि यशस्वी नेतृत्वात अवघ्या १० वर्षांत आपल्या देशाने ‘Trust Deficit’ कडून ‘Trust Surplus’ च्या दिशेने वाटचाल केली.
२०४७ पर्यंत विकसित भारत घडविण्याचं स्वप्न
सत्यात उतरत आहे.
भारतीय जनसंघ ते आजचा भारतीय जनता पक्ष परिवार
या प्रवासात भारतमाता हेच आराध्य दैवत मानून राष्ट्रसेवा, हिंदू जागृती यासोबतच समाजातील शेवटच्या व्यक्तीला विकासाच्या प्रवाहात समाविष्ट करून घेण्यासाठी भारतीय जनता पक्ष सदैव कटिबद्ध आहे.
गेल्या २५ वर्षांपासून राष्ट्रहित, जनहित आणि हिंदुहित या त्रिसूत्रीतून घडलेल्या मार्गावर; राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पक्ष परिवारातील थोरामोठ्यांचे वेळोवेळी लाभलेले मोलाचे मार्गदर्शन, कार्यकर्त्यांची अतूट साथ आणि मायबाप जनतेचे आशीर्वाद हीच शिदोरी सोबत घेऊन वाटचाल सुरू आहे.
हाती घेतलेला प्रत्येक संकल्प सिद्धीस नेणे हाच भारतीय जनता पार्टीचा गुणधर्म आहे. राष्ट्रीय विचारधारेच्या पायावर उभ्या असलेल्या; अंत्योदयाच्या मार्गावर वाटचाल करणाऱ्या भारतीय जनता पार्टी परिवारातील सदस्य असल्याचा सार्थ अभिमान आहे.
राष्ट्रीय विचारधारेच्या वैचारिक नाळेने जोडलेली सांस्कृतिक डोंबिवली नगरी... एखादी आई जसे आपल्या मुलांवर संस्कार करते, तसंच या शहराने मला प्रेम दिलं, माझ्यावर संस्कार केले, मायेनं वाढवलं, वेळप्रसंगी पाठीवर शाबासकीची थाप दिली, जर कधी चुकलोच तर कानही पकडले, शेवटी ती आईच… त्यामुळे आईसारखं प्रेम करणारं हे शहर माझं कुटुंब आहे.
माझी डोंबिवली