या योजनेअंतर्गत देशातील सर्व शेतकऱ्यांना किमान वार्षिक उत्पन्न म्हणून दरवर्षी ३ टप्प्यांमध्ये ६००० रुपये इतके अर्थसाहाय्य करण्यात येते.
✅कोणाला लाभ घेता येईल ?
- अर्जदाराच्या नावे शेतीयोग्य जमीन असावी.
- ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील शेतकऱ्यांना या योजनेसाठी अर्ज करता येतो.
- विशेषतः अत्यल्प आणि अल्प भूधारक शेतकऱ्यांना या योजनेत अर्ज करता येतो.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक अकाउंट असणे बंधनकारक आहे
राज्य सरकार आणि केंद्र सरकार, पीएसयू आणि सरकारी संस्थेत कार्यरत किंवा निवृत्त सरकारी अधिकाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
इन्कम टॅक्स भरणाऱ्या व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
मंत्री किंवा अन्य संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येणार नाही
दरमहा १०,००० रुपये किंवा त्याहून अधिक पेन्शन मिळणाऱ्या व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
❎कोणाला लाभ घेता येणार नाही ?
- राज्य सरकार आणि केंद्र सरकार, पीएसयू आणि सरकारी संस्थेत कार्यरत किंवा निवृत्त सरकारी अधिकाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- इन्कम टॅक्स भरणाऱ्या व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- मंत्री किंवा अन्य संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येणार नाही
- दरमहा १०,००० रुपये किंवा त्याहून अधिक पेन्शन मिळणाऱ्या व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
📄 आवश्यक कागदपत्रे
• आधार कार्ड
• बँक अकाउंट डिटेल्स
• जमीन मालकी कागदपत्र, सातबारा
• पासपोर्ट साईज फोटो
• रहिवासी दाखला
• उत्पन्नाचे प्रमाणपत्र
• मोबाईल नंबर
https://pmkisan.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर जाऊन या योजनेचा अर्ज दाखल करू शकता.