या योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी पिकांसाठी सर्वसमावेशक विमा संरक्षण पुरवण्यात येते, तसेच नैसर्गिक किंवा स्थानिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येते.
✅ पात्रता निकष
- शेतकरी हा विमा उतरवलेल्या जमिनीवर शेती करणारा किंवा शेतीकामात भाग घेणारा असावा.
- शेतकऱ्यांकडे वैध आणि प्रमाणित जमीन मालकी प्रमाणपत्र किंवा वैध जमीन भाडेकरार असणे आवश्यक आहे.
- शेतकऱ्याने विहित मुदतीत म्हणजे पेरणीचा हंगाम सुरू झाल्यापासून २ आठवड्यांच्या आत विमा संरक्षणासाठी अर्ज करावा.
- त्यांना त्याच पिकाची नुकसानभरपाई इतर कोणत्याही स्रोताकडून मिळाली नसावी.
- नावनोंदणीच्या वेळी शेतकऱ्याचे वैध बँक खात्याचे तपशील आणि ओळखपत्र सादर करावे.
- हंगामात अधिसूचित क्षेत्रामध्ये अधिसूचित पिके घेणारे सर्व शेतकरी ज्यांना पिकामध्ये विमा करण्यायोग्य स्वारस्य आहे ते पात्र आहेत.
📄 आवश्यक कागदपत्रे
- अर्जदाराचा एक फोटो
- अर्जदाराचे ओळखपत्र (पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, आधार कार्ड)
- अर्जदाराचा वास्तव्याचा पुरावा (ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, आधार कार्ड)
- शेत मालकीचे असल्यास सात-बारा उतारा / खाते नंबर आदी कागदपत्र, शेतात पिकांची पेरणी झालेली असल्याचा पुरावा, शेतकरी असल्याचे तलाठी, सरपंच तथा ग्रामसेवकांचे पत्रइ.
- जर शेत कसायला घेतले असल्यास व पीक पेरणी झाली असल्यास जमिनीच्या मालकासोबत केलेल्या कराराची फोटोकॉपी/झेरॉक्स
- अर्जदाराच्या बँक अकाउंटचा क्रॉस चेक
✔ प्रीमियम दर
- खरीप हंगामातील पिके – २% प्रीमियम
- रब्बी हंगामातील पिके – १५% प्रीमियम
- व्यापारी आणि बागायती पिके-५% प्रीमियम
जवळच्या बँकेत जाऊन किंवा http://pmfby.gov.in/ या लिंकवर क्लिक करून या योजनेचा अर्ज दाखल करता येतो.