सेवेची साधना, समर्पणाची सिद्धी, संघटनेची शिदोरी
भाजपा परिवारातील एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून कार्यरत असताना पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या कल्याण उपजिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली.
युवामोर्चा उपजिल्हाध्यक्ष असल्यापासून गुढीपाडवा शोभायात्रेत सातत्याने सहभाग, चित्ररथांना प्रोत्साहन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना उत्साहाने पाठबळ.
कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही, भाजपाने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर रोड प्रभागातून उमेदवारी दिली
पहिल्याच निवडणुकीत डोंबिवलीकरांनी माझ्यावर विश्वास दाखवून सावरकर रोड प्रभागातून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेवर निवडून दिले
केडीएमसी क्षेत्रात डोंबिवली-कल्याण-टिटवाळा रिंग रोड योजना प्रस्तावित!
सार्वजनिक दहीहंडीच्या माध्यमातून देशभक्ती आणि समाज प्रबोधनाचे विषय मांडण्यास सुरुवात
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी निवड
स्थायी समिती सभापती असताना तत्कालीन केंद्र सरकारपर्यंत पाठपुरावा करत, कल्याण-डोंबिवलीतील गरिबांच्या हक्काच्या घरांसाठी बीएसयुपी योजना मंजूर करून घेतली.
स्थायी समिती सभापती असताना तत्कालीन केंद्र सरकारपर्यंत पाठपुरावा करत, जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेतून केडीएमसीसाठी २६०० कोटींची कामे मंजूर करून आणली.
बंदिस्त नाले, पाण्याच्या टाक्या, नेतीवली पाणी प्रकल्पांमुळे शहराला नवसंजीवनी मिळाली
गरजू शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत अभ्यासक्रमिक पुस्तकं मिळावी म्हणून ‘पुस्तक पेढी’ योजना सुरु केली.
डोंबिवलीकरांनी खूप मोठा विश्वास दाखवला आणि नवनिर्मित डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून पहिले आमदार होण्याचा मान दिला.
मुंबई विद्यापीठाच्या पेपरफुटीविरुद्ध आवाज उठवत, विद्यार्थ्यांसाठी पुन्हा परीक्षा घेण्यास भाग पाडले.
डोंबिवलीकर’ मासिक सुरू केलं, संपादकपदाची जबाबदारी स्वीकारली.
डोंबिवलीमध्ये अखंडित वीज पुरवठा सुरू राहावा यासाठी ‘महावितरण’ कडे अंडरग्राउंड वायरिंगसाठी पाठपुरावा.
मोठागाव-माणकोली खाडी पूल उभारण्यात यावा यासाठी MMRDA ला प्रत्यक्ष भेट देऊन निवेदन दिलं.
डोंबिवलीतील कर्तृत्ववान व्यक्तींना सन्मानित करण्यासाठी मानाचा ‘आदर्श डोंबिवलीकर’ पुरस्कार सुरू केला.
डोंबिवलीकर दिनदर्शिका प्रकाशित करण्यास सुरुवात. दरवर्षी या दिनदर्शिकेच्या माध्यमातून डोंबिवलीतील विविध क्षेत्रांत प्रेरणादायी कार्य करणाऱ्या आदर्श व्यक्तिमत्त्वांचा सन्मान केला जातो.
गोविंदवाडी बायपासकरिता उपोषण. रस्त्यासाठी संघर्ष म्हणून जामीन नाकारला. कितीही संघर्ष करावा लागला, तरीही जनसेवेचा मार्ग सोडला नाही, सोडणार नाही!
ब्राह्मण समाजाची बदनामी करणाऱ्या खेडेकरचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध
डोंबिवलीच्या रस्त्यांचं रूप पालटण्यासाठी रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी निधी मंजूर करून आणला.
डोंबिवलीत प्रथमच 'रस्ता हक्क परिषद' आयोजित केली.
डोंबिवलीतील बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर तत्कालीन आघाडी सरकारला जाब विचारण्यासाठी विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडला.
