कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वाहतुकीला चालना देण्यासाठी डोंबिवली-कल्याण-टिटवाळा रिंग रोडचा प्रस्ताव आखला. सध्या ही योजना प्रगतिपथावर असून हा रिंग रोड पूर्ण झाल्यावर कल्याण-डोंबिवलीकरांच्या जीवनातील वाहतुकीच्या समस्यांना पूर्णविराम मिळेल.
कल्याण-डोंबिवलीतील प्रत्येक गरजू कुटुंबाला त्याच्या हक्काच्या घरात राहता यावे यासाठी, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी असताना थेट दिल्ली गाठली. तत्कालीन केंद्र सरकारकडून ‘Basic Services to the Urban Poor (BSUP)’ योजना मंजूर करण्यात आली.
कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेमध्ये स्थायी समितीचा सभापती असताना शहरात मूलभूत सोईसुविधा उभारण्यासाठी तत्कालीन केंद्र सरकारच्या माध्यमातून जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेंतर्गत ₹ २६०० कोटी मंजूर करून आणले. या निधीतून बंदिस्त नाले, पाण्याच्या टाक्या, नेतीवली पाणी प्रकल्प इ. प्रकल्प राबवले.
शैक्षणिक क्षेत्रात डोंबिवली व कल्याण शहरातील एकही विद्यार्थी अशिक्षित राहू नये या भावनेने प्रेरित होवून महाराष्ट्रातील पहिली भव्य मोफत पुस्तक पेढी सुरु केली. या योजनेतून कल्याण-डोंबिवली आणि आसपासच्या परिसरातील हजारो शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमाची पुस्तके मोफत उपलब्ध करून दिली.
२००९ साली झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या पेपरफुटीविरुद्ध आवाज उठवत, विद्यार्थ्यांसाठी पुन्हा परीक्षा घेण्यास भाग पाडले.
मोठागांव-माणकोली ब्रिज हा डोंबिवली शहराला थेट ठाणे, मुंबई आणि नाशिक हायवेशी जोडणारा महत्त्वाचा ब्रिज असून त्यामुळे कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांचा प्रवास सुकर झाला.
गोविंदवाडी बायपास करिता उपोषण आणि संघर्ष केला. रस्त्यासाठी संघर्ष म्हणून जामीन घेण्यास नकार देऊन तुरुंगवास पत्करला. आता हा बायपास पूर्णत्वास गेला असून यामुळे कल्याण-डोंबिवलीतील वाहतूककोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात सुटली आहे.
डोंबिवलीत प्रथमच 'रस्ता हक्क परिषद' आयोजित करण्यात आली. या परिषदेतून नागरिकांच्या वाहतूक विषयक समस्या जाणून घेतल्या आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न केला.
२०११ साली डोंबिवलीतील बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर तत्कालीन आघाडी सरकारला जाब विचारण्यासाठी विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडला.
डोंबिवली स्टेशनवरून प्रवास करताना नागरिकांना जीव मुठीत धरावा लागे, कारण प्लॅटफॉर्म आणि लोकलच्या डब्यातील जीवघेणी गॅप! या गॅपविरुद्ध संघर्ष करत रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच DRM कार्यालयाला टाळे ठोकले.
डोंबिवलीकरांना शासकीय सेवा, प्रमाणपत्रे आणि माहिती जलद व सुलभपणे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने डोंबिवलीत सेतू कार्यालय सुरू केले, यामुळे प्रशासकीय प्रक्रिया सुलभ होऊन डोंबिवलीकरांचा वेळ आणि श्रम यांची बचत होत आहे.
डोंबिवली शहर हे 100% वीज बिल वसुली होणारे शहर असूनही डोंबिवलीत लोडशेडींगची फार मोठी समस्या होती. ‘महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोग (MERC)’ मध्ये या समस्येविरोधात कायदेशीर लढा दिला. या लढ्याचे यश म्हणून डोंबिवली हे ‘महाराष्ट्रातील पहिले लोडशेडिंग फ्री’ शहर झाले.
