दि. 11 ते 13 नोव्हेबर 2018 रोजी लातूर येथे झालेल्या 16 वी राज्यस्तरीय सब ज्युनिअर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत ठाणे जिल्हा संघ उपविजयी झाल्याबद्दल सर्व खेळाडूचे अभिनंदन व पुढील स्पर्धेकरिता हार्दिक शुभेच्छा. बक्षीस समारंभाप्रसंगी परीक्षक मान्यवर व खेळाडू उपस्थित होते.
‘कच्छ युवक संघ, डोंबिवली’ तर्फे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या आयोजित रक्तदान शिबिरात मान्यवरांसोबत संवाद साधला गेला.
तिरुपती तिरुमला देवस्थान (टी.टी.डी.) आणि ओम श्री साई धाम ट्रस्ट (विरार) आयोजित केलेला ‘श्रीनिवास मंगल महोत्सव’ हा ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथे संपन्न झाला. श्रीनिवास मंगल महोत्सवात पूजेच्या वेळी अनेक मान्यवर आणि भक्तवर्गाची गर्दी जमली होती.
आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘CM चषक’ या देशातील सर्वात मोठा क्रीडा व कला मोहत्सवाचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या जल्लोषात होत आहे. डोंबिवली मधील नेहरु मैदान येथे ‘शेतकरी सन्मान कब्बडी’ स्पर्धेने या चषकाचा शुभारंभ करण्यात आला. विविध शाळा, महाविद्यालय तसेच क्रीडा मंडळातुन हजारो स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला. यावेळी महाराष्ट्राचे राज्यमंत्री ना. श्री. रविंद्रजी […]
तिरुपती तिरुमला देवस्थान (टी.टी.डी.) आणि ओम श्री साई धाम ट्रस्ट (विरार) यांच्यातर्फे ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथे ‘श्रीनिवास मंगल महोत्सव’ साजरा करण्यात आला. ‘श्रीनिवास मंगल महोत्सवा’च्या शुभप्रहरी मूर्तीपूजनाच्या आणि तोमाला सेवेच्या वेळी उपस्थित सर्व मान्यवर, भक्तगणांसोबत दर्शन घेतले…
खंबाळपाडा येथे स्वर्गीय शिवाजी दादा शेलार क्रीडांगणावर ‘शिवाजीदादा शेलार चषक’ सामन्याचे उदघाट्न करण्यात आले. याठिकाणी चार दिवसीय ओव्हरआर्म क्रिकेटचे सामने रंगले. यावेळी स्थानिक नगरसेवक साई शेलार, शिल्पा वहिनी शेलार तसेच राजू शेख व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टी ठाणे आयोजित ‘CM चषक’ क्रीडा स्पर्धा चे KBP डिग्री कॉलेज वागळे इस्टेट – ठाणे येथे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उद्घाटन प्रसंगी आमदार संजयजी केळकर, संदीप लेले, सचिन मोरे, कार्यकर्ते, पदाधिकारी व स्पर्धक उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टी ‘CM चषक क्रीडा स्पर्धा व कला बक्षीस समारंभ’ CKT कॉलेज मध्ये आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी राम सेठजी ठाकूर, आमदार प्रशांतजी ठाकूर, महापौर, उपमहापौर, कार्यकर्ते व स्पर्धक उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टी कोकण विभाग रायगड लोकसभा मतदार संघ पदाधिकारी व आढावा बैठक महाड येथें घेण्यात आली. तेव्हा सर्व विषयांवर चर्चा करण्यात आली.
गुरुनानक जयंतीनिमित्त उल्हासनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या शोभायात्रेत सर्व शीख बांधवांसमवेत सहभाग घेतला व दर्शन केले.