स्टार कॉलनी येथील गणेशनगर प्रभागातील नागरिकांना कमी दाबाने होणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येचे निराकरण होण्यासाठी नवीन जलवाहिनीच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी नगरसेविका सुनीताताई पाटील, बाळू पाटील, मोहन पाटील, संजय विचारे, मनीषा राणे, कार्यकर्ते व त्या भागातील रहिवासी मोठया प्रमाणत उपस्थित होते..
रायगड जिल्हा दौऱ्या दरम्यान खोपोली येथे बांधण्यात येणाऱ्या मराठा भवनाचे भूमिपूजन करण्यात आले. या प्रसंगी आमदार प्रशांतजी ठाकूर, आमदार सुरेशजी लाड, बाळासाहेब पाटील, विनोदजी साबळे, मोरेश्वरजी घारे व इतर मान्यवर उपस्थित होते.
रायगड जिल्हा दौऱ्या दरम्यान अलिबाग येथील मेदेखार गावात आयोजित ‘कार्यकर्ता’ मेळाव्यात उपस्थित मान्यवर, पदाधिकारी व ग्रामस्थांशी सवांद साधला.
रायगड जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सुधागड तालुक्यातील ताडगांव खेमवाडी घोडगांव रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. या प्रसंगी राजेंद्रजी राऊत, सतीशजी धारप, सुनीलजी दांडेकर, रविशेठ पाटील, राजेश मापरा इतर मान्यवर पदाधिकारी, ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते..
महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत माणगांव भेलीव रस्त्यावर कि.मी. १/९०० मध्ये लहान पुलाचे बांधकाम ग्रा.मा.-१० ता सुधागड, जि. रायगड या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी रविशेठ पाटील, वैकुंठ पाटील, राजेंद्र राऊत, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
रायगड जिल्हा दौऱ्या दरम्यान मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून भैरव फाटा ते कुंभारघर रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. या भूमिपूजनाप्रसंगी अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
J.N.P.T. उरण यांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले शिवसमर्थ स्मारकाचे उद्घाटन आदरणीय श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, केंद्रीय मंत्री श्री. नितीनजी गडकरी, केंद्रीय मंत्री श्री. अनंतजी गीते, आमदार श्री. प्रशांतजी ठाकूर, श्री. महेशजी बालदी व इतर मान्यवर उपस्थित होते.
शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली! काश्मिरमधील पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी निळजे गाव येथे सभा आयोजित करण्यात आली होती. प्रसंगी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
भावपूर्ण श्रद्धांजली! काश्मिरमधील पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी भारतीय जनता पार्टी, डोंबिवली पूर्व व पश्चिम मंडळाच्या वतीने भारतीय जनता पार्टी पूर्व मंडळ कार्यालय, ध्वजस्तंभाजवळ, नव डोंबिवली सोसायटी, डोंबिवली पूर्व येथे सभा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी व स्थानिक उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टी चिपळूण संगमेश्वर विधानसभा सावर्डे येथे पक्ष कार्यालयाचे उद्घाटन व पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. याप्रसंगी विनयजी नातू, तुषार खेतल, सचिन व्हाळकर, अनंत चव्हाण, शशिकांत चव्हाण, नीलमताई गोंधळे, मुन्ना चवनडें, उमेश कुळकर्णी, सतीश शेवडे, संतोष शिंदे, कार्यकर्ते पदाधिकारी इतर मान्यवर उपस्थित होते.