ग्रामीण तसेच शहरी भागातील दुर्बल घटकांसाठी अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील कुटुंबांना पक्के घर उभारण्यासाठी अर्थसाहाय्य पुरवले जाते.
✅ पात्रता निकष
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असावा
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) किंवा नवबौद्ध आणि अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांनाच लाभ
- दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे: लाभार्थी हा दारिद्र्य रेषेखाली असावा
- अपंगत्व प्रमाणपत्र (जर ४०% किंवा त्याहून अधिक अपंगत्व असेल तर) तसे लाभ घेता येईल
📄 आवश्यक कागदपत्रे
- ७/१२ उतारा, ८-अ उतारा, मालमत्ता नोंदपत्र किंवा ग्रामपंचायत मालमत्ता नोंदवहीतील उतारा
- घरपट्टी, पाणीपट्टी, किंवा विद्युत बिलाची पावती
- जात प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा दाखला
- मतदार ओळखपत्र
- शिधापत्रिका
- सरपंच/तलाठी प्रमाणपत्र
- महानगरपालिका/नगरपालिका मालमत्ता कर पावती
📝 अर्ज कुठे करावा ?
समाज कल्याण कार्यालय साहाय्यक आयुक्त, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक, जिल्हा परिषद/महापालिका आयुक्त यांच्याशी संपर्क साधावा.