भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर कोण? असं म्हटलं, तर डॉ. आनंदीबाई जोशी हे नाव आपसूकच आपल्या मुखातून येतं. ज्यावेळी महिलांना प्राथमिक शिक्षण घेण्यासाठीही संघर्ष करावा लागत होता त्यावेळी आनंदीबाईंनी थेट वैद्यकशास्त्राचा अभ्यास करून डॉक्टर होण्याचा बहुमान मिळवला. महिलांच्या उद्धारासाठी त्यांनी उचललेलं हे क्रांतिकारी पाऊल आज वैद्यकशास्त्रच नाही तर विविध क्षेत्रात महिलांना कार्य करण्यासाठी बळ देत आहे. ‘आता माझी पाळी’ या उपक्रमाची सुरुवात आनंदीबाईंच्या नावाप्रमाणेच आनंदी व्हावी, हाच यामागचा हेतू आहे. मासिक पाळीचा स्वीकार महिलांसह पुरुषांनीही करावा आणि तितक्याच आनंदात त्याचा प्रचार व प्रसार करावा, हेच ‘आता माझी पाळी’चे ध्येय आहे. महिलांच्या आरोग्यासाठी तळमळीने सातासमुद्रापार जाणाऱ्या आनंदीबाईंसारखं सर्व महिलांनी आता या कोशातून बाहेर यायला हवं आणि हक्काने म्हणावं…
“आता माझी पाळी!”
नोंदणीसाठी शेजारील ‘आनंदी फॉर्म’ भरा.
आधुनिक तंत्रज्ञान वापरून आर्थिक भौगोलिक सामाजिक समानतेच्या तत्त्वावर उत्तम उच्च शिक्षण देणारे मोफत डिजिटल व्यासपीठ उभारणे.
आजची युवा पिढी जगाचे नागरिक होण्यास सज्ज आहेत. उत्तम शिक्षण हा त्यांच्या उज्ज्वल भविष्याचा पासपोर्ट आहे. दर्जेदार शिक्षण आणि कौशल्यपूर्ण प्रशिक्षण मिळालेली युवा पिढीच स्पर्धात्मक युगात अग्रेसर राहिल. भारत आणि भारतीयांना जागतिक शक्तीत रूपांतर करण्याचं ध्येय ठेवून युवा पिढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानयुक्त डिजिटल व्यासपीठ उभारण्याचे मिशन ठेवले आहे.
भारताला युवा मनुष्यबळ पुरवणारी जगाची राजधानी असे म्हटले जाते. देशाची 67% लोकसंख्या चाळीशी पेक्षा कमी वयोगटातील आहे. मात्र कमी शिकलेली आणि कौशल्यापासून वंचित युवा पिढी ही आपल्या देशाची दुखरी नस आहे. आर्थिक दुर्बलता आणि भौगोलिक मर्यादा हे दोन घटक दर्जेदार शिक्षणापासून युवा पिढीला वंचित ठेवण्यास जबाबदार आहेत.
विविध विषयातील नामवंत शिक्षक व प्रशिक्षकांच्या माध्यमातून व्हिडीओद्वारे विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक मार्गदर्शन देणारे डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे व्रत रविंद्र चव्हाण यांनी स्वीकारले आहे.
देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी प्रत्येकाला व्यावसायिक दृष्ट्या कौशल्यपूर्ण बनविण्याचे स्वप्न बाळगले आहे. त्यातुनच प्रेरणा घेऊन युवा पिढीला कौशल्यवान बनविण्याच्या योजनेतील पहिली पायरी म्हणून टॅली कोर्स सुरु करतोय. या डिजिटल व्यासपीठातून कुशल होऊन कॉर्पोरेट जगतात इंटर्नशिपसाठी पाठवण्याचे पहिले पाऊलही टाकण्यास आम्ही सज्ज होतोय.
कौशल्यवान भारतीय….श्रेष्ठ भारत !
A) वेबसाइट उघडा नोंदणीसाठी येथे क्लिक करा
— 1) जर तुम्ही नोंदणी केली असेल तर कृपया वापरकर्तानाव & तुम्हाला ईमेलमध्ये मिळालेला पासवर्ड अन्यथा खालील स्टेप्स फॉलो करा.
B) फोटो अपलोड करा आणि डेटा भरा ( नावे, लिंग, जन्मतारीख इ. )
C) Verify and Register या बटणावर क्लिक करा
D) तुम्हाला खालीलप्रमाणे OTP मिळेल
E) टेक्स्ट बॉक्समध्ये OTP भरा
F) एकदा तुम्ही तपशील सेव्ह केल्यानंतर तुम्हाला वापरकर्तानाव मिळेल & पासवर्ड.
G) युजरनेम & पासवर्ड द्वारे लॉगिन करा जे तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत ईमेलमध्ये मिळेल.