श्रद्धेय डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी आणि श्रद्धेय पं. दीनदयाळ उपाध्याय यांनी भारतीय जनसंघ स्थापन केला. श्रद्धेय भारतरत्न अटलबिहारी वाजपेयीजी हे संस्थापक सदस्यांपैकी एक होते.
भारतीय जनसंघाने बॉम्बे स्टेट विधानसभा निवडणुकीत २ जागा लढवल्या
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीला जनसंघाचा पाठिंबा आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत जनसंघाचा सक्रिय सहभाग
बॉम्बे स्टेटच्या दुसऱ्या विधानसभा निवडणुकीत जनसंघाने २३ जागा लढवल्या, त्यापैकी ४ जागांवर विजय झाला.
बॉम्बे स्टेटच्या तीसऱ्या विधानसभा निवडणुकीत जनसंघाने एकूण ३९६ जागांपैकी ४ जागांवर भारतीय जनसंघाचा विजय
महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर राज्यात पहिल्यांदाच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जनसंघाने महाराष्ट्रातील १७ जागा लढवल्या
महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत १२७ जागांवर भारतीय जनसंघाने उमेदवार उभे केले होते
महाराष्ट्र स्थापनेनंतर दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत जनसंघाने महाराष्ट्रातील एकूण ४५ जागांपैकी २६ जागा लढवल्या
महाराष्ट्र राज्यातील दुसऱ्या विधानसभा निवडणुकीत जनसंघाने लढवलेल्या १६६ जागांपैकी ४ जागांवर विजय मिळाला.
महाराष्ट्र स्थापनेनंतर तिसऱ्या लोकसभा निवडणुकीत जनसंघाने महाराष्ट्रातील १३ जागा लढवल्या
महाराष्ट्र राज्यातील तिसऱ्या विधानसभा निवडणुकीत जनसंघाने लढवलेल्या १२२ जागांपैकी ५ जागा जिंकल्या.
आणीबाणी हटवण्यात आल्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत जनता पक्षाने महाराष्ट्रातील ३१ जागा लढवल्या, त्यापैकी १९ जागांवर विजय मिळवला होता, यामध्ये मुंबईतील सर्व जागांचा समावेश होता.
महाराष्ट्र राज्यातील तिसऱ्या विधानसभा निवडणुकीत जनता पार्टीने २१५ जागांपैकी ९९ म्हणजेच त्यावेळेस सर्वाधिक जागा जिंकल्या, परंतु कुठल्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही.
जनता पार्टी म्हणून अखेरच्या लोकसभा निवडणुकीत लढवलेल्या महाराष्ट्रातील ३१ जागांपैकी ८ जागांवर विजय
जनता पार्टीच्या फाटाफुटीनंतर ६ एप्रिल १९८० रोजी श्रद्धेय भारतरत्न अटलबिहारी वाजपेयीजी यांच्या नेतृत्वात मुंबई येथे भारतीय जनता पार्टी स्थापन करण्यात आली.
श्री. उत्तमराव पाटील यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेशचे पहिले अध्यक्ष म्हणून निवड, कार्यकाळ - १९८० ते १९८६
भारतीय जनता पार्टी म्हणून लढवलेली पहिली महाराष्ट्र विधानसभा निवडणूक. भाजपाने महाराष्ट्रातील १४५ जागा लढवल्या,त्यातील १४ जागांवर विजय. जनसंघाच्या काळापासून असलेल्या कार्यकर्त्यांची फळी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) मजबूत सामाजिक आधार भाजपसाठी महत्त्वाचा ठरला.
उत्तमराव पाटील, हशू आडवाणी, प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांसारख्या नेत्यांनी राज्यभर दौरे करून, विशेषतः ग्रामीण भागात पक्षाचा जनाधार वाढवण्यासाठी प्रयत्न केले.
भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रातील २० मतदारसंघात निवडणूक लढवली. परंतु इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर पसरलेल्या काँग्रेसविषयी देशभरात सहानुभूतीची लाट पसरली होती, त्यामुळे भाजपाला फारसे यश मिळाले नाही.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाने ८७ जागा लढवल्या, त्यातील १६ जागांवर भाजपाचा विजय
श्री. गोपीनाथ मुंडे यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेशचे दुसरे अध्यक्ष म्हणून निवड. कार्यकाळ - १९८६ -१९९१
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ३३ जागा लढवल्या, त्यापैकी १० लोकसभा मतदारसंघात भाजपाचे कमळ फुलले. या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा युतीची खऱ्या अर्थाने पायाभरणी झाली.
