शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (सिडको) तर्फे ‘सर्वांसाठी घरे’ धोरणाअंतर्गत आर्थिक दुर्बल व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी‘महागृहनिर्माण योजनेत’ साकारण्यात येणाऱ्या १४ हजार ८३८ घरांच्या ऑनलाईन सोडत अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.
यावेळी बोलताना पुढील टप्प्यात आणखी २५ हजार घरांची सोडत या वर्षाअखेरीस जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. https://lottery.cidcoindia.com/ या संकेतस्थळावरून या अर्ज प्रक्रियेस प्रारंभ करण्यात आला. प्रत्यक्ष अर्ज नोंदणीस १५ ऑगस्टपासून सुरुवात होणार असून १६ सप्टेंबरपर्यंत अर्ज स्वीकृती केली जाणार आहे, तर २ ऑक्टोबर रोजी सोडतीची लॉटरी काढण्यात येणार आहे.
Leave Your Comment