आराधना फाईन आर्ट अकादमीची संचालिका सौ. स्मिता मोरे यांची ‘आराधना’ ही संस्था डोंबिवली (प.) येथे गेली २३ वर्षे शास्त्रीय कथ्थक नृत्याच्या प्रशिक्षणासाठी सतत कार्यरत आहे. विविध उपक्रम आमच्या संस्थेतर्फे सातत्याने सुरू असतात. असाच एक नवीन उपक्रम डोंबिवलीमध्ये आराधना अकादमीतर्फे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे हे पहिले वर्ष आहे. विविध शास्त्रीय नृत्य शैलींवर आधारित *रेवाई नृत्य महोत्सव – २०१८* असे या उपक्रमाचे वैशिष्ट्य आहे.

सदर महोत्सवात या वर्षी ओडिसी नृत्य प्रस्तुतीसाठी भुवनेश्वरहून डॉ. गजेंन्द्रकुमार पंड्या आणि त्यांची शिष्या आर्या नांदेे यांची या कार्यक्रमाला उपस्थिती लाभली. तसेच भरतनाट्यम प्रस्तुतीसाठी डोंबिवलीचे युवा कलाकार पवित्र भट आणि कथ्थक नृत्य प्रस्तुती सौ. स्मिता मोरे आणि आराधनाचे शिष्य वर्ग यांचे योगदान महत्त्वाचे होते. या कार्यक्रमात शास्त्रीय नृत्यासाठी डॉ. गजेंन्द्रकुमार पंड्या, तसेच लोककलेसाठी प्रसिध्द ढोलकीवादक पांडुरंग घोटकर यांना रेवाई पुरस्काराने सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.

Facebook
Twitter
LinkedIn
Email
???