बजरंगदल,रा.स्व.संघाचे काम व निवडणूकांच्या काळात बूथ वर घरोघरी मतदानाची चिट्ठी वाटण्यापासून सुरु झालेला प्रवास ते आता भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष या प्रेरणादायी प्रवासाचे मानकरी आणि एक कृतिशील नेतृत्व व कार्यकर्त्यांचे आधार मा.रविंद्र जी चव्हाण साहेब यांचे मनस्वी अभिनंदन…
“प्रथम राष्ट्र,नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः” हा पक्षाचा मंत्र प्रत्यक्षात जगणारा कार्यकर्ता जेव्हा त्याच पक्षाचा अध्यक्ष होतो त्यावेळी सुरु होते खरे “संघटन पर्व” आणि रवि दादा नक्कीच या पर्वाच्या माध्यमातून संघटना महाराष्ट्रातील शेवटच्या व्यक्ती पर्यंत पोहोचवतील हा विश्वास आहे.
2002 ला कल्याण जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष म्हणून पक्षीय कार्यात सक्रिय झालेल्या दादांनी नंतर मागे वळून पाहिलेच नाही आपल्या अविश्रांत कार्याच्या जोरावर एका सामान्य घरातील एक युवक पक्षाच्या कार्यात सक्रिय झाला स्वातंत्र्यवीर सावरकर वॉर्ड मधून नगरसेवक होत कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत एक वेगळी छाप या कार्यकर्त्याने आपल्या कार्याच्या जोरावर सोडली आणि मग 2009 ला डोंबिवली चे पहिले आमदार होण्याचा मान रवि दादांना मिळाला आणि मागील 04 टर्म सांस्कृतिक शहराचे सुसंस्कृत लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या शहराची मान महाराष्ट्रातच नाही तर देशात उंचावली.
कोकणी माणसं तशी जिद्दी आणि प्रेमळ असतात आणि रवि दादा ही तसेच संघटना,कार्यकर्ता यांच्या वर निस्सीम प्रेम करणारं नेतृत्व म्हणजे रवि दादा! कार्यकर्ता घडला पाहिजे म्हणजे संघटना मोठी होईल या करता सतत संपर्कात राहून संवाद साधणारं हे नेतृत्व पुढील काळात महाराष्ट्रात कार्यरत राहून संघटना वाढवणार आहे.
पक्षीय कार्यासोबत 2016 ते 2019 या काळात मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार मध्ये राज्यमंत्री म्हणून व मागील शिंदे फडणवीस सरकार मध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून दादांनी लोक सेवेचा नवा आयाम लोकांसमोर मांडला.अन्न,नागरी पुरवठा,ग्राहक संरक्षण मंत्री पदाच्या कारकिर्दीत ‘आनंदाचा शिधा’, ‘रेशन आपल्या दारी’ सारखे महत्त्वाचे उपक्रम राबवले.त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम पाहताना रविंद्र दादा चव्हाण यांनी महाराष्ट्रात पायाभूत सेवा-सुविधांची क्रांती घडवली.
मुंबई गोवा हायवेशी निगडीत केंद्र व राज्य शासनाचे विविध विभाग,स्थानिक लोकप्रतिनिधी,बाधित क्षेत्रातील संबंधित भूधारक,वित्तीय संस्था,कंत्राटदार यांच्याशी समन्वय साधून वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या या महामार्गाचे सर्वाधिक टप्पे विकसित करण्याचे मोठे कार्य केले.विशेष म्हणजे नॅशनल हायवे अथॉरिटीच्या अखत्यारीतील या हायवेचे काम पूर्णत्वास नेण्याकरिता लोकभावनेचा आदर करून जातीने लक्ष घातले.
