भाजपाचे नवे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून मा. रविंद्र चव्हाण यांची निवड – ही केवळ नेतृत्व बदलाची घोषणा नाही, तर पक्षाच्या विचारधारेच्या मुळाशी असलेल्या मूल्यांची पुनःप्रत्यक्षा आहे.
कारण त्यांच्या प्रवासात सत्ता किंवा पद हे कधीही स्वतःसाठी नव्हतं – तर पक्षासाठी होतं.
शर्टवर नेहमी लावलेला कमळाचा बिल्ला – तो फक्त चिन्ह नव्हे, तर त्यांच्या रक्तात आणि मनात खोलवर रुजलेली निष्ठा होती.
त्यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून संघटना उभी केली, मंत्रीपद सांभाळताना संयम, शिस्त आणि कर्तव्यनिष्ठा दाखवली.
२०१७ मध्ये विस्तारक योजनेच्या आढाव्यासाठी प्रदेश कार्यालयातून झालेला पहिला फोन – तेव्हाही त्यांच्या बोलण्यात तोच आत्मीय स्वर.
कधी आवाज उंच नाही, पण विचार ठाम.
कधी शब्द जास्त नाहीत, पण अर्थ स्पष्ट.
त्यांची ओळख म्हणजे मितभाषीपणा, पण त्याहीपेक्षा जास्त – कार्यकर्त्यांवर जिवापाड प्रेम.
पक्षातल्या प्रत्येक माणसाला कुटुंब मानण्याची वृत्ती.
“पक्ष माझा परिवार” ही संकल्पना ते फक्त बोलत नाहीत, तर जगतात.
आज त्यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी येणे – ही पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या आवाजाची मान्यता आहे.
ही निवड म्हणजे नेतृत्वगुणांना मिळालेली पावती, आणि कार्यकर्त्यांच्या निष्ठेचा सन्मान आहे.
मा. रविंद्र चव्हाण यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
या निवडीमुळे भाजप कुटुंब मजबूत होईल, कार्यकर्त्यांना आधार मिळेल, आणि पक्षाचा विचार अधिक दूरवर पोहोचेल – हीच अपेक्षा.
जय भाजप! जय महाराष्ट्र! जय हींद!
Ravindra Chavan
BJP Maharashtra
RavindraChavan4BJP #AamchaRaviDada #BJP4Maharashtra
अमित अरूण पडलवार