दर वर्षी केवळ १२ रुपये प्रीमियममध्ये पुरवण्यात येणारा हा एक अपघाती विमा आहे. ज्यातून एखाद्या सदस्याचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपघातात विमाधारक विकलांग झाल्यास कुटुंबीयांना २ लाख रुपये देण्यात येतात
✅ पात्रता निकष
- अर्जदार १८ ते ७० वर्षे या वयोगटातील असावा
- या योजनेत सहभागी झालेल्या बँकेमध्ये अर्जदाराचे वैयक्तिक बँक अकाउंट असणे अनिवार्य आहे
- दरवर्षी खात्यातून १२ रुपये प्रीमियम ऑटो-डेबिट करण्याची परवानगी देणे अनिवार्य आहे
📄 आवश्यक कागदपत्र
- ओळखपत्र – आधार कार्ड / मतदार ओळखपत्र (ईपीआयसी)/ मनरेगा कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स/पॅन कार्ड/पासपोर्ट
- आधार कार्डशी संलग्न असणान्या सक्रिय बँक बचत खात्याचे पासबुक तपशील
जवळच्या बँक शाखेत जाऊन किंवा विमा एजंटशी संपर्क साधून या योजनेसाठी अर्ज करू शकता. https://www.jansuraksha.gov.in/
या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून या योजनेसाठी अर्ज करू शकता.