स्वतःचे पोट भरण्यासाठी गरोदरपणात देखील काम करणाऱ्या मातेला अर्थसाहाय्य पुरवून तिच्या आरोग्याची काळजी घेणे, तसेच बाळाला कुपोषित होण्यापासून वाचवणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.
✅ पात्रता निकष
अर्जदार गर्भवती महिला असावी
अर्जदार महिलेचे वय १९ वर्ष पूर्ण असणे अनिवार्य आहे
पहिल्यांदा गर्भार राहिलेल्या महिलाच या योजनेसाठी पात्र असतील.
एरवी कार्यरत असणाऱ्या अर्जदार महिलेला गर्भारपणामुळे मजुरी मिळत नसेल, तर त्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येईल.
📄 आवश्यक कागदपत्र
अर्जदार महिला व पतीचे सहमतीपत्र
अर्जदार दारिद्रयरेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र
अर्जदार महिला व पतीचे आधारकार्ड
घरपट्टी पावती
अर्जदार महिलेचे आधार संलग्र बँक खाते किंवा पोस्ट खाते
वीजबिल रेशन कार्ड
ई-मेल आयडी
पासपोर्ट आकाराचे फोटो
रहिवाशी दाखला
महिलेचा / पतीचा मोबाईल क्रमांक
जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज करता येतो. तसेच pmmvy.nic.in या अधिकृत वेबसाईटवर लॉगिन करून आपण या योजनेसाठी अर्ज करू शकता
Leave Your Comment