लेक लाडकी योजनेंतर्गत राज्यातील गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलींना आर्थिक साहाय्य प्रदान करून त्यांचे शिक्षण व सक्षमीकरण सुनिश्चित केले जाते.
📌 मुख्य वैशिष्ट्ये:
- लाभाची रक्कम: एकूण ₹१,०१,०००/- खालीलप्रमाणे टप्प्याटप्प्याने DBT च्या माध्यमातून थेट लाभार्थी मुलींच्या बँक खात्यावर हस्तांतरित केले जातात.
- जन्माच्या वेळी: ₹५,०००/-
- इयत्ता पहिलीत प्रवेश घेतल्यावर: ₹६,०००/-
- इयत्ता सहावीत प्रवेश घेतल्यावर: ₹७,०००/-
- इयत्ता अकरावीत प्रवेश घेतल्यावर: ₹८,०००/-
- वयाच्या १८ वर्षे पूर्ण झाल्यावर: ₹७५,०००/-
✅ पात्रता निकष:
- मुलीचा जन्म १ एप्रिल २०२३ नंतर झालेला असावा
- कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असावे
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा कमी असावे
- मुलीचे पालक महाराष्ट्राचे स्थायी रहिवासी असावेत
- दुसऱ्या प्रसूतीनंतर जुळ्या मुली जन्माला आल्यास, दोन्ही मुलींना योजनेचा लाभ मिळू शकतो, परंतु पालकांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली असावी.
✅आवश्यक कागदपत्र :
- मुलीचे जन्म प्रमाणपत्र
- मुलीचे व पालकांचे आधार कार्ड
- पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड
- उत्पन्न प्रमाणपत्र (तहसीलदार किंवा सक्षम अधिकाऱ्यांकडून)
- मुलीचा पासपोर्ट साइज फोटो
- बँक खाते तपशील (पासबुकची झेरॉक्स)
- शैक्षणिक टप्प्यांवर लाभासाठी संबंधित शाळेचा दाखला
📝 अर्ज प्रक्रिया :
- ऑफलाइन – अर्जदारांनी जवळील अंगणवाडी केंद्र, जिल्हा कार्यक्रम अधिकारी कार्यालय, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, किंवा जिल्हा परिषद कार्यालयात संपर्क साधावा.
- ऑनलाइन – womenchild.maharashtra.gov.in
- अर्जाची पडताळणी केल्यानंतर, पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात लाभाची रक्कम जमा केली जाईल