विस्तारित प्लॅटफॉर्म्स, मोठा ब्रिज, सरकते जीने आणि बसण्याची सोय या व अशा अनेक आरामदायी आणि सुरक्षित सुविधा डोंबिवलीकरांना मिळाल्या आहेत. एस्केलेटर, वॉटर एटीएम्स, स्टेशनच्या दोन्ही बाजूंना एसी टॉयलेट्स, स्वच्छतागृहं, लिफ्ट्स आणि डिजिटल डिस्प्ले बोर्ड्स यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर झाला आहे. अंदाजे १२० कोटी रुपये खर्चून डोंबिवली स्थानकाचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. तसेच डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजूच्या परिसराचे सुशोभिकरण करून डोंबिवलीच्या इतिहासात मानाचं स्थान मिळवलेल्या डोंबिवलीकरांविषयी माहिती फलक लावण्यात आले.
नागरिकांना गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे होणाऱ्या त्रासावर त्वरित उपाय म्हणून ‘गॅस अदालत’ आयोजित करून सिलेंडरच्या टंचाईवर मार्ग काढला.
डोंबिवलीत शिधा वितरणामध्ये उद्भवणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात या उद्देशाने डोंबिवली पूर्वेला स्वतंत्र शिधा कार्यालय उभारण्यासाठी यशस्वी पाठपुरावा केला.
डोंबिवली आणि आसपासच्या रेल्वे स्थानकांवरील समस्यांवर समस्यांना वाचा फोडण्यासाठी ‘डोंबिवली रेल परिषद’ आयोजित करण्यात आली.
डोंबिवलीतील घराघरात सुविधा पोहोचवण्यासाठी ‘गॅस पाईपलाईन’ योजनेचा पाठपुरावा केला. आता डोंबिवलीत हजारो घरांमध्ये गॅस पाइपलाइन बसवण्यात आली असून डोंबिवलीकरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल ठरले.
सावरकर रोड परिसरातूनच माझ्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. येथे असणाऱ्या उद्यानातील गर्दुल्ल्यांचे साम्राज्य उद्ध्वस्त करून तिथे अतिशय सुसज्ज असे सावरकर उद्यान उभारण्यात आले आहे. लहान मुलांसाठी सुरक्षित खेळण्याची जागा, तरुणांसाठी ओपन जिम, आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आरामदायी कट्टे – या सर्व सुविधांमुळे हे उद्यान प्रत्येकाला एक healthy lifestyle देतं आहे.अंदमान सेल्युलर जेलमध्ये वीर सावरकरांच्या कवितेची कोनशीला हटवण्याचा कॉंग्रेस नेत्याने प्रयत्न केला. या घटनेच्या निषेधार्थ सावरकर रोडवरील सावरकर गार्डनमध्ये स्वा. सावरकर अखंड ज्योत प्रज्वलित करण्यात आली. ही ज्योत गेल्या ४००० दिवसांपासून अखंड तेवत आहे.
आधुनिकतेच्या दिशेने पाऊल टाकत, डोंबिवलीकरांना मोफत वाय-फाय सुविधा उपलब्ध करून दिली.
नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी पूर्ण कल्याण-शीळ रस्त्याच्या काँक्रिटीकरण योजनेसाठी पाठपुरावा केला. यामुळे कल्याण, मुंबई आणि नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुकर झाला आहे.
वाढत्या वाहतुकीला तोंड देण्यासाठी जोशी हायस्कूल ते म्हसोबा चौक उड्डाणपुलाला मान्यता मिळवून दिली. यामुळे डोंबिवली पूर्व आणि डोंबिवली पश्चिम यांना जोडणारा एक नवीन मार्ग उपलब्ध झाला.
डोंबिवलीतील कायदा-सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी विष्णू नगर पोलीस स्टेशनचे यशस्वी स्थलांतर करण्यात आलं आणि टिळक नगर पोलीस स्टेशनची नव्याने निर्मिती करण्यात आली.
डोंबिवली आणि आसपासच्या परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी, काटई-ऐरोली रोड प्रकल्पाला मान्यता मिळवून दिली.
डोंबिवलीत जलमार्गाने प्रवास सुलभ होण्यासाठी नवीन जेट्टी बांधण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा पाठपुरावा केला. सध्या ही योजना प्रगतिपथावर आहे.
दुर्गाडी परिसरातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून नवीन पुलाला मान्यता मिळवून दिली, यामुळे कल्याण-डोंबिवलीतील वाहतूककोंडी कमी होण्यात मोलाचा हातभार लागला.