डोंबिवली स्टेशनवरून प्रवास करताना नागरिकांना जीव मुठीत धरावा लागे, कारण प्लॅटफॉर्म आणि लोकलच्या डब्यातील जीवघेणी गॅप! या गॅपविरुद्ध संघर्ष करत रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच DRM कार्यालयाला टाळे ठोकले
शासकीय कागदपत्रांसाठी डोंबिवलीकरांना हेलपाटे घालावे लागू नयेत म्हणून डोंबिवलीत सेतू कार्यालय सुरु केले.
१००% वीज बिल वसुली होऊनही डोंबिवलीकरांना लोडशेडिंगचा सामना करावा लागत होता. वीज नियामक आयोगात याविरोधात कायदेशीर लढा देऊन यशस्वी पाठपुरावा केला, यामुळे डोंबिवली हे महाराष्ट्रातील पहिले लोडशेडिंगमुक्त शहर ठरले.
क्रिकेट वर्ल्डकप फायनलसाठी बाजीप्रभू चौकात महाकाय बॅट उभारली.
शहराच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचं पाऊल उचलत डोंबिवलीत 100 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले.
डोंबिवली रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या सोयीसाठी यांत्रिक जिने (एस्केलेटर) उभारण्याच्या मागणीसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला.
मुंबई-ठाणे परिसरातील सर्वात मोठ्या आणि एकमेव ‘डोंबिवलीकर रोझ फेस्टिवल’चा शुभारंभ. डोंबिवलीकरांनी पहिल्या वर्षापासूनच या फेस्टिवलला तुफान गर्दी करत त्याचं उत्साहाने स्वागत केलं.
लहान मुलांच्या आनंदासाठी खास ‘किलबिल’ महोत्सवाच्या आयोजनास सुरुवात!
नागरिकांना गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे होणाऱ्या त्रासावर त्वरित उपाय म्हणून ‘गॅस अदालत’ आयोजित करून सिलेंडरच्या टंचाईवर मार्ग काढला.
डोंबिवलीत शिधा वितरणामध्ये उद्भवणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात या उद्देशाने डोंबिवली पूर्वेला स्वतंत्र शिधा कार्यालय उभारण्यासाठी यशस्वी पाठपुरावा केला.
एकाच दिवशी अंदाजे 4000 बाटल्या रक्त संकलन करून सामाजिक बांधिलकीचा एक अभूतपूर्व विक्रम नोंदवला.
डोंबिवली आणि आसपासच्या रेल्वे स्थानकांवरील समस्यांना वाचा फोडण्यासाठी ‘डोंबिवली रेल परिषद’ आयोजित करण्यात आली.
घराघरात सुविधा पोहोचवण्यासाठी ‘गॅस पाईपलाईन’ योजनेचा पाठपुरावा.
कलाकार आणि खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी कला-क्रीडा महोत्सवाचं आयोजन.
‘Icons of Thane’ पुरस्कार प्राप्त!
डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा विक्रमी मतांनी विजयी!
अंदमान सेल्युलर जेलमध्ये वीर सावरकरांच्या कवितेची कोनम्शीला हटवण्याचा काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी प्रयत्न केला. या घटनेच्या निषेधार्थ सावरकर रोडवरील सावरकर गार्डनमध्ये स्वा. सावरकर ज्योत प्रज्वलित केली, जी ४ हजार दिवसानंतर आजही अखंड तेवत आहे.
डोंबिवलीच्या संस्कृतीला साजेसं ‘डोंबिवली अभिमान गीत’ रचून ते डोंबिवलीकरांना समर्पित केलं.
आधुनिकतेच्या दिशेने पाऊल टाकत, डोंबिवलीकरांना मोफत वाय-फाय सुविधा उपलब्ध करून दिली.
नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी पूर्ण कल्याण-शीळ रस्त्याच्या काँक्रिटीकरण योजनेसाठी पाठपुरावा केला.
वाढत्या वाहतुकीला तोंड देण्यासाठी जोशी हायस्कूल उड्डाणपुलाला मान्यता मिळवून दिली.
३ दिवसीय डोंबिवलीकर संगीत महोत्सवाचे यशस्वी आयोजन. जागतिक ख्यातीचे गायक आणि वादक उपस्थित
एक कलारसिक म्हणून साहित्य, कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन दिल्याबद्दल कोकण मराठी साहित्य परिषदेचा ‘साहित्य मित्र पुरस्कार’ प्राप्त.
