आ. रविंद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष, भाजपा महाराष्ट्र प्रदेश
Flower Top Left Flower Right Flower Bottom Left

कुडा-मातीच्या घरात राहणाऱ्या किंवा बेघर असणाऱ्या, अनुसूचित जमातीतील पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या मालकीचे पक्के घर उपलब्ध करून देणे.  

  • ✅ पात्रता
  • 1. लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमाती संवर्गातील असावा.
  •  2. लाभार्थ्यांचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान १५ वर्षांचे असावे. 
  • 3. लाभार्थ्यांकडे स्वत:ची किंवा शासनाने दिलेली जमीन असणे आवश्यक राहील. 
  • 4. लाभार्थ्यांकडे स्वत:चे किंवा कुटुंबीयांचे पक्के घर नसावे. 
  • 5. विधवा, परित्यक्ता, निराधार, दुर्गम भागातील लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल.
  •  6. अर्जदाराच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा खालीलप्रमाणे :- 
  • अ) ग्रामीण क्षेत्र – रु. १ लाख 
  • ब) नगरपरिषद क्षेत्र – रु. १.५० लाख 
  • क) महानगरपालिका क्षेत्र – रु.२ लाख
  • 📄 आवश्यक कागदपत्रे
  • 1. अर्जदाराचे नजिकच्या काळातील दोन पासपोर्टसाईज फोटो 
  • 2. जातीचे प्रमाणपत्र 
  • 3. रहिवासी प्रमाणपत्र 
  • 4. 7/12 उतारा व नमुना 8-अ 
  • 5. शाळा सोडल्याचा दाखला/वयाचा दाखला
  • 6. जागा उपलब्धतेचे प्रमाणपत्र 
  • 7. तहसीलदार यांचेकडून प्रमाणित उत्पन्नाचा दाखला 
  • 8. शासन वेळोवेळी विहित करतील अशी कागदपत्रे
  • 9. ग्रामसभेचा ठराव
  • 📝 अर्ज कुठे करावा ? 
  • संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प