डोंबिवलीतील शेकडो इमारतींवर लादल्या जाणाऱ्या तिप्पट प्रॉपर्टी टॅक्स पेनल्टीविरोधात सातत्याने पाठपुरावा केला.
कल्याण-डोंबिवली ते तळोजा मेट्रो मार्गाच्या मागणीसाठी अथक पाठपुरावा केला. मेट्रोमॅन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात ५८६५ कोटी रुपये खर्चून कल्याण-डोंबिवली ते तळोजा मेट्रो मार्ग उभारण्यात येत आहे, या प्रकल्पामुळे कल्याण - डोंबिवली - नवी मुंबई असा प्रवास करणाऱ्या नागरिकांना किफायतशीर दरात सुरक्षित आणि सुखकर प्रवासाचा मार्ग उपलब्ध होईल.
शेकडो तरुणांना त्यांच्या क्षमतेला साजेसे काम मिळवून देण्यासाठी ‘सक्षम डोंबिवलीकर’ उपक्रमातून रोजगाराच्या नव्या वाटा उपलब्ध करून दिल्या.
मोदी सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत २७ गावांसाठी २८३ कोटींच्या पाणीपुरवठा प्रकल्पाला मंजुरी मिळावी, यासाठी पाठपुरावा केला. यामुळे या भागातील पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार आहे.
डोंबिवली शहर ठाणे जिल्ह्यातील शिक्षणाचे प्रमुख केंद्र म्हणून उदयास आले आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून डोंबिवलीत विविध महाविद्यालये आणि अभ्यासक्रम सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. ● साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटीचे फिजिओथेरपी कॉलेज ● डोंबिवली पश्चिम येथील शास्त्रीनगर येथे वैशालीताई जोंधळे विधी महाविद्यालय ● नेहरू रोड येथे जीआय लॉ कॉलेज ● टिळक नगर महाविद्यालय येथे विधी महाविद्यालय ● टिळक नगर कॉमर्स कॉलेजमध्ये बी.एफ. आणि बी.एम.एस. हे व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी मान्यता ● शिरोडकर एम्स नर्सिंग कॉलेजमध्ये बी.एससी. नर्सिंग अभ्यासक्रम
डोंबिवलीत नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘स्टार्टअप बूटकॅम्प’ आयोजित करण्यात आला, जिथे 120 नवउद्योजकांनी आपल्या बिझनेस आयडीया सादर केल्या.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि डोंबिवलीकर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवली पश्चिम येथील राजूनगर भागात प्रसन्न वातावरणात, हिरव्यागार निसर्ग सान्निध्यात आणि मुख्यतः उत्तम शेजार असलेल्या सुरक्षित इमारतीत ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘आपलं घर’ उभारण्यात आलं आहे.
१७३९ साली वसई किल्ल्याच्या लढाईत चिमाजी आप्पांच्या नेतृत्वात पोर्तुगीजांशी झालेल्या लढाईत वीरगती मिळालेले डोंबिवली शहराचे सुपुत्र वीरबंधू, मृत्युंजय आन ठाकूर आणि मान ठाकूर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आन मान ठाकूर शौर्यस्थळ उभारण्यात आले.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत सहा महिने अखंड कम्युनिटी किचनद्वारे दररोज शेकडो गरजूंसाठी मोफत भोजन सुविधा पुरवली. लॉकडाऊनच्या काळात औषधे, फवारणी, कम्युनिटी किचन, व्यावसायिक कंपन्यांना परवाने मिळवून देणे या विषयांबाबत सतत कार्यरत राहण्याचा प्रयत्न केला.
घनकचरा उपविधी म्हणून नागरिकांवर लादण्यात येणाऱ्या अन्यायकारक शुल्काविरुद्ध ठामपणे आवाज उठवला.
नवी मुंबई येथे उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी आक्रमक भूमिका घेतली. डोंबिवलीत साखळी आंदोलन आयोजित करण्यात आले, तसेच नवी मुंबई येथे आंदोलनात सहभागी झालो.
डोंबिवलीसह संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या माध्यमातून ‘आनंदाचा शिधा’ योजना जाहीर करण्यात आली. अवघ्या १०० रुपयांत शिधा उपलब्ध करून देऊन लाखो कुटुंबांना दिवाळीचं गिफ्ट दिलं.
