देशाच्या ग्रामीण भागात हागणदारीमुक्त गावांची संख्या (ODF Villages) वाढवणे, तसेच घन कचरा व स्वच्छतेचं योग्य व्यवस्थापन करणे हा या अभियानाचा उद्देश आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या दूरदृष्टीतून सुरु झालेल्या या अभियानात देशवासियांनी हिरीरीने सहभाग घेतला. ✅या योजनेअंतर्गत वैयक्तिक शौचालय उभारणीसाठी अनुदानास पात्र कुटुंबं 📄 आवश्यक कागदपत्र 📝 https://sbmurban.org/ या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून आपण अनुदानासाठी अर्ज […]
या योजनेअंतर्गत १८ ते ४० या वयोगटातील नागरिकांना वृद्धावस्थेसाठी आर्थिक सुरक्षा पुरवण्यात येणार आहे. या योजनेत असंघटित क्षेत्रातील मजुरांचा समावेश देखील करून घेण्यात आल्यामुळे त्यांना देखील पेन्शन मिळणार आहे. ✅ पात्रता निकष 📄 आवश्यक कागदपत्रे 📝 अर्ज कुठे करावा ? जवळच्या बँक शाखेत जाऊन किंवा विमा एजंटशी संपर्क साधून या योजनेसाठी अर्ज करू शकता. https://www.jansuraksha.gov.in/ […]
बाल मृत्युदरात घट आणि गरोदर मातेच्या आरोग्याची काळजी घेणे या उद्देशाने राज्यातील शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा शासकीय रुग्णालयात गरोदरपणी नाव नोंदणी करणाऱ्या व त्याठिकाणी प्रसूती होणाऱ्या महिलांना पहिल्या प्रसूतीच्या वेळी नवजात बालकाकरिता (मुलगा किंवा मुलगी) २ हजार रुपयांपर्यंत बेबी केअर किट बॅग मोफत उपलब्ध करून दिली जाते.
या अभियानांतर्गत देशाच्या ग्रामीण भागातील प्रत्येक घरात नळ कनेक्शनद्वारे मुबलक प्रमाणात स्वच्छ, सुरक्षित पिण्याचे पाणी पोहोचविले जात आहे. ✅पात्रता निकष 📄आवश्यक कागदपत्र 🌐 अधिकृत संकेतस्थळ https://jaljeevanmission.gov.in/ या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून आपल्याला या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करता येईल. तसेच आपल्या ग्रामपंचायतीत आणि कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मध्ये देखील या योजनेचा अर्ज भरता येईल.
लेक लाडकी योजनेंतर्गत राज्यातील गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलींना आर्थिक साहाय्य प्रदान करून त्यांचे शिक्षण व सक्षमीकरण सुनिश्चित केले जाते. 📌 मुख्य वैशिष्ट्ये: ✅ पात्रता निकष: ✅आवश्यक कागदपत्र : 📝 अर्ज प्रक्रिया :
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा व्यवसायात मदत करण्यासाठी बिनव्याजी कर्ज दिले जाते. लाभार्थी निकष आवश्यक कागदपत्र अधिक माहिती व अर्जासाठी संपर्क कराअर्ज प्रक्रियेबद्दल अधिक माहितीसाठी आणि आवश्यक कागदपत्रांची नोंदणी करण्यासाठी, तुम्ही तुमच्या स्थानिक स्व-मदत गट (SHG) किंवा अंगणवाडी केंद्राशी संपर्क साधा.
जागोजागी शेततळे निर्माण करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्न यांमध्ये वाढ करणे. लाभार्थी पात्रता १) शेतकऱ्यांकडे किमान ०.६० हेक्टर शेतजमीन असावी, कमाल मर्यादा नाही. २) लाभार्थी शेतकऱ्याची जमीन शेततळ्याकरिता तांत्रिकदृष्ट्या पात्र असावी, जेणेकरून पावसाचे वाहणारे पाणी शेततळ्यामध्ये भरणे अथवा पुनर्भरण करणे शक्य होईल. ३) यापूर्वी अर्जदारांनी शेततळे, सामुदायिक शेततळे अथवा भात खाचरासोबत तयार होणारी बोडी […]
माझी कन्या भाग्यश्री योजना ही मुलींच्या विकासासाठी आणि त्यांना समान संधी देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेमुळे मुलींना शिक्षण, आरोग्य आणि आर्थिक सुरक्षा मिळण्यास मदत होते. ✅ पात्रता निकष 📄 आवश्यक कागदपत्रे अधिक माहिती व अर्जासाठी संपर्क करा: आपल्या स्थानिक अंगणवाडी सेविका किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी (CDPO) यांच्याशी संपर्क साधा
नमो ड्रोन दीदी योजनेमध्ये महिला बचत गटांच्या मध्यमातून महिलांच्या उत्पन्नात १ लाख रुपयांपेक्षा जास्त वाढ करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. तसेच ड्रोन तंत्रज्ञानाच्या मदतीने आधुनिक शेतीला चालना दिली जाते. महिलांसाठी पात्रता – अर्जदार १८ वर्षांवरील महिला असावी – किमान दहावी उत्तीर्ण असावी – दीनदयाळ अंत्योदय योजनेंतर्गत नोंदणीकृत महिला बचत गटाची सदस्य असणे बंधनकारक आहे. कर्जाचे प्रमाण […]
कामानिमित्त देशातील दुसऱ्या राज्यात स्थलांतरित होणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना पूर्वी सार्वजनिक वितरण प्रणालीचा लाभ मिळत नव्हता, यामुळे गोरगरीब आणि मध्यमवर्गीय समाजाला येणाऱ्या समस्यांना या योजनेच्या माध्यमातून पूर्णविराम देण्यात आला. आता या योजनेचे लाभार्थी असलेल्या नागरिकांना आपल्या शिधापत्रिकेद्वारे देशातल्या कुठल्याही रेशन दुकानांवर लाभ घेता येतो. 📝 अर्ज कुठे करावा ? 📞 हेल्पलाईन क्रमांक – १४४४५