लघु उद्योजक आणि किरकोळ व्यापाऱ्यांना या योजनेअंतर्गत वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा
₹ ३००० पेन्शन मिळेल आणि वयाची ६० वर्षे पूर्ण होण्यापूर्वी एखाद्या लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना कुटुंब निवृत्ती वेतन म्हणून ५०% पेन्शन मिळण्याचा हक्क असेल.
✅ पात्रता निकष
- अर्जदाराच्या उद्योगधंद्याची वार्षिक उलाढाल १.५ कोटीपेक्षा जास्त नसावी.
- अर्जदार हा दुकानाचा स्वतः मालक असावा किंवा व्यापारी असावा.
- अर्जदार १८ ते ४० वर्ष या वयोगटातील असावा.
- अर्जदार आयकरदाता नसावा.
- NPS, ESIC, EPFO आणि प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना अशा इतर पेन्शन योजनांचा
लाभार्थी नसावा.
📄 आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- जन धन बँक अकाउंटचा संपूर्ण तपशील
जवळील कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन किंवा खाली दिलेल्या वेबसाइटमार्फत तुम्ही पेन्शनसाठी अर्ज करू शकता.
(एनपीएस – नॅशनल पेन्शन सिस्टीम)
https://enps.nsdl.com/eNPS/NationalPensionSystem.html