देशाच्या ग्रामीण भागात हागणदारीमुक्त गावांची संख्या (ODF Villages) वाढवणे, तसेच घन कचरा व स्वच्छतेचं योग्य व्यवस्थापन करणे हा या अभियानाचा उद्देश आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या दूरदृष्टीतून सुरु झालेल्या या अभियानात देशवासियांनी हिरीरीने सहभाग घेतला.
✅या योजनेअंतर्गत वैयक्तिक शौचालय उभारणीसाठी अनुदानास पात्र कुटुंबं
- दारिद्र्यरेषेखालील सर्व कुटुंबं
- अनुसूचित जाती/ जमातीतील कुटुंब
- शारीरिकदृष्ट्या विकलांग सदस्य असलेली कुटुंबं
- भूमिहीन शेतमजूर, अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी या सर्वांना वैयक्तिक शौचालयासाठी १२,००० रुपये पर्यंत अनुदान दिले जाईल
- प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत घर बांधताना ज्यांच्या घरात स्वच्छता सुविधा उभारण्यात आली नव्हती, अशा कुटुंबांना घरात स्वच्छता सुविधा निर्माण करायची असल्यास स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्रोत्साहन अनुदान देण्यात येईल.
📄 आवश्यक कागदपत्र
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- पासपोर्ट साईज फोटो
📝 https://sbmurban.org/ या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून आपण अनुदानासाठी अर्ज करू शकता.