“अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा’
२१ ऑक्टोबर १९५१ रोजी दिल्लीमध्ये श्रद्धेय डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी आणि श्रद्धेय पं. दीनदयाळ उपाध्याय यांनी भारतीय जनसंघ स्थापन केला. यावेळी श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी हे संस्थापक सदस्य होते.
पहिल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनसंघाने लढवलेल्या एकूण ९४ जागांपैकी केवळ ३ जागांवर जनसंघाचा विजय झाला.
कलम ३७० अन्वये काश्मीर राज्याला वेगळा दर्जा देण्याच्या विरोधात श्रद्धेय डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या नेतृत्वात आंदोलनाला सुरूवात झाली. हे आंदोलन दडपण्यासाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना काश्मीरमध्ये कारावास ठोठावण्यात आला आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला.
गोवा राज्याला पोर्तुगीजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी उभारण्यात येणारी चळवळ देशभरात पोहोचवण्यासाठी २ मे १९५४ रोजी देशभरात ‘एकात्मता दिन’ साजरा केला गेला आणि ६ डिसेंबर १९५४ ते १६ डिसेंबर १९५४ दरम्यान ‘गोवा मुक्ती सप्ताह’ आयोजित करण्यात आला.
२३ जून १९५५ रोजी, भारतीय जनसंघाचे सचिव जगन्नाथराव जोशी १०० सत्याग्रहींसह गोव्यात गेले. तिथे त्यांनी गोवा मुक्ती संग्रामाचा आवाज बुलंद केला.
दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनसंघाने लढवलेल्या १३० जागांपैकी ४ जागांवर जनसंघ विजयी झाला.
नेहरू-नून करारानुसार ‘बेरुबारी’ हा केंद्रशासित प्रदेश पाकिस्तानला हस्तांतरित करण्याच्या विरोधात एक पूर्ण विकसित जनआंदोलन करण्यात आले. या जनआंदोलनातून जनसंघाची राष्ट्रीय एकात्मता संवर्धनाची भूमिका अधोरेखित होते.
तिसऱ्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनसंघाने लढवलेल्या एकूण १९६ जागांपैकी ४ जागांवर जनसंघ विजयी झाला.
१२ एप्रिल १९६४ रोजी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जी आणि डॉ. राम मनोहर लोहिया जी यांनी भारत-पाकिस्तान फेडरेशनवर आणि भारत आणि पाकिस्तानमधील अल्पसंख्याकांच्या मुद्द्यावर संयुक्त निवेदन जारी केले.
चौथ्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनसंघाने लढवलेल्या २४९ जागांपैकी ३५ जागांवर जनसंघाचा विजय झाला. उत्तर प्रदेश, हरयाणा आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये दुसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदय. काही राज्यांमध्ये बिगर-काँग्रेसी एकजूट, जनसंघ हा त्यातील प्रमुख घटकपक्ष.
पाचव्या लोकसभा निवडणुकीत श्रद्धेय भारतरत्न अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनसंघाने २४९ जागा लढवल्या, त्यापैकी २२ जागांवर जनसंघ विजयी झाला. इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वातील काँग्रेसने दिलेल्या ‘रोटी, कपडा, मकान’, ‘गरीबी हटाव’ अशा भूलथापांमुळे काँग्रेसचा विजय. काँग्रेसने तब्बल 70 वर्ष देशवासियांना फक्त भूलथापाच दिल्या.
२५ जून १९७५ रोजी इंदिरा गांधींनी संविधानाची पायमल्ली करत भारतावर आणीबाणी लादली, जी २१ मार्च १९७७ पर्यंत चालली. जनसंघाचे अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी कारावास भोगला, पण काँग्रेसच्या मनमानीविरुद्ध संघर्ष थांबवला नाही.
भारतीय जनसंघ इतर पक्षांसह जनता पार्टीमध्ये विलीन झाला. सहाव्या लोकसभा निवडणुकीत जनता पार्टीला तब्बल २९५ जागांवर विजय.