विधानसभा निवडणुकीत भाजपाचा 104 पैकी 42 जागांवर विजय.
श्री. एन. एस. फरांदेजी यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेशचे तिसरे अध्यक्ष म्हणून निवड. कार्यकाळ १९९१-१९९४
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ३१ जागा लढवल्या, त्यातील ५ जागांवर भाजपाचा विजय.
श्री. सूर्यभान वहाडणे पाटील यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेशचे चौथे अध्यक्ष म्हणून निवड. कार्यकाळ - १९९४-२०००
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा युतीला बहुमत.भाजपाने ११६ जागा लढवल्या, त्यातील ६५ जागांवर भाजपाचे कमळ फुलले. महाराष्ट्रात प्रथमच भाजपा राज्य सरकारमध्ये सहभागी झाला आणि भाजपाचे नेते गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना महायुतीचा विजय. भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला. महाराष्ट्रातील २५ जागा लढवल्या, त्यातील १८ लोकसभा मतदारसंघात भाजपाचे कमळ फुलले.
लोकसभा निवडणुकीत भाजपाने महाराष्ट्रातील २५ जागा लढवल्या, त्यातील फक्त ४ जागा राखता आल्या.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाने ११७ जागा लढवल्या, त्यापैकी ५६ जागांवर विजय, शिवसेना-भाजपा युती महाराष्ट्र विधिमंडळातील प्रमुख विरोधी पक्ष झाला.
लोकसभा निवडणुकीत भाजपाने महाराष्ट्रातील २६ जागा लढवल्या, त्यातील १३ जागांवर विजय.
श्री. पांडुरंग फुंडकर यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेशचे पाचवे अध्यक्ष म्हणून निवड. कार्यकाळ - २०००-२००५
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील २६ जागा लढवल्या, त्यापैकी १३ जागांवर भाजपाचा विजय.
महाराष्ट्र विधानसभेतील १११ जागा भाजपाने लढवल्या, त्यातील ५४ जागांवर भाजपाचा विजय, शिवसेना-भाजपा युती प्रमुख विरोधी पक्ष
श्री. नितीन गडकरी यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड. कार्यकाळ २४ नोव्हेंबर २००४ - १९ डिसेंबर २००९
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील २५ जागा लढवल्या, त्यातील ९ जागांवर भाजपाचा विजय
भाजपाने महाराष्ट्र विधानसभेतील ११९ जागा लढवल्या, त्यातील ४६ जागांवर भाजपाचा विजय, शिवसेना-भाजपा युती प्रमुख विरोधी पक्ष
श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड. कार्यकाळ - ३ एप्रिल २०१० - ११ एप्रिल २०१३
श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड. कार्यकाळ ११ एप्रिल २०१३ - ६ जानेवारी २०१५
मोदीजींच्या दूरदर्शी नेतृत्वाचा लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात देखील मेजर इम्पॅक्ट, भाजपाने लढवलेल्या महाराष्ट्रातील २४ जागांपैकी २३ जागा एकहाती जिंकत भाजपा लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरला.
भाजपाने देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात १६० जागा स्वबळावर लढवल्या. त्यातील १२२ जागांवर भाजपाचे कमळ फुलले. भाजपा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा राजकीय पक्ष ठरला. देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. नंतर शिवसेना देखील सत्तेत सहभागी झाली. देवेंद्रजींच्या नेतृत्वात विकासाचे महापर्व सुरू.
श्री. रावसाहेब दानवे यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड, कार्यकाळ - ६ जानेवारी २०१५ - १६ जुलै २०१९
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील २५ जागा भाजपाने लढवल्या, त्यापैकी २३ जागांवर भाजपाचा विजय.
श्री. चंद्रकांत पाटील यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून निवड. कार्यकाळ - १६ जुलै २०१९ - १२ ऑगस्ट २०२२
भाजपा आणि शिवसेनेने युतीमध्ये विधानसभा निवडणूक लढवली. देवेंद्रजी फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील हे निवडणुकीपूर्वीच जाहीर. लढवलेल्या १६४ पैकी १०५ जागांवर भाजपा विजयी. परंतु केवळ सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे यांनी नैसर्गिक युती तोडत काँग्रेस आणि तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी केली. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपा हा महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्ष बनला.
