आ. रविंद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष, भाजपा महाराष्ट्र प्रदेश
Flower Top Left Flower Right Flower Bottom Left

देशाच्या ग्रामीण भागातील तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि दारिद्र्यरेषेखालील महिलांना पारंपरिक पद्धतीने चुलीवर जेवण शिजवावे लागत होते. या योजनेअंतर्गत या महिलांना एलपीजी गॅस कनेक्शन पुरवण्यात आले.  यामुळे या महिलांची चुलीच्या धुरापासून सुटका झाली.

✅ पात्रता निकष

ज्या घरात एलपीजी कनेक्शन नाही अशा गरजू कुटुंबातील प्रौढ महिला उज्वला योजने अंतर्गत पात्र असेल लाभार्थी कुटुंब खालीलपैकी कोणत्याही श्रेणीतील असणे आवश्यक आहे.

_____________________

  • SECC 2011 सूचीनुसार पात्र
  • अनुसूचित जाती जमातीतील कुटुंबातील, प्रधानमंत्री आवास योजना, अंत्योदय अन्न योजना, वनवासी, सर्वाधिक मागासवर्गीय, चहा आणि माजी चहा बागायतदार जमाती, नदी-बेटांवर राहणारे लोक (या वर्गात मोडत असल्याचा पुरावा द्यावा लागेल)
  • जर अर्जदार वरील २ श्रेणींमध्ये येत नसेल, तर १४-पॉइंट डिक्लेरेशन (विहित नमुन्यानुसार) सादर करून गरीब कुटुंबातील लाभार्थी असल्याचा दावा करता येतो.

📄 आवश्यक कागदपत्रे

  • फोटोयुक्त वैध ओळखपत्र  उदा. आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट इ.
  • ज्या राज्यातून अर्ज करत आहे त्या राज्य शासनाने जारी केलेले रेशन कार्ड / अन्य राज्य सरकारद्वारे जारी करण्यात आलेला परिवार संरचनेचा पुरावा / Annexure | अनुसार सेल्फ डिक्लेरेशन (प्रवासी अर्जदारांसाठी)
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • पासपोर्ट साईज फोटोग्राफ

आपल्या जवळच्या एलपीजी वितरण केंद्रामध्ये जाऊन किंवा https://www.pmuy.gov.in/index.aspx या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून या योजनेचा अर्ज दाखल करू शकता