आ. रविंद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष, भाजपा महाराष्ट्र प्रदेश
Flower Top Left Flower Right Flower Bottom Left

सौरऊर्जा वापराला चालना देण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोफत सौर कृषी पंप बसवून दिले जातात.   

📄 आवश्यक कागदपत्रे

  1. ७/१२ उतारा
  2. आधार कार्ड
  3. मागासवर्गीय जाती / जमातीचे प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  4. सामायिक शेती असल्यास इतर भागीदाराचे ना-हरकत प्रमाणपत्र
  5. पाणी प्रभावित क्षेत्र असल्यास संबंधित खात्याचा ना-हरकत दाखला
  6. कालवा / नदी येथून पाणी उपसा करण्याकरिता संबंधित खात्याचे ना-हरकत प्रमाणपत्र

✅ पात्रता

  1. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  2. स्वतःच्या नावावर शेती असावी.
  3. शाश्वत जलस्त्रोत (विहीर, बोरवेल, शेततळे) असावा.
  4. पारंपरिक वीज जोडणी नसावी.
  5. महावितरणकडे पैसे भरून प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य.

📝 अर्ज कुठे करायचा?

महावितरणच्या अधिकृत पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा:

https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY/index_mr.php