७५व्या भारतीय लष्कर दिनाचे औचित्य साधून देशातील पहिला नागरी आर्मी डे डोंबिवली येथे लेफ्टनंट कर्नल श्री. संजय कुलकर्णी (सेवानिवृत्त) यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम करणारा अनोखा सोहळा संपन्न झाला. कॅ. विनयकुमार सच्चान स्मारक येथे रोषणाई, ओमकार शाळेच्या विद्यार्थ्यांच्या लयबद्ध बँड आणि स्काऊटनी तिथे दिलेली मानवंदना, फडके रोडवरची एनसीसी कॅडेट्सची परेड, लेफ्ट. जनरल कुलकर्णी सरांना दिलेले ‘गार्ड ऑफ ऑनर’ नंतर विवेक वडगबाळकर आणि गायक वादकांनी साकारलेली संगीतमय आदरांजली डोंबिवलीकरांच्या स्मृतींमध्ये चिरंतन राहतील.
डोंबिवलीमध्ये डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार, आणि भजनालंकार मंडळ, मॉरिशस यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदू संस्कृतीचा सांस्कृतिक मेळावा हा भव्य दिव्य कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडला. यावेळी महाराष्ट्रातील आणि मॉरिशसमधील कलाकारांच्या संगीत आणि नृत्याविष्काराचा रसिकांनी एकत्रित आस्वाद घेतला.
डोंबिवलीकर न्यू फोर्स अकॅडमीच्या माध्यमातून डोंबिवली आणि आसपासच्या परिसरातील तरुणाईला पोलीस/सैन्यदल भरती परीक्षांसाठी लेखी आणि मैदानी सराव अशा दोन्ही स्वरूपाचे विनामूल्य पूर्व प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून अनेक तरुण विविध सशस्त्र दलांमध्ये नियुक्त झाले आहेत.
डोंबिवलीतील टिळक रोडवरील ऐतिहासिक सूतिका गृहाच्या जागेवर कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि आपुलकी हेल्थ केअर प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने मॉडर्न मॅटर्निटी होम आणि कॅन्सर हॉस्पिटल उभारण्यात येत आहे. याचा डोंबिवलीकरांना फार मोठा फायदा होणार आहे.
विद्यार्थी म्हणून मिळणारे शिक्षण आणि इंडस्ट्रीला आवश्यक असलेला स्किल्ड वर्कफोर्स यामध्ये असणारी गॅप मिटवण्यासाठी डोंबिवलीकर प्रतिष्ठान व टीएनएस इंडिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने, नामांकित कंपनी कॅपजेमिनायच्या सहकार्याने, ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ समजली जाणारी ‘डिजिटल अकॅडमी’ स्थापन करण्यात आली. या अकॅडमी मध्ये ‘कॅम्पस टू टेक्निकल करियर’ तसेच ‘कॅम्पस टू फिनान्शियल करिअर’ अशा स्वरूपाचे अनेक उपक्रम राबवले जात आहेत.
डोंबिवली पश्चिम येथील गणेश घाट येथे डोंबिवलीकर भजन हितवर्धक महासंघाची नवीन इमारत बांधण्यात येत आहे. या कामासाठी आमदार निधीच्या माध्यमातून १ कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
डोंबिवलीतील विविध हाऊसिंग सोसायटीतील सार्वजनिक वापराच्या वीजेचे येणारे जास्त बिल आणि त्या बिलात वारंवार होणारी वाढ, तसेच याचा सोसायटी मेंटेनन्सच्या दरावर होणारा प्रतिकूल परिणाम या समस्यांवर रामबाण उपाय शोधून काढण्यात आला. डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील २६० हाऊसिंग सोसायट्यांमध्ये मोफत सोलार पॉवर सिस्टिम बसविण्यात येत आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात शवविच्छेदन केंद्र आणि नवजात शिशुंसाठी अतिदक्षता विभाग सुरू झाला आहे. तसेच ‘डोंबिवलीकर प्रतिष्ठान’च्या वतीने शास्त्रीनगर रुग्णालयाला अद्ययावत एक्स-रे मशीन भेट देण्यात आली.
