या योजनेअंतर्गत १८ ते ४० या वयोगटातील नागरिकांना वृद्धावस्थेसाठी आर्थिक सुरक्षा पुरवण्यात येणार आहे. या योजनेत असंघटित क्षेत्रातील मजुरांचा समावेश देखील करून घेण्यात आल्यामुळे त्यांना देखील पेन्शन मिळणार आहे.
✅ पात्रता निकष
- अर्जदार १८ ते ४० वर्षे या वयोगटातील असणे अनिवार्य आहे.
- या योजनेत सहभागी असणाऱ्या बँकेमध्ये अर्जदाराचे बचत खाते असणे आवश्यक आहे.
- करदात्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही
- वैधानिक सामाजिक सुरक्षा योजनेचे सदस्य या योजनेअंतर्गत पात्र नाहीत.
📄 आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँक/पोस्ट ऑफिस खात्याचे पासबुक/तपशील
📝 अर्ज कुठे करावा ?
जवळच्या बँक शाखेत जाऊन किंवा विमा एजंटशी संपर्क साधून या योजनेसाठी अर्ज करू शकता.
https://www.jansuraksha.gov.in/ या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून या योजनेसाठी अर्ज करू शकता.