आ. रविंद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष, भाजपा महाराष्ट्र प्रदेश
Flower Top Left Flower Right Flower Bottom Left

जागोजागी शेततळे निर्माण करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्न यांमध्ये वाढ करणे. 

लाभार्थी पात्रता

१) शेतकऱ्यांकडे किमान ०.६० हेक्टर शेतजमीन असावी, कमाल मर्यादा नाही.

२) लाभार्थी शेतकऱ्याची जमीन शेततळ्याकरिता तांत्रिकदृष्ट्या पात्र असावी, जेणेकरून पावसाचे वाहणारे पाणी शेततळ्यामध्ये भरणे अथवा पुनर्भरण करणे शक्य होईल.

३) यापूर्वी अर्जदारांनी शेततळे, सामुदायिक शेततळे अथवा भात खाचरासोबत तयार होणारी बोडी या घटकांचा शासकीय योजनांमधून लाभ घेतलेला नसावा.

आवश्यक कागदपत्र:

  1. ७/१२ उतारा
  2. आधार कार्ड
  3.  (राष्ट्रीयीकृत बँकेचे) बँक पासबुक
  4. भू-नकाशा (सर्वे नंबरसह)
  5. जातीचा दाखला (जर अनुसूचित जाती/जमातीसाठी अर्ज करत असल्यास)
  6. शपथपत्र (शासनाने दिलेल्या नमुन्यानुसार)
  7. मोबाईल नंबर

ऑनलाइन अर्ज:

  • https://mahadbt.maharashtra.gov.in या पोर्टलवर अर्ज करावा
  • संबंधित योजनेच्या ‘शेती’ विभागांतर्गत ‘मागेल त्याला शेततळे’ योजना निवडावी
  • सर्व आवश्यक माहिती भरून कागदपत्र अपलोड करावीत
  • अर्ज सबमिट केल्यानंतर अर्ज क्रमांक (Acknowledgement) मिळतो

ऑफलाइन मार्ग (जिल्हानिहाय):

  • तालुका कृषी अधिकारी कार्यालयात भेट देऊन अर्ज करता येतो
  • संबंधित अधिकाऱ्यांच्या मदतीने अर्ज भरणे शक्य