गणेशोत्सव काळात विशेष महत्त्व असलेल्या जुनी डोंबिवली, गणेश नगर या परिसरातील गणेश घाट परिसरात डोंबिवलीकरांच्या हक्काचे विरंगुळा केंद्र उभारण्यात आले आहे. तसेच गणेश घाट येथे जेट्टी, आधुनिक सुविधा आणि गणेश घाटपर्यंत जाणाऱ्या जोडरस्त्यांचे कॉँक्रिटीकरण करण्यात आले आहे.
कल्याण-डोंबिवलीतील विविध रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यासाठी वेळोवेळी महाराष्ट्र शासनाकडून निधी आणला. या निधीतून जवळपास सर्व रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले असून डोंबिवलीकरांचा प्रवास सुखाचा झाला आहे.
पूर्वी दुर्गंधी, अनारोग्य, आणि अस्वच्छतेचं केंद्र असलेला जुनी डोंबिवली परिसरातील नाला आमदार निधीच्या माध्यमातून संपूर्ण बंदिस्त करण्यात आल्यामुळे दुर्गंधी आणि मच्छरांचा त्रास कायमचा संपला.
भागशाळा मैदानाच्या सुशोभिकरणामुळे आता मैदान अधिक सुसज्ज, आणि आधुनिक सुविधांनी युक्त झालं आहे. फुटबॉल, क्रिकेट इतर खेळांसाठी उत्तम जागा, व्यायामासाठी ओपन जिम आणि मुलांसाठी खेळण्याची साधनं – या सगळ्यामुळे डोंबिवलीतील युवा खेळाडूंना आपली कौशल्यं विकसित करण्याची संधी मिळते आहे.
कोपर रोड येथील तलावाच्या बाजूला वॉकिंग आणि जॉगिंग ट्रॅक बांधण्यात आला आहे, जेथे नागरिकांना ताजेतवाने होण्यासाठी एक स्पेस मिळाली आहे. तलावाच्या आजूबाजूला लावलेली हिरवीगार झाडं, बागा, आणि ओपन जिम या सुविधांमुळे हे ठिकाण विरंगुळ्याचं हक्काचं केंद्र म्हणून अधोरेखित होतं.
कोपरगांव परिसरातील अंतर्गत रस्त्यांचं काँक्रिटीकरण आणि सुधारणा करण्यात आली, यामुळे कोपरगांवमधील रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.
डोंबिवलीतील प्रत्येक गल्ली आणि रस्ता मजबूत, सुरक्षित, आणि आधुनिक होतोय. एवरेस्ट गल्लीचे काँक्रिटीकरण हे त्या बदलाचं एक ठळक उदाहरण आहे.
गोपीनाथ चौकातील नाल्याची दुरुस्ती आणि सुधारणा करण्यात आल्यामुळे या परिसरातील स्थानिकांच्या दैनंदिन जीवनात मोठा बदल झाला आहे.
पूर्वी दलदल असलेली ही जमीन आता मैदानात रूपांतरित झाली आहे, या मैदानाने डोंबिवलीच्या होतकरू खेळाडूंना आपले भविष्य घडवायची संधी उपलब्ध झाली आहे, तसेच ज्येष्ठ नागरिकांना आपल्या मित्रांसोबत काही क्षण आनंदात घालवण्यासाठी विरंगुळा केंद्र उपलब्ध झाले आहे.
डोंबिवलीतील म्हात्रे नगर प्रभागात अटल बिहारी वाजपेयी उद्यान आणि अटल बिहारी इनडोअर स्टेडियम उभारण्यात आले आहेत. हे उद्यान नागरिकांना विरंगुळ्यासाठी एकदम योग्य ठिकाण असून येथे मुलांसाठी खेळण्याची साधने, वयोवृद्धांसाठी बसण्याची सोय आणि सगळ्यांसाठी चालण्यासाठी मोकळा ट्रॅक आहे. तर इनडोअर स्टेडियम एक अत्याधुनिक व महत्त्वाचं क्रीडा केंद्र असून बॅडमिंटन, टेबल टेनिस, बुद्धिबळ आणि इतरही इनडोअर क्रीडा प्रकारांसाठी उत्तम सुविधा आहेत. या स्टेडियममुळे डोंबिवली आणि आसपासच्या परिसरातील खेळाडूंसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचा मार्ग आणखी प्रशस्त झाला आहे.