स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून जवळपास ९२ हजार कोटींची रस्ते आणि पूलांची कामे करण्याची किमया रविंद्र चव्हाण यांनी घडवली. या काळात २३ हजार ८८६ किमी लांबीचे रस्ते आणि १ हजार ०५४ पूलांचे बांधकाम पूर्ण झाले असून २९ हजार ०४१ किमी लांबीचे रस्ते आणि १ हजार ७९७ पूलांचे बांधकाम प्रगतिपथावर आहेत.यासोबतच जवळपास ३४ हजार शासकीय इमारतींचे बांधकाम आणि नूतनीकरण केले,यात प्रामुख्याने न्यायालये,प्रशासकीय कार्यालये,शासकीय विश्रामगृहे इत्यादीचा समावेश आहे.
रस्ते,पूल,रेल्वे,मेट्रो,विमानतळ यांसारख्या २२ पायाभूत सुविधांच्या उभारणी आणि देखभालीसाठी रविंद्र दादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (MSIDC) स्थापन करण्यात आले.
हिंदुत्वादी कार्यकर्त्यांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे अयोध्येचे श्री राम मंदिर याच श्रीराम जन्मभूमी दर्शनासाठी महाराष्ट्रातून अयोध्येला जाणाऱ्या भाविकांसाठी शरयू नदीजवळ अंदाजे ९,५०० चौ.मी. क्षेत्रफळावर उभारण्यात येणाऱ्या १२ मजली अयोध्या महाराष्ट्र भक्त निवासाचे जमीन अधिग्रहण आणि भूमिपूजन रवि दादांच्या नेतृत्वातच झाले.काश्मीर सफरीवर जाणाऱ्या पर्यटकांच्या मोफत निवास सुविधेसाठी काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याचा निर्णय रविंद्र दादा चव्हाण यांनी घेतला.रवि दादांच्या कार्यकाळातच या भवनासाठी जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील इच्चगाम येथे जवळपास १०,११७ चौ. मी. जमीन खरेदी करण्यात आली,तसंच यासाठी ९ कोटी ३० लाख रुपयांची तरतूद देखील करण्यात आली.
महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थयात्रा असणारी अष्टविनायक यात्रा केवळ १ दिवसात करणं मंत्री चंद्रकांत पाटील आणि रवि दादांच्या प्रयत्नांनी शक्य झालं आहे. यासोबतच महाबळेश्वर तालुक्यातील श्री उत्तेश्वर मंदिर, कार्त्याचं श्री एकविरा आई मंदिर,खिद्रापूर येथील श्री कोपेश्वर मंदिर अशा अनेक मंदिरांचं जतन, संवर्धन आणि परिसर विकास करण्याचं काम त्यांनी केलं आहे.
रविंद्र दादा चव्हाण कट्टर सावरकरभक्त आहेत.मॉरिशस महाराष्ट्र मंडळाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुतळा स्थापन करण्यास मोलाचे सहकार्य केले. २०२३ साली या पुतळ्याचे अनावरण मॉरिशसच्या राष्ट्रपतींच्या हस्ते संपन्न झाले.तसेच गेली ११ वर्षे डोंबिवलीतील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान येथे स्वातंत्र्यवीर सावरकर अखंड ज्योत प्रज्वलित आहे.
मंत्री म्हणून रवि दादांनी अशी असंख्य कामे केली,जी येणाऱ्या काळात पूर्णत्वास गेल्यानंतर महाराष्ट्रवासियांचा प्रवास जलद,सुकर आणि आरामदायी होणार आहे.
या अश्या कर्तृत्वान आणि कृतिशील विचारांच्या नेतृत्वात भाजप महाराष्ट्र नक्कीच एक उंची गाठेल यात तिळमात्र ही शंका नाही..
आदरणीय साहेब आपणांस पुढील वाटचालीस खुप शुभेच्छा!!
-अक्षय जोशी
BJP Maharashtra Ravindra Chavan
#RavindraChavan4BJP
#BJP4ViksitBharat
#BJP4Maharashtra
#RavindraChavan
#AamchaRaviDada