डोंबिवलीतील कायदा-सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी विष्णू नगर पोलीस स्टेशनचे यशस्वी स्थलांतर करण्यात आलं आणि टिळक नगर पोलीस स्टेशनची निर्मिती करण्यात आली.
डोंबिवली आणि आसपासच्या परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी, काटई-ऐरोली रोड प्रकल्पाला मान्यता मिळवून दिली.
कल्याण जिल्हा हा राष्ट्रीय विचारांचा बालेकिल्ला ! भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष म्हणून या जिल्ह्यातील भाजपा पक्ष संघटनेची जबाबदारी सांभाळण्यात यशस्वी ठरलो.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून शपथ. बंदरे, माहिती व तंत्रज्ञान, वैद्यकीय शिक्षण, आणि अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण या चार खात्यांची जबाबदारी, तसेच रायगड आणि पालघर या जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची धुरा
मराठवाड्यावर ओढवलेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत भाजपने सोपवलेली दुष्काळी भागाची पाहणी करून उपाययोजनांचा सविस्तर अहवाल सादर करण्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.
डोंबिवलीत जलमार्गाने प्रवास सुलभ होण्यासाठी नवीन जेट्टी बांधण्याची महत्त्वाकांक्षी योजना प्रस्तावित.
दुर्गाडी परिसरातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून नवीन पुलाला मान्यता.
'नमो रमो नवरात्री' हा संपूर्ण वातानुकुलित आणि सुरक्षित गरबा महोत्सव आयोजित करण्याची सुरुवात २०१६ साली झाली आणि अल्पावधीतच हा गरबा महोत्सव 'महाराष्ट्रातील सर्वात मोठा गरबा महोत्सव' म्हणून उदयास आला आहे. यासोबतच दसऱ्याला 'रावण दहन' व कोजागिरी पौर्णिमेला 'नमो रमो रमजट' देखील आयोजित केले जातात.
डोंबिवलीतील शेकडो इमारतींवर लादल्या जाणाऱ्या तिप्पट प्रॉपर्टी टॅक्स पेनल्टीविरोधात सातत्याने पाठपुरावा.
कल्याण डोंबिवली ते तळोजा मेट्रो मार्गाची मागणी मंजूर करून घेतली.
शेकडो तरुणांना त्यांच्या क्षमतांना साजेसे काम मिळवून देण्यासाठी ‘सक्षम डोंबिवलीकर’ उपक्रमातून रोजगाराच्या नव्या वाटा उपलब्ध करून दिल्या.
अमृत योजनेअंतर्गत २७ गावांसाठी २८३ कोटींच्या पाणीपुरवठा प्रकल्पाला मंजुरी
डोंबिवलीत नर्सिंग कॉलेजसाठी मान्यता आणि साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटीला फिजिओथेरपी कॉलेजसाठी मान्यता मिळवून देत, स्थानिक विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय शिक्षणाची कवाडं खुली करून दिली.
डोंबिवलीच्या जनतेने पुन्हा विश्वासाने आमदार म्हणून सलग तिसऱ्या वेळी प्रचंड बहुमताने निवडून दिलं. कोकण विभागात सर्वाधिक मतांनी विजयी होण्याचा विक्रम.
डोंबिवलीत नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘स्टार्टअप बूटकॅम्प’ आयोजित करण्यात आला, जिथे 120 नवउद्योजकांनी आपल्या बिझनेस आयडीया सादर केल्या.
ज्येष्ठ नागरिकांना आधार आणि सन्मान देण्यासाठी ‘आपलं घर’ स्थापन.
डोंबिवलीच्या स्वाभिमानाचे आणि गौरवाचे प्रतीक असलेल्या मृत्युंजय आन ठाकूर आणि मान ठाकूर शौर्यस्थळाचे भूमिपूजन.
