टावरेपाडा रस्त्यांचे कॉक्रीटीकरण व ६ इंचाची नवीन जलवाहिनी टाकण्याच्या कामाचे भूमिपूजन प्रसंगी नगरसेवक मंदार टावरे, नगरसेवक विशु पेडणेकर, त्या विभागातील नागरिक उपस्थित होते.
रत्नागिरी जिल्हा दौऱ्या दरम्यान चिपळूण येथील बिबली गावातील गवळीवाडी येथे तुषार खेतल यांच्या स्वखर्चातून बांधण्यात येणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी विनयजी नातू ,खेराडे ताई, सचिन व्हाळकर, तुषार खेतल,ग्रामस्त व इतर मान्यवर उपस्थित होते.
गुलाबप्रेमींसाठी एक खुशखबर…! गुलाबप्रेमींसाठी खास ‘राज्यस्तरीय गुलाब पुष्प प्रदर्शना’ चे आयोजन डोंबिवलीत करण्यात आले आहे. गुलाबाच्या फुलाची नजाकत काही औरच असते. त्यांचे मनमोहक रूप, आकर्षक रंग, ताजा टवटवीत डौलदारपणा आणि सर्वात महत्त्वाची त्याची अतुलनीय अशी रोमँटिक व्हॅल्यू आबालवृद्धांच्या मनाला नक्कीच साद घालते. विविध गुलाब पुष्पांप्रमाणेच यावेळी बोन्साय व अनोखे स्टॅम्पस् सुद्धा या प्रदर्शनात पाहावयास मिळणार […]
महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी व्यस्थापन यंत्रणा (आत्मा) ठाणे पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ठाणे जिल्हा कृषी महोत्सव २०१९’ चे उद्घाटन संपन्न झाले. या प्रसंगी महापौर सौ. वनिता राणे, कृषी अधिकारी श्री. विकास पाटील, शेतकरी बांधव व इतर मान्यवर उपस्थित होते..
कल्याण-अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (कामा) डायमंड जुबिली सेलिब्रेशन या कार्यक्रमात उपस्थित मान्यवर व संस्थेच्या पदाधिकारी समवेत सवांद साधताना..
‘आई गिरीजामाता गावदेवी चषक २०१९’ डोंबिवली पश्चिम येथे आयोजित करण्यात आले होते. त्या उद्घाटन प्रसंगी कृष्णा पाटील, रामदास पाटील, खेळाडू व इतर मान्यवर उपस्थित होते..
‘महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन’ या बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यातील नागरी सहकारी व जिल्हा बँकांना पुरस्कार देण्यात आले. सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. आ. जयंतराव पाटील, बँक्स असोसिएशनच्या कार्याध्यक्ष सुप्रियाताई पाटील, सीईओ स्वाती पांडे व पुरस्कारप्राप्त बँकर्स यांच्यासोबत संवाद साधला.
महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेचा ६वा वर्धापन दिन नुकताच पार पडला. या ६व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. रावसाहेब दानवे तसेच इतर मान्यवरांसोबत संवाद साधला..
महागिरी कोळीवाडा कोळी उत्सव मंडळ ठाणे अजय मोरेश्वर पाटील आयोजित ‘कोळी महोत्सव’ला सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी संदीपजी लेले, संजयजी वाघुले, जयेंद्रजी कोळी, अजयजी कोळी, इतर मान्यवर उपस्थित होते.
डोंबिवली जिमखाना आयोजित ‘जिल्हास्तरीय स्विमिंग स्पर्धा २०१९’ चे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. विश्वास पुराणिक, दिलीप भोईर, स्पर्धक व इतर मान्यवर उपस्थित होते.