या अभियानांतर्गत देशाच्या ग्रामीण भागातील प्रत्येक घरात नळ कनेक्शनद्वारे मुबलक प्रमाणात स्वच्छ, सुरक्षित पिण्याचे पाणी पोहोचविले जात आहे. ✅पात्रता निकष 📄आवश्यक कागदपत्र 🌐 अधिकृत संकेतस्थळ https://jaljeevanmission.gov.in/ या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून आपल्याला या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करता येईल. तसेच आपल्या ग्रामपंचायतीत आणि कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मध्ये देखील या योजनेचा अर्ज भरता येईल.
लेक लाडकी योजनेंतर्गत राज्यातील गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलींना आर्थिक साहाय्य प्रदान करून त्यांचे शिक्षण व सक्षमीकरण सुनिश्चित केले जाते. 📌 मुख्य वैशिष्ट्ये: ✅ पात्रता निकष: ✅आवश्यक कागदपत्र : 📝 अर्ज प्रक्रिया :
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा व्यवसायात मदत करण्यासाठी बिनव्याजी कर्ज दिले जाते. लाभार्थी निकष आवश्यक कागदपत्र अधिक माहिती व अर्जासाठी संपर्क कराअर्ज प्रक्रियेबद्दल अधिक माहितीसाठी आणि आवश्यक कागदपत्रांची नोंदणी करण्यासाठी, तुम्ही तुमच्या स्थानिक स्व-मदत गट (SHG) किंवा अंगणवाडी केंद्राशी संपर्क साधा.
जागोजागी शेततळे निर्माण करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्न यांमध्ये वाढ करणे. लाभार्थी पात्रता १) शेतकऱ्यांकडे किमान ०.६० हेक्टर शेतजमीन असावी, कमाल मर्यादा नाही. २) लाभार्थी शेतकऱ्याची जमीन शेततळ्याकरिता तांत्रिकदृष्ट्या पात्र असावी, जेणेकरून पावसाचे वाहणारे पाणी शेततळ्यामध्ये भरणे अथवा पुनर्भरण करणे शक्य होईल. ३) यापूर्वी अर्जदारांनी शेततळे, सामुदायिक शेततळे अथवा भात खाचरासोबत तयार होणारी बोडी […]
माझी कन्या भाग्यश्री योजना ही मुलींच्या विकासासाठी आणि त्यांना समान संधी देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेमुळे मुलींना शिक्षण, आरोग्य आणि आर्थिक सुरक्षा मिळण्यास मदत होते. ✅ पात्रता निकष 📄 आवश्यक कागदपत्रे अधिक माहिती व अर्जासाठी संपर्क करा: आपल्या स्थानिक अंगणवाडी सेविका किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी (CDPO) यांच्याशी संपर्क साधा
नमो ड्रोन दीदी योजनेमध्ये महिला बचत गटांच्या मध्यमातून महिलांच्या उत्पन्नात १ लाख रुपयांपेक्षा जास्त वाढ करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. तसेच ड्रोन तंत्रज्ञानाच्या मदतीने आधुनिक शेतीला चालना दिली जाते. महिलांसाठी पात्रता – अर्जदार १८ वर्षांवरील महिला असावी – किमान दहावी उत्तीर्ण असावी – दीनदयाळ अंत्योदय योजनेंतर्गत नोंदणीकृत महिला बचत गटाची सदस्य असणे बंधनकारक आहे. कर्जाचे प्रमाण […]
कामानिमित्त देशातील दुसऱ्या राज्यात स्थलांतरित होणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना पूर्वी सार्वजनिक वितरण प्रणालीचा लाभ मिळत नव्हता, यामुळे गोरगरीब आणि मध्यमवर्गीय समाजाला येणाऱ्या समस्यांना या योजनेच्या माध्यमातून पूर्णविराम देण्यात आला. आता या योजनेचे लाभार्थी असलेल्या नागरिकांना आपल्या शिधापत्रिकेद्वारे देशातल्या कुठल्याही रेशन दुकानांवर लाभ घेता येतो. 📝 अर्ज कुठे करावा ? 📞 हेल्पलाईन क्रमांक – १४४४५
‘सर्वांसाठी घरे’ हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून देशातील प्रत्येक कुटुंबाला या योजनेअंतर्गत पक्की घरे बांधून दिली जातात, महिला, भारतीय समाजातील आर्थिकदृष्ट्या मागासलेले घटक आणि अनुसूचित जाती/जमाती या समाजघटकांना या योजनेत विशेष प्राधान्य दिले जाते. महाराष्ट्रात ‘म्हाडा’ च्या माध्यमातून ही योजना राबवली जाते. ✅ पात्रता निकष – अर्जदाराच्या कुटुंबात नवरा, बायको आणि अविवाहित मुले यांचा समावेश असेल, […]
देशातील शहरी भागात स्वच्छतेचे महत्त्व रुजवण्यासाठी मोदी सरकारने स्वच्छ भारत (शहरी) अभियान हाती घेतले आहे. या अभियानांतर्गत शहरी भागात सार्वजनिक सामुदायिक शौचालये बांधली जातात आणि स्वच्छताविषयक इतर उपक्रम राबवले जातात ✅पात्रता निकष 📄 आवश्यक कागदपत्र 📝 sbm.gov.in या अधिकृत वेबसाईटवर लॉगइन करून तुम्ही या अभियानात सामील होण्यासाठी अर्ज करू शकता.
महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना ही राज्य शासनाची एक आर्थिक मदतीची योजना आहे, ज्यामध्ये पात्र विधवा महिलांना दरमहा निश्चित रक्कम पेन्शन दिली जाते, जेणेकरून त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम बनून सन्मानाने जीवन जगू शकतील. ✅ लाभार्थी पात्रता – अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी – अर्जदार महिलेचे वय १८ ते ६५ वर्षांदरम्यान असावे – अर्जदार महिलेचे वार्षिक उत्पन्न […]