या योजनेंतर्गत देशातील ८० कोटी गोरगरिबांना सरकारकडून दर महिना ५ किलो अन्नधान्य मोफत दिले जात आहे. ही योजना २०२८ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
✅ पात्रता निकष
१) दारिद्र्यरेषेखालील कुटुंब
- केशरी शिधापत्रिकाधारक
- अंत्योदय अन्न योजनेचे लाभार्थी
२) पुढील प्रकारच्या व्यक्ती प्रमुख असणारे परिवार
- विधवा
- विकलांग
- दुर्धर आजाराने ग्रासलेली व्यक्ती
- ६० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वय असणारे
- ज्येष्ठ नागरिक
- सामाजिक पाठबळ आणि उपजीविकेचे साधन नसणारे (सिंगल) स्त्री/पुरुष
३) इतर लाभार्थी
- भूमिहीन शेतमजूर
- अल्पभूधारक शेतकरी
- ग्रामीण भागातील कारागीर
- असंघटित क्षेत्रातील मजूर/कारागीर
- आदिवासी जाती/जमाती
- दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील एचआयव्ही पॉझिटिव्ह व्यक्ती
- आवश्यक कागदपत्र
- आधार कार्ड
- जनधन/बँक पासबुक
- रेशन कार्ड
- मनरेगा कार्ड
या योजनेसाठी कुठेही अर्ज करावा लागत नाही. आपल्या रेशनकार्डनुसार रेशन दुकानावर या योजनेचा लाभ घेता येतो.