
समाजातील शेतकरी, कामगार, कष्टकरी यांच्यासह सर्व घटकांच्या विकासासाठी शासन विविध कल्याणकारी योजना राबवित असून या सर्व घटकांच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबद्ध आहे. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७०व्या वर्धापन दिनाचा रायगड जिल्ह्यातील मुख्य शासकीय समारंभ अलिबाग येथील पोलीस कवायत मैदानावर मोठ्या उस्ताहात पार पडला. या समारंभास जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आदितीताई तटकरे, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर, अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे आदी मान्यवर उपस्थित होते. पोलीस वाद्यवृंदाच्या तालावर राष्ट्रगीत झाले. यावेळी विविध क्षेत्रात उत्तम कार्य केलेल्या व्यक्ती व संस्थांना गौरविण्यात आले. या सोहळ्यास उपस्थित निवृत्त ॲडमिरल एल. रामदास तसेच उपस्थित स्वातंत्र्यसैनिक यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. या सोहळ्यास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. या समारंभात जिल्ह्यात विविध क्षेत्रात कामगिरी केलेल्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

Facebook
Twitter
LinkedIn
Email