डोंबिवली येथे ‘सर्व पक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समिती’चा मोर्चा काढण्यात आला. सरकारचा प्रतिनिधी म्हणून या समितीच्या विविध मागण्यांचे निवेदन स्वीकारून व जनतेशी संवाद साधला…
रायगड जिल्हातील विविध विकासकाम व समस्यांबाबत शासकीय अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या समवेत मंत्रालयीन दालनात बैठक घेतली गेली. सर्व आढावा घेऊन संबंधित महत्त्वाच्या सूचना दिल्या गेल्या.
नेरूळ-सीवूडस दारावे/बेलापूर-खारकोपर (पहिला टप्पा) नवीन लाईन आणि पनवेल-पेण विद्युतीकरणाच्या कामाचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री श्री. पियुष गोयल यांनी उद्घाटन केले. केंद्रीय मंत्री श्री. अनंत गीते, श्री. रामदास आठवले, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री श्री. विनोद तावडे यावेळी उपस्थित होते. बेलापूर/नेरूळ-खारकोपर विभागातील ईएमयू सेवा आणि वसई रोड-दिवा-पनवेल-पेण विभागातील मेमू सेवेला व्हीडिओ लिंकच्या मदतीने यावेळी हिरवे झेंडे […]
वेंगुर्ले येथील सुसज्ज मच्छीमार्केट पायाभरणी समारंभ संपन्न झाला, यावेळी पालकमंत्री दिपक केसरकर व इतर सर्व मान्यवर पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती लाभली… तसेच वेंगुर्ले नगरपरिषदेच्या श्री. छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाचे उद्घाटनही पार पडले. जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, नगरविकास प्रशासन अधिकारी संतोष झिरगे, माजी आमदार पुष्पसेन सावंत, राजन तेली, मुख्याधिकारी वैभव सापळे, नगराध्यक्ष दिलीप गिराप, उपनगराध्यक्षा सौ. अस्मिता […]
भारतीय जनता पार्टी उल्हासनगर येथे भव्य पक्ष प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी उपस्थित अनेक मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मोठ्या संख्येने अनेकांनी पक्षात प्रवेश केला.
अखंड भारताचे निर्माते, लोह पुरुष, भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४३ व्या जयंतीनिमित्त ‘राष्ट्रीय एकता दिवस’ साजरा केला गेला. या दिवसाचे औचित्य साधून कल्याण-डोंबिवली मध्ये आयोजित ‘रन फॉर युनिटी’ या दौड मध्ये अनेकांनी सहभाग घेतला. आमदार नरेंद्रजी पवार, आमदार गणपतजी गायकवाड व इतर मान्यवर, पदाधिकारी व हजारो नागरिक या दौड मध्ये सहभागी झाले.
किल्ले जंजिऱ्यावर आता कायमस्वरूपी राष्ट्रध्वज फडकणार.. या ऐतिहासिक कार्यक्रमात श्रीमंत छत्रपती खा. युवराज संभाजीराजे भोसले, श्रीमंत श्री. रघुजीराजे आंग्रे, श्रीमंत श्री. सत्येंद्रराजे दाभाडे सरकार, मा. आ. संजयजी केळकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचं भाग्य लाभलं !!!
सुभेदार वाडा कल्याण व रोटरी क्लब कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रा. डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे ‘विनासायास वेटलॉस व मधुमेह प्रतिबंध’ या व्याख्यानास उपस्थित सर्व मान्यवर मंडळी व जनसमुदाय यांच्यासोबत संवाद साधला व कार्यक्रमात सहभाग घेतला…
साईनगर मित्र मंडळ डोंबिवली पश्चिम आयोजित साई भंडारा, होमहवन दरम्यान उपस्थित सर्व भाविक आणि मित्रमंडळी समवेत…
रायगड जिल्हातील रोहा येथील ‘धावीर महाराज पालखी सोहळा’ संपन्न झाला… या पालखीदरम्यान सर्व भाविकांसमवेत दर्शन घेतले…