कामानिमित्त देशातील दुसऱ्या राज्यात स्थलांतरित होणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना पूर्वी सार्वजनिक वितरण प्रणालीचा लाभ मिळत नव्हता, यामुळे गोरगरीब आणि मध्यमवर्गीय समाजाला येणाऱ्या समस्यांना या योजनेच्या माध्यमातून पूर्णविराम देण्यात आला. आता या योजनेचे लाभार्थी असलेल्या नागरिकांना आपल्या शिधापत्रिकेद्वारे देशातल्या कुठल्याही रेशन दुकानांवर लाभ घेता येतो.
📝 अर्ज कुठे करावा ?
- वन नेशन वन रेशन कार्ड योजनेसाठी कुठेही अर्ज करावा लागत नाही
- आपले रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे.
- केवळ आपल्याला आपले आधार कार्ड अपडेट करावे लागते.
- केवळ आधार कार्ड अपडेट केल्यानंतर आपले रेशन कार्ड अपडेट होते आणि आपल्याला या योजनेचा लाभ घेता येतो.
📞 हेल्पलाईन क्रमांक – १४४४५
Facebook
Twitter
LinkedIn
Email