ध्यास माझा जनकल्याणासाठी..

आ. रविंद्र चव्हाण साहेब

Political Journey Was
“Started in 2002”

समाजकारण जाहीरपणे रस्त्यावर आणि राजकारण मुत्सद्दीपणे चार भिंतीत केले पाहिजे असा सर्वसाधारण नियम आहे. पण या नियमाला सन्माननीय अपवाद असतात. समाजकारणाची जाहीर वाच्यता करायची नाही. कारण ते दाखवण्यासाठी करण्यापेक्षा कर्तव्य म्हणून करायचं आणि राजकारणात देश व पक्षनिष्ठ राहून कार्यकर्ता म्हणून दिलेली जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर उचलायची व “न्यूज सायकल” मध्ये न अडकता कर्तव्यकठोरपणे पार पाडायची.

Awesome Image
Awesome Image

सार्वजनिक बांधकाम

सार्वजनिक बांधकाम

(सार्वजनिक उपक्रम वगळून)

Awesome Image

पालकमंत्री, सिंधुदुर्ग

पालकमंत्री, सिंधुदुर्ग

Awesome Image

पालकमंत्री, पालघर

पालकमंत्री, पालघर

Awesome Image
ध्यास माझा जनकल्याणासाठी..

असा मी

राजकीय क्षेत्रात कार्यरत राहून आता २० वर्षे झाली. मी स्वतःला भाग्यवान समजतो की हिंदुत्ववादी भारतीयत्व हेच राष्ट्रीयत्व या विचारधारेचा अनुयायी होण्यासाठी नियतीने माझीच निवड केली. देशहित व पक्षादेश शिरसावंद्य मानून जी कामगिरी सोपवली ती कर्तव्य कठोरपणे पूर्ण करण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. जनसंपर्कात राहून काम करणं….. विशेषतः समाजातील विविध लोकांशी सतत संपर्क ठेवून विशेषतः तरुण मुलं-मुलींशी संवाद साधत असताना त्यांचे वेगळे विचार, भन्नाट कल्पना आणि अत्यंत फ्रेश असा दृष्टिकोन पाहताना आपल्यातही एक ऊर्जा उत्पन्न होते. त्याचबरोबर जेष्ठांच्या पावलावर पाऊल टाकत जमिनीवर घट्ट पाय रोवून कार्य करण्याची प्रेरणा मिळत असते. आपण जेव्हा समाजात वावरत असतो त्यावेळी मिळणारी अनुभव संपन्नता, ज्ञान आणि महत्वाचं म्हणजे लोकांचं प्रेम व त्यांचा विश्वास शब्दांत मांडू शकतच नाही. भारतीय जनता पार्टीचा एक सामान्य कार्यकर्ता ते महाराष्ट्राचा मंत्री या प्रवासात कल्याण डोंबिवली शहरं, ठाणे जिल्हा आणि आता एकूणच महाराष्ट्र राज्याच्या विविध विकास योजनांचा एक घटक, साक्षीदार असा राजकीय प्रवास झाला आहे आणि याबाबत मनापासून समाधान आहे. पायाभूत सुविधा, पर्यावरण, वीज, पाणी, वाहतूक, शिक्षण, संस्कृती अशा अनेक विषयांवर काम करताना स्वतःची क्षमता तपासता आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विचारसरणीच्या भक्कम पायावर व भारतीयत्व संकल्पनेला मानणाऱ्या थोरामोठ्यांचे मार्गदर्शन तसेच पराकोटीचे वैचारिक मतभेद असणाऱ्या सर्वांशीच सलोख्याचे नाते निर्माण झाले.