डोंबिवली पूर्व रेल्वे स्टेशन परिसर सुशोभिकरणासाठी तिथे इतिहास घडविणाऱ्या डोंबिवलीकर व्यक्तिमत्त्वांचे माहितीफलक लावण्यात आले.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत सहा महिने अखंड कम्युनिटी किचनद्वारे दररोज शेकडो गरजूंना मोफत जेवण पुरवठा
लॉकडाऊन काळात औषधे, फवारणी, कम्युनिटी किचन, व्यावसायिक कंपन्यांना परवाने मिळवून देणे या विषयांबाबत सतत कार्यरत
फडणवीस सरकारच्या काळात डोंबिवलीतील रस्ते काँक्रिटीकरण योजनेसाठी ४७० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. हा निधी महाविकास आघाडी सरकारने स्थगित करण्यात आल्यानंतर तो पुन्हा मिळवण्यासाठी संघर्ष
घनकचरा उपविधी म्हणून नागरिकांवर लादण्यात येणाऱ्या अन्यायकारक शुल्काविरुद्ध आवाज उठवला.
नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी आक्रमक भूमिका, डोंबिवलीत साखळी आंदोलन, नवी मुंबई येथे आंदोलनात सहभाग
सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग या खात्यांच्या कॅबिनेट मंत्रीपदाची धुरा
इंजिनियर्स डे’ निमित्त आयोजित कार्यक्रमात, “पीडब्लूडीत बदल घडवायला आलो आहे!” असा ठाम संदेश देत, पारदर्शक आणि गतीशील कारभाराची ग्वाही दिली
सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली.
महाराष्ट्रातील जनतेसाठी ‘आनंदाचा शिधा’ योजना जाहीर! अवघ्या १०० रुपयांत शिधा उपलब्ध करून देऊन लाखो कुटुंबांना दिवाळीचं गिफ्ट दिलं.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १० प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अत्याधुनिक टेलि-मेडिसिन यंत्रणा उभारली. आतापर्यंत हजारो रुग्णांनी या सुविधेचा लाभ घेतला.
७५ व्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीत देशातील पहिला नागरी आर्मी डे लेफ्टनंट जनरल श्री. संजय कुलकर्णी (सेवानिवृत्त) यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा. भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम करणारा अनोखा सोहळा.
श्री क्षेत्र आंगणेवाडी येथे येणाऱ्या भाविकांसाठी मोबाइल नेटवर्क कनेक्टिव्हिटी सुविधा यासोबतच उत्सव काळासाठी प्रसाधनगृह उभारण्यात यश.
ठाण्यातील आरोग्य सेवांना आणखी सक्षम करण्यासाठी विठ्ठल सायन्ना जिल्हा सामान्य, महिला व बाल आणि सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे संपन्न.
स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त मॉरिशस येथे सावरकरांच्या अर्धपुतळ्याचे माझ्या आणि मॉरिशसचे राष्ट्रपती पृथ्वीराज सिंह रूपन यांच्या शुभहस्ते अनावरण संपन्न !
डोंबिवलीकर आणि मॉरिशसमधील कलाकारांच्या सहभागातून साकारलेला, हिंदू संस्कृतीचा अनोखा सांस्कृतिक मेळावा.
कायदा शिक्षणाला बळकटी देणारे स्वामी विवेकानंद विधी महाविद्यालय डोंबिवलीत सुरू.
डोंबिवलीतील टिळकनगर काॅमर्स काॅलेजमध्ये B.A.F. (Banking & Finance) आणि B.M.S. (Management Studies) या अत्याधुनिक अभ्यासक्रमांना मान्यता.
डॉक्टर शिरोडकर एम्स नर्सिंग कॉलेजमध्ये B.Sc नर्सिंग अभ्यासक्रमासोबतच फिजिओथेरपी कॉलेज सुरू करण्यासही अधिकृत मान्यता मिळवून दिली
कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे स्थानकांचं सौंदर्य वाढवण्यासाठी ८ ऑगस्ट रोजी कोकण रेल्वे मार्गावरील १२ प्रमुख रेल्वे स्थानकांच्या परिसराचे सुशोभिकरण आणि जोडरस्त्यांचे काँक्रिटीकरण या महत्त्वपूर्ण प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन करून एक वर्षाच्या आत काम पूर्ण करण्यात आलं.
