पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेद्वारे भूमिहीन शेतमजुरांसह चालक, रिक्षाचालक, मोची, शिंपी, मजूर, घरकामगार, भट्टी कामगार अशा असंघटित क्षेत्रातील सर्व कामगारांना वृद्धापकाळात पेन्शन दिली जाते
✅पात्रता निकष
- अर्जदाराचे वय १५ ते ४० वर्षांदरम्यान असावे
- अर्जदार रोजंदारीवर चालणाऱ्या आणि निश्चित पगार/ रजा / पेन्शन नसणाऱ्या कुठल्याही
असंघटित क्षेत्रातील कामगार असावा
- अर्जदाराचे मासिक उत्पन्न १५,००० रुपये किंवा त्यापेक्षा कमी असणे अनिवार्य आहे
- अर्जदाराचे बँक अकाउंट (सेव्हिंग अकाउंट) आधार कार्डशी संलग्र असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार ईपीएफओ, एनपीएस, ईएसआयसी सारख्या योजनांचा लाभार्थी नसावा.
- केंद्र किंवा राज्य सरकारच्या कुठल्याही विभागात कायम, तात्पुरते किंवा कंत्राटी तत्त्वावर काम केलेले नसावे.
- अर्जदाराने कधीही इन्कमटॅक्स किंवा उत्पन्नावर कर भरलेला नसावा
📄 आवश्यक कागदपत्र
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- भ्रमणध्वनी क्रमांक
- क्यानुसार पहिले मासिक अंशदान
- श्रम यूएएन कार्ड नंबर (ऐच्छिक)
जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात किंवा https://maandhan.in/ या अधिकृत वेबसाईटवर लॉगइन करून या योजनेसाठी अर्ज दाखल करू शकता.