आगरी कोळी प्रतिष्ठान आयोजित ‘आगरी कोळी महोत्सव २०१९’ या कार्यक्रमाला हजेरी लावली. हा कार्यक्रम डोंबिवलीमध्ये सुरु असून यावेळी सहकाऱ्यांसमवेत या कार्यक्रमाला भेट दिली व आगरी-कोळी बांधवांशी संवाद साधला.
रामदासस्वामी संस्थान सज्जनगड, यांचे पादुकादर्शन प्रचार दौरा व भिक्षा फेरी डोंबिवली येथील बोडस मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी दर्शन घेऊन शुभ आशीर्वाद घेतले.
*उद्घाटन सोहळा* महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. रेखा राजन चौधरी, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण यांच्या नवीन सभापती कार्यालयांचा उद्घाटन सोहळा कल्याण डोंबिवली महानगरपालिका, नवीन इमारत, तळमजला शंकरराव चौक, कल्याण (प.) येथे संपन्न झाला. याप्रसंगी आमदार नरेंद्र पवार, उपमहापौर उपेक्षा भोईर, नगरसेवक संदीप पुराणिक, विनोद काळण, मंदार टावरे, राजन चौधरी, संदीप सिंग, नंदूजी जोशी, वरूण […]
तीर्थक्षेत्र श्री पिंपळेश्वर मंदिर, श्री पिंपळेश्वर महादेव भक्त मंडळ आयोजित एस.एस. सी. मार्गदर्शन व्याख्यानमालेसाठी उपस्थित सर्व मान्यवर व्याख्याते, शिक्षकवर्ग आणि सर्व विद्यार्थी मित्रांशी संवाद साधतांना…
नगरसेवक महेश बाबुराव पाटील यांच्या वार्ड क्र. 82 मधील काँक्रीटीकरण विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर व पदाधिकारी..
भारतीय जनता पार्टी मध्ये ठाकुरवाडी (जुनी डोंबिवली) प्रभाग क्रमांक 54 मधील तरुण तडफदार नेतृत्व श्री. कृष्णा बाळाराम पाटील. यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश झाला. श्री. कृष्णा बाळाराम पाटील यांची भारतीय जनता युवा मोर्चा डोंबिवली पश्चिम मंडल सरचिटणीस पदी निवड केली. कृष्णा पाटील आणि त्यांचे सहकारी यांचे भारतीय जनता पार्टी मध्ये हार्दिक […]
भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्व. अटलबिहारी बाजपेयीजी यांच्या जयंतीनिमित्त ठाणे येथे आयोजित भव्य रक्तदान शिबिरासाठी उपस्थित सर्व मान्यवर, आयोजक आणि सर्व रक्तदात्यांसोबत सहभाग व संवाद!!!
सिडकोची घरे आणि प्लॉटस, जे पूर्वी लीज तत्त्वावर दिले जायचे, ते आता फ्रीहोल्ड करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असून, त्यामुळे आता ही घरे लोकांच्या स्वत:च्या मालकीची होतील. नवी मुंबई, औरंगाबाद आणि नाशिक परिसरातील लोकप्रतिनिधींनी या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन अभिनंदन केले. #BigDecision
भारतीय जनता पार्टी, ठाणे खोपट येथील ‘जेष्ट नागरिक कट्टा व मोफत वृत्तपत्र वाचनालय’चे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटनप्रसंगी आमदार संजयजी केळकर, आमदार निरंजनजी डावखरे, संदीप लेले, कृष्णा पाटील, शिवाजी पाटील, प्रकाश राऊळ, नगरसेवक, सर्व मान्यवर पदाधिकारी व समस्त कार्यकर्ते उपस्थित होते.
शिक्षण समिती सभापती विश्वदिप पवार, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण यांच्या नवीन सभापती कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पार पडला. हा कार्यक्रम कल्याण डोंबिवली महानगरपालिका, शिक्षण विभाग कार्यालय, मुख्य इमारत, तळ मजला शंकरराव चौक, कल्याण (प.) येथे संपन्न झाला. या उद्घाटन प्रसंगी आमदार नरेंद्र पवार, उपमहापौर उपेक्षा भोईर, नगरसेवक राजन आभळे, संदीप पुराणिक विनोद काळणं, मंदार टावरे, राजन […]