कार्लानिवासिनी श्री देवी एकविरा मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी मंदिर परिसराचे सुशोभिकरण, परिसरात विविध सुविधा निर्माण करणे तसेच जोडरस्त्यांचे काँक्रिटीकरण या महत्त्वपूर्ण कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ४० कोटी रुपयांचा निधी मंजूर. यासोबतच महाबळेश्वर तालुक्यातील श्री उत्तेश्वर मंदिर, खिद्रापूर येथील श्री कोपेश्वर मंदिर अशा अनेक मंदिरांचं जतन, संवर्धन आणि परिसर विकास
१२ वर्ष रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचं काम कोकणवासीयांसह सर्व प्रवाशांसाठी 80% पूर्णत्वास नेलं आणि कशेडी सिंगल लेन बोगद्याचे लोकार्पणही करण्यात आलं.
स्थानिक कलाकारांना वाव मिळावा या हेतूने ‘डोंबिवलीकर स्टुडिओ’चा शुभारंभ
डोंबिवलीतील तरुणांना ‘करिअर रेडी’ करण्याच्या उद्देशाने डोंबिवलीत ‘डिजिटल अकॅडमी’ स्थापन करण्यात आली.
आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी पालघर जिल्ह्यातील ३५ आश्रमशाळांचे आधुनिकीकरण.
श्रीराम जन्मभूमी मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त डोंबिवलीत महिनाभर जल्लोषात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यामध्ये प्रतीकात्मक भव्य राम जन्मभूमी मंदिर, संपूर्ण गीत रामायणाचा आनंदसोहळा, 'श्रीराम आगमन खुशहाली महोत्सव', 'कारसेवकांचा सन्मान' यांसारख्या विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचा समावेश होता.
राम मंदिराचा आनंद व्यक्त करणाऱ्या या रामगीताचे अनावरण करण्यात आले. या गीतामधून रामरायांच्या भक्तीसोबतच हिंदू धर्म शक्ती आणि भारतीय संस्कृतीचे सुरेख चित्रण आणि वर्णन करण्यात आले आहे.
तरुणांना संरक्षण व पोलिस दलात भरतीसाठी आवश्यक शारीरिक आणि बौद्धिक प्रशिक्षण मोफत मिळावं यासाठी ‘डोंबिवलीकर न्यू फोर्स अकॅडमी’चे लोकार्पण करण्यात आलं.
कोकणातील श्री क्षेत्र आंगणेवाडी आणि कुणकेश्वर या प्रसिद्ध देवस्थानांना जोडणाऱ्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. यासोबतच, भक्तांच्या सोयीसाठी प्रसाधनगृहे, स्वच्छतागृहे आणि विविध इतर सुविधा देखील उभारण्यात आल्या.
ठाणे आणि पालघर या दोन जिल्ह्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेल्या भिवंडी-वाडा-मनोर रस्ता आणि चिंचोटी-कामण-अंजुरफाटा-माणकोली रस्ता या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन करण्यात आलं.
स्थानिक विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या नवीन संधी उपलब्ध करण्यासाठी डोंबिवलीत, वैशालीताई जोंधळे विधी महाविद्यालय आणि जोशी हायस्कूल शिक्षण संकुल येथे जनरल एज्युकेशन इंस्टिट्यूटचे विधी महाविद्यालय तसेच टिळकनगर संस्थेचे विधी महाविद्यालय अशी तीन नवीन विधी महाविद्यालये उभारण्यास मान्यता
डोंबिवली मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून ५५० कोटी रुपयांचा निधी मंजूर. या निधीच्या माध्यमातून विविध योजनांची अंमलबजावणी केली जाईल, ज्यामुळे रस्ते, पुल, आरोग्य सेवा आणि इतर महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचा विकास होईल.
अत्याधुनिक आणि सक्षम आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी टिळक रोडवरील सूतिकागृहांच्या जागी मॉडर्न मॅटर्निटी होम आणि कॅन्सर हॉस्पिटल उभारणीच्या कामांचं भूमिपूजन करण्यात आलं.
महाराष्ट्रातील तरुणांच्या कला आणि क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी भाजपा महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने ‘नमो चषक २०२४’ चे आयोजन करण्यात आले.
लोकसभा निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सुशासन प्रणालीवर आधारित पहिल्या मराठी रॅपचे अनावरण करण्यात आले.