सातव्या लोकसभा निवडणुकीत जनता पार्टीने लढवलेल्या एकूण ४३२ जागांपैकी केवळ ३१ जागांवर विजय. लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच जनता पार्टीच्या राष्ट्रीय समितीने जनसंघातील सदस्यांच्या जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशा दुहेरी सदस्यत्वावर बंदी घातली, यामुळे जनता पार्टी दुभंगली
"अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा” - श्रद्धेय भारतरत्न अटल बिहारी वाजपेयीजी, श्रद्धेय भारतरत्न लालकृष्ण आडवाणी यांनी मुंबई येथे भारतीय जनता पार्टी स्थापन केली. त्यावेळी अटलजींनी उच्चारलेले हे शब्द आज मोदीजींच्या नेतृत्वात खरे ठरले आहेत.
पहिल्याच बैठकीत श्रद्धेय भारतरत्न अटलबिहारी वाजपेयीजी यांची अध्यक्षपदी निवड, कार्यकाळ - १९८० ते १९८६
आठव्या लोकसभा निवडणुकीत भाजपा पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीला सामोरी गेली. इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण देशभरात सहानुभूतीची लाट पसरली होती, त्यामुळे भाजपाने लढवलेल्या एकूण २२९ जागांपैकी केवळ २ जागांवरच विजय मिळाला.
श्रद्धेय भारतरत्न लालकृष्ण आडवाणी यांची भाजपाचे दुसरे अध्यक्ष म्हणून निवड. कार्यकाळ - १९८६ ते १९९०
१९८६-१९८९ बोफोर्स घोटाळ्याचा भांडाफोड झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीने बोफोर्स घोटाळ्याच्या विरोधात भ्रष्टाचार-विरोधी चळवळ हाती घेतली.
नवव्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने लढवलेल्या एकूण २२५ जागांपैकी ८५ जागा जिंकल्या. जनता पक्षाला समर्थन.
अयोध्या राम जन्मभूमीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल या संघटनांसोबत देशव्यापी आंदोलन उभारण्याचा भाजपाचा संकल्प
“सौगंध राम की खाते है, मंदिर यही बनाएंगे” - सप्टेंबर १९९० दरम्यान श्रद्धेय लालकृष्ण आडवाणीजी यांनी सोमनाथ ते अयोध्या ही ऐतिहासिक ‘राम रथ यात्रा’ सुरू केली. बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या आदेशानुसार त्यांना प्रतिबंधात्मक नजरकैदेत ठेवण्यात आले. तरीही मोठ्या संख्येने कारसेवक अयोध्येत जमले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांच्या आदेशानुसार, सुमारे १,५०,००० कारसेवकांना ताब्यात घेण्यात आले होते. तरीही बरेच जण अयोध्येत पोहोचण्यात यशस्वी झाले. त्याच वर्षी, भाजपने व्ही.पी. सिंह सरकारचा पाठिंबा काढून घेतला.
भाजपाचे तिसरे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून डॉ. मुरली मनोहर जोशी यांची निवड. कार्यकाळ - १९९१ ते १९९३.
दहाव्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने लढवलेल्या एकूण ४७७ जागांपैकी १२० जागा जिंकल्या
श्रद्धेय भारतरत्न लालकृष्ण आडवाणी यांनी दुसऱ्यांदा भाजपाचे अध्यक्षपद स्वीकारले. कार्यकाळ - १९९३ ते १९९८
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या जागांची संख्या ६५ पर्यंत वाढली आणि शिवसेना-भाजपा युती सत्तेवर आली. महाराष्ट्रात प्रथमच भाजपा सत्तेत सहभागी झाला. याशिवाय आंध्र प्रदेश, कर्नाटक, बिहार, ओडीसा आणि गोवा या राज्यांमध्ये भाजपा सत्तेवर आली.
११व्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने लढवलेल्या एकूण ४७१ जागांपैकी १६१ जागा जिंकल्या आणि पहिल्यांदाच संसदेतील सर्वात मोठा पक्ष ठरला.
श्रद्धेय भारतरत्न अटलबिहारी वाजपेयीजी पहिल्यांदा, १३ दिवसांसाठी पंतप्रधान झाले. १३ दिवसानंतर सरकार कोसळले, तेव्हाचे अटलजींचे “सरकारें आएंगी, जाएंगी, पार्टियां बनेंगी, बिगड़ेंगी मगर ये देश रहना चाहिए” हे वाक्य अजरामर झाले. या विधानातून भाजपासाठी सत्ता हे साध्य नसून सेवेचे साधन आहे, हे अधोरेखित झाले.