Awesome Image
2002

स्वा. सावरकरांशी भावबंध

मी कट्टर सावरकर भक्त आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं ध्येयवादी नेतृत्व अजरामर आणि अतुलनीय आहे. “”की घेतले न व्रत हे आम्ही अंधतेने लब्ध-प्रकाश-इतिहास-निसर्गमाने जे दिव्यदाहक म्हणोनी असावयाचे बुद्ध्याची वाण धरले करी हे सतीचे'” म्हणत स्वातंत्र्य संग्रामात आयुष्याची आहुती देणाऱ्या या सूर्याला ब्रिटिश साम्राज्य निस्तेज करू शकले नाही, तो निष्फळ प्रयत्न मणी शंकर अय्यर याने केला. अंदमान सेल्युलर जेलमध्ये सावरकरांच्या कवितेची कोनशीला हटवण्याचा अत्यंत घृणास्पद प्रकार त्याने केला. स्मारक हटवून विचार कधीच पुसता येत नाहीत हे त्याला दाखवून द्यावे आणि सावरकरांच्या विचारांची ज्योत आपल्या मनात सतत तेवत राहावी म्हणूनच २८ मे २०१४ रोजी डोंबिवलीत अखंड सावरकर ज्योत पेटवावी हा संकल्प केला आणि अंमलात आणला. माझ्या लोकप्रतिनिधीपदाची सुरुवात सावरकर या नावापासून सुरू झाली आहे. २००५ साली सावरकर रोड प्रभागातून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून प्रथम निवडून आलो. सावरकर रोडवर सावरकर उद्यानात माझं कार्यालय सुरू झालं आणि सावरकरांच्या विचारांचा प्रखर अग्नी २४ तास ७ दिवस अहोरात्र गेले ८ वर्षे सुरू आहे या मागेही ध्येयासक्ती आहेच. सावरकरांचे विचार ह्या ज्योतीच्या द्वारे समाजात दिपस्तंभाप्रमाणे दिशादर्शक ठरावे.

Awesome Image
2005

सिद्धहस्त लेखक मार्क ट्वेन

सिद्धहस्त लेखक मार्क ट्वेनचे एक अजरामर वाक्य इतिहास बनले आहे. तो म्हणतो “सत्य हे कल्पनेहून सुरस असतं”. तळ कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पेंडूर गावात जन्म झाल्यावर कालांतराने आई वडिलांच्या सोबत डोंबिवलीत वास्तव्याला आलो. डोंबिवलीतील सुशिक्षित, सुसंस्कृत आणि शांतताप्रिय लोकांचा सहवास लाभला आणि मुख्यतः रा.स्व. संघ आणि भाजपाचे भारतीयत्वाचे देशभक्त संस्कार झाले. राजकीय स्वार्थापेक्षा देशहित प्रिय असलेली विचारसरणी नसानसात भिनली आणि देश प्रथम…नंतर पक्ष… स्वतः शेवटी…. ही आयुष्याला कलाटणी देणारी भाजपाची विचारधारा मनावर बिंबवली गेली.

Awesome Image
2007

२००२ साली भारतीय जनता युवा मोर्चाच्या कल्याण उपजिल्हाध्यक्षपदावर नेमणूक झाली. २००५ साली नगरसेवक म्हणून निवडून आलो, २००७ साली कल्याण डोंबिवली महानगरपालिका स्थायी समिती सभापतीपद मिळाले. नगरसेवक पदावर कार्यरत असतानाच २००९ साली डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचा पहिला आमदार होण्याचा मान मिळाला. २०१४ व त्यानंतर २०१९ साली झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत कोकण पट्ट्यातील सर्वाधिक मताधिक्य मिळवून देऊन डोंबिवलीकरांनी सलग तिसऱ्यांदा विश्वास व्यक्त केला. दरम्यान, २०१६ साली महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून शपथ घेऊन महाराष्ट्र सरकारच्या ४ खात्यांची जबाबदारी सांभाळली होती. बंदरे, माहिती व तंत्रज्ञान, वैद्यकीय शिक्षण तसेच अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण या खात्याचा राज्यमंत्री म्हणून महाराष्ट्र सरकारमध्ये कार्यरत होतो.

