सांस्कृतिक उपक्रम
गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागतयात्रा आयोजित करण्याची सुरुवात आपल्या डोंबिवलीत झाली. युवामोर्चा कार्यकर्ता असल्यापासूनच गुढीपाडवा शोभायात्रेत सहभागी होतो. या यात्रेच्या प्रमुख आकर्षणांपैकी एक म्हणजे डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवाराचा चित्ररथ.
भाजपा डोंबिवली शहर यांच्या वतीने सुमारे 20 वर्षांपासून दहीहंडी उत्सव आयोजित केला जातो. या उत्सवात दरवर्षी डोंबिवली आणि आसपासच्या परिसरातील अनेक गोविंदा पथके उत्साहात सहभागी होतात. विशेष म्हणजे गोविंदांच्या सुरक्षेसाठी सेफ्टी बेल्ट वापरणारा हा महाराष्ट्रातील पहिला दहीहंडी उत्सव आहे. गोविंदांच्या जल्लोषाने हा दहीहंडी उत्सव ‘डोंबिवली शहराचा मानबिंदू’ ठरला आहे.
राम जन्मभूमी मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने डिसेंबर 2023 ते जानेवारी 2024 या काळात अयोध्या मंदिराची हुबेहूब प्रतिकृती उभारून डोंबिवलीकरांना अयोध्या राम मंदिराचे दर्शन घडवण्यात आले. यासोबतच ‘श्री राम आगमन खुशहाली महोत्सव’, ‘डोंबिवलीकर कारसेवकांचा सत्कार सोहळा’ आणि ‘संपूर्ण गीत रामायण आनंद सोहळा’ असे विविध उपक्रम राबवण्यात आले. राम जन्मभूमी मंदिर प्रतिष्ठापनेचा आनंद व्यक्त करणाऱ्या एका विशेष गीताचे अनावरण देखील करण्यात आले.
डोंबिवली म्हणजे खऱ्या अर्थाने साहित्यनगरी ! या शहराने मायमराठीला अनेक साहित्यरत्नं दिली आहेत. डोंबिवलीतील लेखक, कवी, साहित्यिक आणि रसिकांना एक व्यासपीठ मिळावे, यासाठी डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवाराच्या माध्यमातून ‘डोंबिवलीकर मासिक’ काढण्यात येते.
डोंबिवलीतील विविध आदर्श व्यक्तिमत्त्वांना डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवाराच्या माध्यमातून आदर्श डोंबिवलीकर पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो.
डोंबिवलीकर रसिकांना जागतिक ख्यातीच्या गायक आणि वादकांच्या कलाकृतींचा आस्वाद घेता यावा, यासाठी ‘डोंबिवलीकर संगीत महोत्सव’ आयोजित करण्यात आला.
डोंबिवलीतील लेखक, कवी, साहित्यिक आणि रसिकांना एक व्यासपीठ मिळावे, यासाठी दिवाळीला ‘डोंबिवलीकर दिवाळी अंक’ प्रकाशित करण्यात येतो.
डोंबिवलीतील विविध क्षेत्रांतील आदर्श व्यक्तिमत्त्वांचे प्रेरणादायी कार्य लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी दरवर्षी ‘डोंबिवलीकर दिनदर्शिका’ प्रकाशित करण्यात येते.
डोंबिवलीतील कवी आणि लेखकांना हक्काची प्रकाशन संस्था उपलब्ध व्हावी यासाठी ‘डोंबिवलीकर प्रकाशन’ कार्यरत आहे.
डोंबिवलीकरांना रोजच्या ताण-तणावातून थोडा वेळ काढून, दोन दिवस आपल्या माणसांसोबत आनंदात घालवता यावेत यासाठी दरवर्षी डोंबिवलीकर रोझ फेस्टिवलचे आयोजन करण्यात येते.
डोंबिवलीतील गायकांसाठी गायनाची स्पर्धा आयोजित करण्यात येते आणि विजेत्यांना ‘डोंबिवलीकर सुपर सिंगर’ पुरस्काराने गौरवण्यात येते.
डोंबिवलीतील डान्सर्ससाठी नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात येते आणि विजेत्यांना ‘डोंबिवलीकर सुपर डान्सर’ पुरस्काराने गौरवण्यात येते.
डोंबिवलीतील बच्चेकंपनीच्या आनंदासाठी वर्षातील एक दिवस ‘डोंबिवलीकर किलबिल फेस्टिव्हल’ आयोजित करण्यात येतो, यामुळे बच्चेकंपनीला एक दिवस बालमित्रांसोबत मजामस्तीत घालवता येतो.
डोंबिवलीतील गायक आणि वादकांना त्यांच्या हक्काची स्टुडिओ सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी ‘डोंबिवलीकर स्टुडिओ’ उभारण्यात आला आहे.