बाराव्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने लढवलेल्या ३८८ जागांपैकी १८२ जागा जिंकल्या. समविचारी पक्षांना सोबत घेऊन ‘नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स’/’राष्ट्रीय लोकशाही आघाडी’ (एनडीए) स्थापन केली
१२ मार्च १९९८ रोजी श्रद्धेय भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले.
श्री. कुशाभाऊ ठाकरे भाजपाचे अध्यक्ष झाले. कार्यकाळ - १९९८ ते २०००
११ मे १९९८ रोजी राजस्थान मधील पोखरण येथे श्रद्धेय भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात भारताने यशस्वीपणे पाच अणुचाचण्या केल्या, ज्याला ‘ऑपरेशन शक्ती’ असे नाव देण्यात आले.
पाकिस्तानी सैनिकांनी कारगिल प्रांतात घुसखोरी केल्यामुळे भीषण युद्धाला तोंड फुटले, तेव्हा अटलजींच्या कणखर नेतृत्वात भारताने २६ जुलै १९९९ रोजी कारगिल युद्धात विजय मिळवला.
श्रद्धेय भारतरत्न अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या कार्यकाळात 13 महिन्यांनी एका मताने सरकार कोसळले.
तेराव्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने लढवलेल्या ३३९ जागांपैकी १८२ जागा जिंकल्या आणि अटलजींच्या नेतृत्वात देशात ‘सुशासन पर्व’ सुरू झाले.
अटलजी हे ५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणारे पहिले बिगर कॉँग्रेसी पंतप्रधान झाले. या काळात देशहिताचे अनेक निर्णय घेतले गेले.
श्री. बंगारू लक्ष्मण हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. कार्यकाळ - २००० ते २००१
श्री. के. जना कृष्णमूर्ती हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. कार्यकाळ - २००१ ते २००२
श्री. व्यंकय्या नायडू हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. कार्यकाळ - २००२ ते २००४
चौदाव्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने ३६४ पैकी १३८ जागा जिंकल्या.
श्रद्धेय भारतरत्न लालकृष्ण आडवाणी तिसऱ्यांदा राष्ट्रीय अध्यक्ष झाले, कार्यकाळ - २००४ ते २००५
श्री. राजनाथ सिंह यांनी ४ वर्षे भाजपाचे अध्यक्षपद भूषवले. कार्यकाळ - २००५ ते २००९
पंधराव्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला ४३३ जागांपैकी ११६ जागा जिंकता आल्या.
तरुण नेत्यांनी पक्षाची कमान हाती घेतली. नितीन गडकरी अध्यक्ष झाले. कार्यकाळ - २०१० ते २०१३
२०११ मध्ये ९ राज्यांमध्ये भाजपाचे मुख्यमंत्री झाले.
श्री. राजनाथ सिंह यांची दुसऱ्यांदा पक्षाध्यक्ष पदी निवड झाली. कार्यकाळ - २०१३ ते २०१४
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून भाजपाने १३ सप्टेंबर रोजी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा केली
आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने लढवलेल्या ४२८ पैकी २८२ जागांवर विजय मिळाला. भारतीय जनता पार्टीला पहिल्यांदाच पूर्ण बहुमत मिळाले आणि भारताचे ‘अच्छे दिन’ सुरू झाले
मैं नरेंद्र दामोदर दास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं कि…” आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी पहिल्यांदाच पंतप्रधान पदाची शपथ घेतली.
आदरणीय अमितभाई शाह हे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. कार्यकाळ - २०१४ ते २०२०
भाजपाने लढवलेल्या ४३६ पैकी ३०३ जागांवर विजय मिळवत इतिहास रचला. नव्या भारताच्या उभारणीला जनतेने साथ दिली.
श्री. जगत प्रकाश नड्डा हे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले.
भाजपाने लढवलेल्या एकूण ४४१ जागांपैकी २४० जागांवर भाजपाचा विजय, या विजयातून मोदीजींच्या गॅरंटीवर असलेला देशाचा विश्वास तिसऱ्यांदा अधोरेखित झाला.
मोदीजींनी सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आणि सुशासन पर्व निरंतर सुरू राहिले.