संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत, निराधार व्यक्ती, विधवा, अपंग, आणि इतर गरजू लोकांना आर्थिक मदत दिली जाते.
✅ पात्रता
- अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा
- अर्जदाराचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे
- अर्जदाराकडे स्वतःचे घर किंवा जमीन नसावी
- अर्जदाराची मासिक उत्पन्न मर्यादा निश्चित केलेली असावी
- योजनेंतर्गत पात्र असलेल्या व्यक्तींची यादी येथे दिली आहे
📄 आवश्यक असलेली विशिष्ट कागदपत्र
- आधार कार्ड
- २ पासपोर्ट आकाराचे फोटो
- महाराष्ट्रातील निवास प्रमाणपत्र/अधिवास प्रमाणपत्र
- बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स
- वयाचा पुरावा: जन्म प्रमाणपत्र, शाळेचा किंवा वयाचा दाखला
- उत्पन्नाचा दाखला/बीपीएल कार्ड
- अपंगत्व/मोठा आजार/तृतीयपंथी असल्यास संबंधित वैद्यकीय प्रमाणपत्र
- विधवा असल्यास मॅरेज सर्टिफिकेट आणि पतीचा मृत्यू दाखला
📝 अर्ज करण्याची प्रक्रिया
ऑफलाइन अर्ज
- सेतू केंद्र / तहसील कार्यालय / तलाठी कार्यालय / जिल्हाधिकारी कार्यालय येथे भेट द्या.
- अर्ज फॉर्म मिळवा आणि आवश्यक माहिती भरून आवश्यक कागदपत्रांसह सादर करा.
- अर्ज सादर केल्याची पोचपावती मिळवा.
ऑनलाइन अर्ज:
- आपले सरकार पोर्टल वर जाऊन ‘संजय गांधी निराधार अनुदान योजना’ निवडा.
आवश्यक माहिती भरून वरील कागदपत्र अपलोड करा आणि अर्ज सबमिट करा.