आ. रविंद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष, भाजपा महाराष्ट्र प्रदेश
Flower Top Left Flower Right Flower Bottom Left

दर वर्षी केवळ १२ रुपये प्रीमियममध्ये पुरवण्यात येणारा हा एक अपघाती विमा आहे. ज्यातून एखाद्या सदस्याचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपघातात विमाधारक विकलांग झाल्यास कुटुंबीयांना २ लाख रुपये देण्यात येतात

✅ पात्रता निकष

  • अर्जदार १८ ते ७० वर्षे या वयोगटातील असावा
  • या योजनेत सहभागी झालेल्या बँकेमध्ये अर्जदाराचे वैयक्तिक बँक अकाउंट असणे अनिवार्य आहे
  • दरवर्षी खात्यातून १२ रुपये प्रीमियम ऑटो-डेबिट करण्याची परवानगी देणे अनिवार्य आहे

📄 आवश्यक कागदपत्र

  • ओळखपत्र – आधार कार्ड / मतदार ओळखपत्र (ईपीआयसी)/ मनरेगा कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स/पॅन कार्ड/पासपोर्ट
  • आधार कार्डशी संलग्न असणान्या सक्रिय बँक बचत खात्याचे पासबुक तपशील

जवळच्या बँक शाखेत जाऊन किंवा विमा एजंटशी संपर्क साधून या योजनेसाठी अर्ज करू शकता. https://www.jansuraksha.gov.in/

 या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून या योजनेसाठी अर्ज करू शकता.