सोशल मिडियाचे वाढते महत्त्व ओळखून मोदी सरकारच्या देदीप्यमान कामगिरीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी 'मोदी मॅजिक' हे अनोखे डिजिटल कॅम्पेन राबवले. या कॅम्पेनच्या माध्यमातून विविध क्षेत्रात आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वात उचलण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण पावलांचा लेखाजोखा जनतेसमोर, विशेषतः युवा पिढीसमोर मांडला.
लोकसभा निवडणुकीत विशेषतः कोकण विभागात भाजप महायुतीच्या विजयाचे किंगमेकर ठरत ५ही जागा निवडून आणल्या. कोकणात भाजपाची ताकद सिद्ध केली.
आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी पालघर जिल्ह्यातील टेंभोडे येथे स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेचं उद्घाटन.
डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन २०२४’ - डोंबिवली शहरातील पहिला हाफ मॅरेथॉन इव्हेंट ३,५०० हून अधिक धावपटूंच्या उत्साही सहभागात यशस्वीपणे पार पडला.
डोंबिवलीतील गायक आणि डान्सर्सना व्यासपीठ मिळावे, त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने ‘डोंबिवलीकर सुपर सिंगर’ आणि ‘डोंबिवलीकर सुपर डान्सर’ या स्पर्धांचे आयोजन.
पालघर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणून जनतेचे प्रश्न समजून घेण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करून सर्वसामान्यांच्या शेकडो तक्रारींचं त्वरित निवारण.
७० बेघर कातकरी कुटुंबांना स्वत:च्या हक्काची घर उभारण्यासाठी ओसरगाव येथे स्वतःच्या मालकीची जमीन दिली.
qस्वातंत्र्य मिळाल्यापासून प्रलंबित असलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गेळे-गायकर कबुलायतदार यांच्या जमिनीचा प्रश्न अखेर मार्गी लावण्यात आला.
डोंबिवलीतील वारकरी परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आमदार निधीतून उभारण्यात येणाऱ्या डोंबिवलीकर भजन हितवर्धक महासंघाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन.
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त हरित ऊर्जा आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी डोंबिवलीतील विविध हाऊसिंग सोसायट्यांमध्ये सार्वजनिक वीज वापरासाठी मोफत सोलार पॉवर युनिट बसविण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
‘डोंबिवलीकर प्रतिष्ठान’च्या वतीने शास्त्रीनगर रुग्णालयाला अद्ययावत एक्स-रे मशीन भेट.
डोंबिवलीकर भगिनींना आत्मनिर्भर आणि सशक्त बनवण्यासाठी महिला बचत गटांच्या माध्यमातून 'सक्षम भगिनी योजना' ची सुरुवात.
शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांचा थेट लाभ मिळवून देण्यासाठी, शेतकऱ्यांचा माल थेट डोंबिवलीकरांच्या दारी पोहोचविणारा आठवडी बाजार भरण्यास सुरुवात.
अयोध्येत महाराष्ट्रातील भक्तांसाठी एक आरामदायक आणि सुविधायुक्त निवासस्थान उपलब्ध करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्र भक्त निवासाच्या उभारणीचा भूमिपूजनाने शुभारंभ
स्वातंत्र्यसूर्य सावरकर यांच्या आत्मार्पण दिनी 'हिंदू सामर्थ्य गीत' या गीताचे सावरकर दर्शन प्रतिष्ठानच्या वतीने अनावरण करण्यात आले. हे गीत "रग-रग हिंदू मेरा परिचय" या श्रद्धेय भारतरत्न अटल बिहारी वाजपेयीजी यांनी लिहिलेल्या मूळ हिंदी गीताचा मराठी अनुवाद आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये महाराष्ट्र सदन उभारण्यासाठी काश्मीर मधील बडगाम मधील इच्चगाम येथे २.५ एकर जमीन खरेदी करण्यासाठी आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने ९ कोटी ३० लाख २४ हजार रुपयांची आर्थिक तरतूद
नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी भूमिपुत्रांच्या शिष्टमंडळासमवेत केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री के. राम मोहन नायडू आणि राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ ह्यांच्या समवेत संयुक्त बैठक.