श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड, कार्यकाळ - १२ ऑगस्ट २०२२ - १ जुलै २०२५
अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उठाव. महायुतीचे ‘त्रिशूल सरकार’ स्थापन.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील २८ जागा भाजपाने लढवल्या, त्यातील ९ लोकसभा मतदारसंघात भाजपाचा विजय. काँग्रेसच्या फेक नरेटीव्हमुळे भाजपाची पीछेहाट.
इंडी आघाडीचे फेक नरेटीव्ह खोडून काढणे अशा विविध गोष्टींवर भाजपाचा भर
भाजपा-महायुतीला महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक यश. तब्बल २३५ जागांवर भाजपा-महायुतीचा विजय. भाजपाने लढवलेल्या १४९ जागांपैकी १३२ उमेदवार विजयी.
भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. “महाराष्ट्र आता थांबणार नाही !” हे भाजपा-महायुतीचे ब्रीद.
विधानसभा निवडणुकांमुळे महाराष्ट्रात प्रलंबित असलेल्या ‘संघटन पर्व’ अभियानाच्या अनुषंगाने भाजपा महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने महत्त्वाच्या पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या. माझ्यावर विश्वास दाखवून पक्षाने ‘भाजपा संघटन पर्व महाराष्ट्र प्रदेश प्रभारी’ या पदाची धुरा सोपवली.
भाजपा संघटन पर्व अभियानाचा महाराष्ट्रात शुभारंभ.
विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या महाविजयानंतर शिर्डी येथे भाजपा महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन संपन्न. ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही !’ ही थीम. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर विश्वास दाखवत पक्षाने माझी ‘भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष’ या पदी नियुक्ती केली.
भाजपा महाराष्ट्र संघटन पर्व - विभागीय कार्यशाळा संपन्न. तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि माझे प्रमुख मार्गदर्शन.
राज्यभरात १ कोटी ५१ लाख प्राथमिक सदस्य आणि १ लाख ३० हजारांपेक्षा जास्त सक्रिय सदस्य संख्येसह भारतीय जनता पार्टी हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरला. आगामी काळात सक्रिय सदस्य संख्या ३ लाखांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट.
भीमजयंती निमित्त ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन्मान अभियान’ राबवण्यात आले. यापूर्वी प्रदेश कार्यालयात कार्यशाळा घेत या अभियानाचे नियोजन करण्यात आले होते.
भाजपा महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने राज्यभरात १२२१ मंडले स्थापन. त्यापैकी पूर्वीपासून सक्रिय असणाऱ्या ९६३ मंडलांची फेररचना, तसेच २५८ नव्या मंडलांची स्थापना.
भाजपा परिवाराचे पक्ष संघटन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणखी मजबूत करण्यासाठी घराघरात जाऊन कार्यकर्त्यांनी जनतेशी संपर्क आणि संवाद साधला. यादरम्यान मोदी सरकार आणि फडणवीस सरकारच्या योजना, उपक्रम आणि त्याचा जनतेला होणारा लाभ या गोष्टी जनतेपर्यंत पोहोचवण्यात आल्या.
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय सशस्त्र दलाच्या सन्मानार्थ महाराष्ट्रभरात ‘तिरंगा यात्रा’ आयोजित करण्यात आल्या.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या त्रि-जन्मशताब्दी निमित्त महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात ‘अहिल्या सन्मान अभियान’ राबवण्यात आले.
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला ११ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, ‘संकल्प से सिद्धी तक’ या तत्त्वावर आधारित असणारी मोदी सरकारची कामगिरी जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष अभियान राबवण्यात आले. २ जून ते ६ जून २०२५ या काळात महाराष्ट्रातील विविध विभागांमध्ये जाऊन बैठका घेत या अभियानाचे नियोजन केले.
पक्षाने आणखी एकदा विश्वास दाखवला आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी माझी बिनविरोध निवड झाली. दीड कोटी सदस्य संख्येच्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या पक्षाची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडण्याचा प्रयत्न करीन!