शेलार नाका परिसरातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात आल्यामुळे पावसाळ्यात होणारा चिखल, खराब रस्ते, आणि प्रवासातील अडथळे यांचा प्रश्न कायमचा संपला आहे. या रस्त्यामुळे प्रवास आता केवळ सोपा नाही, तर सुरक्षितही झाला आहे, ज्यामुळे वाहनचालक आणि पादचारी सर्वांना मोठा फायदा होत आहे.
प्लाझ्मा ब्लड बँकेसमोर उद्यान उभारण्यात आल्यामुळे धकाधकीच्या शहरात एक ताजेपणाचा, हिरवाईचा ओलावा देणारा कोपरा निर्माण झाला आहे, जिथे काही क्षण निवांतपणा अनुभवता येऊ शकतो.
चोळेगाव बालाजीनगर परिसरात अंतर्गत रस्त्यांचं जाळं नव्याने उभारण्यात आल्यामुळे बालाजीनगरचा परिसर आता सुरक्षित आणि प्रवासासाठी अत्यंत सोयीस्कर बनला आहे. पूर्वी वाहतुकीत असणारे अडथळे आणि पावसाळ्यातील कटकटी आता काँक्रिटीकरणाने नाहीशा झाल्यात.
टिळक नगरच्या गल्ल्यांमध्ये पहिल्या टप्प्यात काँक्रीट रस्ते तयार झाले आहेत, ज्यामुळे इथल्या नागरिकांना त्यांच्या रोजच्या प्रवासात खूप सोय झाली आहे.
डोंबिवलीतील बोरकर गल्लीत उभारण्यात आलेलं ‘वन प्लस सेंटर’ म्हणजे डोंबिवलीकर जेष्ठ नागरिकांसाठी caring आणि sharingची हक्काची जागा आहे, जिथे ज्येष्ठ नागरिक सन्मानाने, आनंदाने, आणि शांततेत आपला वेळ घालवू शकतात. या वन प्लस केंद्रात जेष्ठांसाठी आरामदायी कट्टे, चालण्यासाठी safe walkways आणि त्यांना हव्या त्या सर्व सुविधा आहेत.
डोंबिवलीतील नामदेव पथावर रॉकेल डेपो गल्लीमध्ये उभारलेलं ‘कुसुमाग्रज उद्यान’ हे फक्त एक उद्यान नाही, तर संपूर्ण परिसराला एक positive ऊर्जा देणारं केंद्र बनलं आहे. येथे लहान मुलांना खेळण्यासाठी एक सुरक्षित जागा आहे, तरुणांसाठी ओपन जिम आहे, आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी peaceful कट्टे तयार केले आहेत. या उद्यानामुळे गोपाळनगर, नामदेव पथ, दैवज्ञ कॉलनी परिसरातल्या नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात एक विरंगुळा मिळाला आहे.
डोंबिवलीतील आदर्शनगर आणि क्रांतीनगर या भागात आमदार निधीतून मूलभूत आणि पायाभूत सुविधा, रस्त्यांचं काँक्रीटीकरण, पाणी पुरवठा आणि ड्रेनेज व्यवस्था आणि अन्य सुविधा विकसित करण्यात आल्या. या कामांमुळे आता रस्त्यांची दुरावस्था, पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याची समस्या, आणि वाहतुकीच्या समस्या यांचं permanent solution मिळालं आहे.
सारस्वत कॉलनी परिसरात उभारण्यात आलेल्या स्व. राजश्री श्रीनिवास काळे (काकु) उद्यानात लहान मुलांसाठी safe play zone, तरुणांसाठी ओपन जिम आणि वॉकिंग ट्रॅक, ज्येष्ठ नागरिकांसाठी खास कट्टे अशा सर्व सुविधा आहेत. हे फक्त एक उद्यान नाही; हा एक lifestyle upgrade आहे, ज्यामुळे प्रत्येकाला healthy habits जोपासण्यासाठी प्रोत्साहन मिळतंय
इंदिरानगर आणि बंजारानगर परिसरात पाणी पुरवठा, ड्रेनेज सुविधा, अंतर्गत रस्ते, पायवाटा आणि रस्ते काँक्रीटीकरण अशी अनेक विकासकामे झाली आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर योजना निधी, मूलभूत सुविधा निधी, दलित वस्ती सुधारणा निधी अशा वेगवेगळ्या निधीतून जवळपास 50 कोटींहून अधिक खर्च करून इथल्या नागरिकांना सुसह्य जीवनमान देण्यासाठी कायम प्राधान्य देत आहे.
