या योजनेअंतर्गत १८ ते ४० या वयोगटातील नागरिकांना वृद्धावस्थेसाठी आर्थिक सुरक्षा पुरवण्यात येणार आहे. या योजनेत असंघटित क्षेत्रातील मजुरांचा समावेश देखील करून घेण्यात आल्यामुळे त्यांना देखील पेन्शन मिळणार आहे.
✅ पात्रता निकष
अर्जदार १८ ते ४० वर्षे या वयोगटातील असणे अनिवार्य आहे.
या योजनेत सहभागी असणाऱ्या बँकेमध्ये अर्जदाराचे बचत खाते असणे आवश्यक आहे.
करदात्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही
वैधानिक सामाजिक सुरक्षा योजनेचे सदस्य या योजनेअंतर्गत पात्र नाहीत.
📄 आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
बँक/पोस्ट ऑफिस खात्याचे पासबुक/तपशील
📝 अर्ज कुठे करावा ?
जवळच्या बँक शाखेत जाऊन किंवा विमा एजंटशी संपर्क साधून या योजनेसाठी अर्ज करू शकता.
https://www.jansuraksha.gov.in/ या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून या योजनेसाठी अर्ज करू शकता.
Leave Your Comment