देशातील प्रत्येक घटकाला सर्वोत्तम आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी मोदी सरकारने सुरु केलेली आयुष्मान भारत जनआरोग्य योजना ही जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना आहे. ज्या योजनेच्या माध्यमातून देशाच्या ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील आणि मध्यमवर्गीय घटकांतील कुटुंबांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंतचे उपचार मिळत आहेत.
📝 अर्ज कोण करू शकतो ?
अनुसूचित जाती/जमातीतील कुटुंब
भिकारी किंवा भीक मागून जगणारे
१६ ते ५९ या वयोगटातील सदस्य नाहीत अशी कुटुंब
घरात सक्षम व्यक्ती नाही आणि विकलांग व्यक्ती आहेत अशी कुटुंब
भूमिहीन शेतमजूर, असंघटित क्षेत्रातील कामगार
आदिवासी जनसमुदाय
बेघर/कच्च्या घरात राहणारे कुटुंब
हरिजन वर्ग
कर्ज फेडण्यासाठी सावकारांकडे मजुरी करणारे लोक
✅ पात्रता निकष
घरात दुचाकी/रिक्षा/चारचाकी वाहने तसेच मोटारवर चालणारी मासेमारी बोट नसावी.
आपल्या शेतजमिनीत यांत्रिक शेती उपकरणे नसावीत.
५०,००० रुपये क्रेडिट मर्यादेसह किसान कार्ड नसावे.
कुटुंबातील कोणीही सरकारी/शासकीय सेवेत कार्यरत नसावे.
कुटुंबातील सरकार-व्यवस्थापित बिगर-कृषी उपक्रमांमध्ये कार्यरत नसावे.
मासिक उत्पन्न १०,००० रु. किंवा त्यापेक्षा कमी असावे.
घरात रेफ्रिजरेटर आणि लँडलाईन नसावे.
कुटुंबाच्या मालकीचे चांगले/पक्के घर नसावे.
आपल्या मालकीची ५ एकर किंवा त्याहून अधिक शेतजमीन नसावी.
📄 आवश्यक कागदपत्रे:
वय आणि ओळखीचा पुरावा (आधार कार्ड/पॅन कार्ड)
संपर्क तपशील (मोबाइल, पत्ता, ईमेल)
जात प्रमाणपत्र
उत्पन्न प्रमाणपत्र
अर्जदार कुटुंबाच्या सद्य:स्थितीचा कागदपत्र पुरावा
📝अर्ज कुठे करावा ?
या योजनेत सामील होण्यासाठी कुठेही अर्ज करावा लागत नाही.
Leave Your Comment