डोंबिवलीतील राजाजी पथ गल्ली क्रमांक ४ येथे असणारे गुरुवायूर मंदिर हे केरलीय समाजाचे श्रद्धास्थान! केरलीय समाजाच्या भावना लक्षात घेत येथे गुरुवायूरचे प्रतीक समजले जाणारे गजद्वार उभारण्यात आले आहे. ही कमान म्हणजे भाविकांसाठी आणि रहिवाशांसाठी एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळ बनलं आहे.
खंबाळपाडा परिसरातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात आल्यामुळे खंबाळपाडा परिसरातील रस्ते durable, आणि reliableझालेत, ज्यामुळे वाहनचालकांना आणि पादचाऱ्यांना आता सुरक्षितता आणि comfort मिळत आहे.
डोंबिवलीत फिश मार्केट आणि दत्तनगर आयरे रोड येथे महाराष्ट्रभूषण नानासाहेब धर्माधिकारी सभागृह उभारण्यात येत आहे.
भिवंडी-कल्याण-शीळफाटा या मार्गाच्या सहा पदरी रुंदीकरण करण्याच्या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्यात आली. तसेच ५६१ कोटी ८५ लाख रुपयांची तरतूद देखील करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुकर होणार आहे.
डोंबिवलीतील पेंढरकर कॉलेज ते घरडा सर्कल या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून १३.८० कोटी खर्च करून पूर्ण करण्यात आले आहे. यामुळे डोंबिवलीतील वाहतूक अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित झाली आहे.
डोंबिवलीतील स्टार कॉलनी ते मानपाडा चौक या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आले आहे. यामुळे डोंबिवलीकरांना चांगल्या रस्त्यांचा फायदा मिळत आहे.
गेल्या 6 वर्षांपासून भारतीय सैन्य दलातील जवानांचा सन्मान करण्यासाठी ‘गेट ऑफ इंडिया ते डोंबिवली’ अशा 65 किलोमीटर लांबीची ‘जी2डी अल्ट्रारन मॅरेथॉन’ आयोजित करण्यात येते.
क्रीडाप्रेमी डोंबिवलीत खेळाडू घडावेत यासाठी तरुण तसेच लहान मुलांना बॅट, जर्सी आणि इतर क्रीडा साहित्याचे वाटप केले जाते.
‘आरोग्याशी मैत्री’ या संकल्पनेतून ‘डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन’ हा हाफ मॅरेथॉन इव्हेंट सुरू झाला. २०२४ साली झालेल्या पहिल्या डोंबिवलीकर फ्रेंडशिप रनमध्ये ३५०० स्पर्धक सहभागी झाले होते.
कृषी विभाग आत्मा आणि कृषी पणन पुरस्कृत विंग्रो फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि. आणि डोंबिवलीकर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवली शहरात विविध ठिकाणी 'थेट शेतकरी ते ग्राहक' ही संकल्पना राबवली जात आहे. या आठवडी बाजाराच्या माध्यमातून डोंबिवलीकरांना थेट शेतकऱ्यांकडून सर्व प्रकारचा भाजीपाला, फळे, धान्य, कडधान्य आदी जिन्नस रास्त दरात मिळत आहेत.
डोंबिवली आणि आसपासच्या परिसरातील महिलांना उद्योग विश्वात पाऊल ठेवता यावे यासाठी ‘सक्षम भगिनी योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना घरबसल्या, विना भांडवल आणि आपल्या सवडीनुसार फ्रोजन फूड उद्योग करता येणार आहे.
डोंबिवली… महाराष्ट्रातील प्रमुख सांस्कृतिक नगरी ! आज आपल्या डोंबिवली शहराची जगभरात एक वेगळी सांस्कृतिक ओळख निर्माण झाली आहे आणि ही ओळख घडवण्यामध्ये ‘डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार’ या संस्थेच्या माध्यमातून सहभागी होता आलं
Get Started