‘सर्वांसाठी घरे’ हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून देशातील प्रत्येक कुटुंबाला या योजनेअंतर्गत पक्की घरे बांधून दिली जातात, महिला, भारतीय समाजातील आर्थिकदृष्ट्या मागासलेले घटक आणि अनुसूचित जाती/जमाती या समाजघटकांना या योजनेत विशेष प्राधान्य दिले जाते. महाराष्ट्रात ‘म्हाडा’ च्या माध्यमातून ही योजना राबवली जाते.
✅ पात्रता निकष
– अर्जदाराच्या कुटुंबात नवरा, बायको आणि अविवाहित मुले यांचा समावेश असेल,
– अर्जदार आणि त्याच्या/तिच्या कुटुंबातील कुठल्याही सदस्याचे देशातील कुठल्याही भागात पक्के घर नसावे.
– अर्जदार कुटुंब ज्या शहरात राहते ते शहर योजनेच्या निर्धारित सूचीत समाविष्ट असावे
– केंद्र सरकारद्वारे राबविण्यात आलेल्या कुठल्याही अन्य गृहनिर्माण योजनेचा लाभ अर्जदार कुटुंबास मिळालेला नसावा
✅ वार्षिक कौटुंबिक उत्पन्नानुसार वर्गवारी
– मध्यम उत्पन्न वर्ग २ (MIG 2)-१२ ते १८ लाख रुपये
– मध्यम उत्पन्न वर्ग (MIG) – ६ ते १२ लाख रुपये
– अल्प उत्पन्न वर्ग-३ ते ६ लाख रुपये
– आर्थिक दृष्ट्या दुर्बल वर्ग (EWS)-३ लाख रुपये
– ३ लाखांपेक्षा कमी उत्पन्न
✅ आवश्यक कागदपत्र
– आधार कार्ड.
– पॅन कार्ड.
– उत्पन्न प्रमाणपत्र.
– बँक खाते तपशील.
– घराच्या मालकीचे किंवा भाडेकराराचे दस्तऐवज.
– पासपोर्ट साइज फोटो.
✅अर्ज प्रक्रिया
pmaymis.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ‘Citizen Assessment’ विभागात ‘Apply’ करू शकतो. किंवा स्थानिक नगरपालिका किंवा MHADA कार्यालयात संपर्क साधून अर्ज करू शकतो
Leave Your Comment