गुलाबप्रेमींसाठी एक खुशखबर…!
गुलाबप्रेमींसाठी खास ‘राज्यस्तरीय गुलाब पुष्प प्रदर्शना’ चे आयोजन डोंबिवलीत करण्यात आले आहे.
गुलाबाच्या फुलाची नजाकत काही औरच असते. त्यांचे मनमोहक रूप, आकर्षक रंग, ताजा टवटवीत डौलदारपणा आणि सर्वात महत्त्वाची त्याची अतुलनीय अशी रोमँटिक व्हॅल्यू आबालवृद्धांच्या मनाला नक्कीच साद घालते.
विविध गुलाब पुष्पांप्रमाणेच यावेळी बोन्साय व अनोखे स्टॅम्पस् सुद्धा या प्रदर्शनात पाहावयास मिळणार आहेत. तेव्हा नक्की या प्रदर्शनाला भेट द्या.
दिनांक: ८ ते १० फेब्रुवारी २०१९
वेळ: सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत
स्थळ: बालभवन, रामनगर, डोंबिवली (पूर्व )
Facebook
Twitter
LinkedIn
Email