डोंबिवली स्थानक परिसराला एक आकर्षक आणि सुंदर रूप देऊन डोंबिवलीकरांचा सन्मान करण्यासाठी डोंबिवलीकरांच्या योगदानाची माहिती सांगणारे माहितीफलक आणि डोंबिवली शहराच्या विविध पैलूंचे दर्शन घडवण्यासाठी कमानी लावण्यात आल्या.
सोशल मिडियाचे वाढते महत्त्व ओळखून महायुती सरकारच्या देदीप्यमान कामगिरीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी 'म्हणूनच महायुती' हे अनोखे कॅम्पेन राबवले. या डिजिटल कॅम्पेनच्या माध्यमातून विविध क्षेत्रात महायुती सरकारच्या वतीने उचलण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण पावलांचा लेखाजोखा महाराष्ट्रातील जनतेसमोर, विशेषतः युवा पिढीसमोर मांडला
डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील जनतेने सलग चौथ्यांदा मतरुपी विश्वास दाखवला, १ लाख २३ हजार ८१५ इतक्या विक्रमी मतांनी विजय
२८ डिसेंबर २०२४ रोजी भाजपा महाराष्ट्र संघटन पर्व प्रदेश प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.
पक्षाविषयी एकनिष्ठा, हाती घेतलेले काम तडीस नेण्याची वृत्ती, दांडगा जनसंपर्क आणि कुशल संघटन कौशल्यामुळे ११ जानेवारी २०२५ रोजी भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.
इंडिगो एअरलाईन्समधील २ हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांनी भाजपा परिवारात प्रवेश केला.
महाराष्ट्रातील 'संघटन पर्व' अभियानाचे औचित्य साधून भाजपा स्फूर्तिगीताचे अनावरण करण्यात आले. या स्फूर्तिगीतामध्ये उज्ज्वल भारत, भाजपाचे ध्येय, पक्षातील लोकनेते आणि त्यांचे समर्पण यांचे शब्दचित्र वर्णन करण्यात आले आहे
तब्बल २९ हजार माथाडी कामगारांनी भाजपा परिवारात प्रवेश केला.
संघटन पर्व अभियानांतर्गत राज्यातील सर्व विभागांच्या कार्यशाळांचे आयोजन, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमवेत मार्गदर्शन
जुनी डोंबिवली परिसरातील गणेश घाट तसेच अंडर बायपास ते गणेश घाट या रस्त्यांचा लोकार्पण सोहळा
भीमजयंती निमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन्मान अभियान कार्यशाळा
भाजपा महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने मंडल अध्यक्ष नियुक्तीसाठी विभागीय कोअर कमिटी बैठका, 1221 मंडल गठीत, यापैकी ९६३ मंडलांची फेररचना तर 258 मंडलांची नव्याने स्थापना
गाव संपर्क अभियानाच्या अनुषंगाने विभागीय आढावा बैठकांचा धडाका, ८ दिवसांत महाराष्ट्रातील १० प्रादेशिक उपविभागांमध्ये दौरा करत, १० बैठका घेत महाराष्ट्र पिंजून काढला.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील भाजपाच्या ८० संघटनात्मक जिल्ह्यांसाठी जिल्हाध्यक्षांची नियुक्ती
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्म-त्रिशताब्दीनिमित्त त्यांच्या पराक्रमाची, किर्तीची यशोगाथा सांगणारे 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी त्वामहं वंदे' हे गीत तयार करण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर अभिवादन समिती, भारतीय इतिहास संकलन समिती तसेच कोकण प्रांत कल्याण जिल्हा व भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर अभिवादन सोहळ्यात या गीताचे अनावरण करण्यात आले.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती त्रिशताब्दी निमित्त महाराष्ट्र प्रदेश कार्यशाळा
मोदी सरकारची ११ वर्षे - संकल्प से सिद्धि तक’ अभियानांतर्गत विभागीय कार्यशाळा
पक्षाने आणखी एकदा विश्वास दाखवला आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी माझी बिनविरोध निवड झाली. दीड कोटी सदस्य संख्येच्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या पक्षाची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडण्याचा प्रयत्न करीन!