Awesome Image
2020

दोन वर्षांपूर्वी, २०२० साली भारतीय जनता पार्टीने फार मोठी जबाबदारी खांद्यावर टाकली. भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री म्हणून नेमणूक केली. कौटुंबिक राजकीय वारसा नसलेल्या कार्यकर्त्याला हे पद अन्य कुठल्याही पदापेक्षा अमूल्य असेच आहे. विचारधारेवर निष्ठा असणाऱ्या डोंबिवलीचा व डोंबिवलीकरांचाच हा सन्मान समजून ध्येयाने झपटल्याप्रमाणे कार्यरत राहिलो. शिंदे फडणवीस मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्यावर कामाची पोचपावती म्हणून की काय पक्षाने विश्वासाने कॅबिनेट मंत्रिपद दिले आणि महत्वाचे, जवाबदारीचे असे सार्वजनिक बांधकाम खाते मला देण्यात आले. ह्या बरोबरच अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण खात्याची पण जवाबदारी देण्यात आली. याशिवाय पालघर आणि सिंधुदुर्ग अशा दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी पण देण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर १८-२० वर्षांमध्ये भाजपा कार्यकर्ता म्हणून काम करायला सुरुवात केली तेव्हा लोकांना काय समस्या आहेत त्या मी स्वतःही अनुभवत होतो. डोंबिवलीत तर नागरी समस्यांचं न संपणारं दुष्टचक्र होतं. आजही ते संपलं नाही. पण केवळ भाजपाचे मतदार म्हणून या आधीचे शासनकर्ते आपल्या शहराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत होते. ते त्यांनी थांबवलं. डोंबिवलीकरांच्या हक्कासाठी संघर्ष केला प्रसंगी कोर्टात खेचले. केडीएमसी, एमआयडीसी, एमएमआरडीए, मध्य रेल्वे, महावितरण यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य व केंद्र शासकीय खाती यांच्याविरोधात जन आंदोलन उभारलं. डोंबिवलीतलं लोड शेडींग रद्द करण्यासाठी महाराष्ट्र वीज नियामक आयोगात दाद मागणारा मी महाराष्ट्रातील एकमेव आमदार ठरलो. आणि माझ्याच पाठपुराव्याने महाराष्ट्रातील सर्वात पहिले लीडशेडींग मुक्त शहर डोंबिवलीच झाले. डोंबिवली महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी… डोंबिवलीकर मासिकाच्या माध्यमातून साहित्य सेवा सुरु आहे. मासिक गेले 13 वर्षे वाचकांच्या प्रथम पसंतीचे ठरलेले आहे. सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकाचा सलग 12 वर्षे पुरस्कार मिळवत आहे. डोंबिवलीकर कॅलेंडर हा उपक्रम विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या डोंबिवलीकरांना प्रकाशझोतात आणत आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने “सबका साथ सबका विकास” हेच विकासाचे धोरण ठेऊन प्रगतीची घोडदौड सुरू केली. आता महाराष्ट्रात लोकांनी कौल दिलेल्या नैसर्गिक मित्रपक्षांचे शिवसेना भाजपा युतीचे सरकार सत्तेत आलेले आहे. मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात दमदार सरकार पुन्हा एकदा महाराष्ट्राला प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी सज्ज झाले आहे.

Awesome Image
2022

डोंबिवलीकरांच्या हक्कासाठी संघर्ष केला प्रसंगी कोर्टात खेचले. केडीएमसी, एमआयडीसी, एमएमआरडीए, मध्य रेल्वे, महावितरण यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य व केंद्र शासकीय खाती यांच्याविरोधात जन आंदोलन उभारलं. २०१४ साली माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने “साफ नियत सही विकास” हेच विकासाचे धोरण ठेऊन प्रगतीची घोडदौड सुरू केली त्याचप्रमाणे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे आपले सरकार स्थापन झाल्यापासून प्रगतीच्या प्रक्रियेने वेग पकडला आहे.

विश्वास हीच पुण्याई

लोकप्रतिनिधी पाठपुरावा आणि अथक काम करण्याची ऊर्जा यासाठी वचनबद्ध असला पाहिजे या मताचे मी आहे. सकारात्मकतेने काम करताना चूका होणे, आश्वासनांची पूर्तता होण्यास विलंब होणे अशा नकारात्मक गोष्टीही घडणारच. पण गणितातदेखील मायनस मायनस प्लस होतं अगदी तसंच नकारात्मकता एकत्र करून सकारात्मक पध्दतीने काम करावं हीच शैली मी आत्मसात केलेली आहे. सकारात्मकतेने सतत काम करत राहिल्यानेच लोक विश्वास ठेवतात. त्या विश्वासास पात्र ठरण्यासाठी जे परिश्रम, कष्ट आणि प्रामाणिकपणाने कर्म करावे लागेल ते करण्याची माझी सदैव तयारी असते.