उत्तर काश्मिरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमध्ये भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात केलेल्या मोठ्या कारवाईत महाराष्ट्राचे सुपुत्र मेजर कौस्तुभ प्रकाश राणे यांना वीरमरण आलं. मीरा रोडच्या शीतल नगर येथील हिरल सागर इमारतीत राणे कुटुंब राहतं. ते मूळचे कोकणातल्या वैभववाडीचे आहेत. यंदा कौस्तुभ यांना सेना पदकाने सन्मानित करण्यात आले होते.
मेजर कौस्तुभ प्रकाश राणे यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो आणि हे दु:ख सहन करण्याची शक्ती परमेश्वर त्यांच्या कुटुंबीयांना देवो, अशी मी प्रार्थना करतो.
Leave Your Comment