आज भारतामध्ये तरुणांना स्वत:चे उद्योग उभारता यावेत यासाठी अनुकूल वातावरण निर्माण होण्याची आवश्यकता आहे. याकरिता आपण घेऊन येत आहोत एक नाविन्यपूर्ण उपक्रम ‘श्रीगणेशा स्वयंरोजगाराचा’. या उपक्रमातून तरुणांना रोजगार-स्वयंरोजगाराच्या संधी कशा प्राप्त होऊ शकतील या दृष्टीने काही महत्त्वाची ठोस पावले उचलणार आहोत. मा. प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदीजी व मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीसजी यांच्यामुळे आज महाराष्ट्रात […]
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी सरकारने खुशखबर दिली आहे!! मुंबई-पुणे द्रूतगती आणि कोल्हापूरमार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमधून सूट देण्यात आली आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात पुणे व कोल्हापूरमार्गे जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना मुंबईतून जाण्यासाठी १० ते १३ सप्टेंबर तसेच त्याच वाहनांना गणेश विसर्जनानंतर परतण्यासाठी २३ सप्टेंबरपर्यंत या रस्त्यावर लागणाऱ्या टोलमधून सवलत देण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही सवलत एसटी बसनाही […]
डोंबिवली पूर्व येथील छेडा रोडवरील जलाराम कृपा या इमारतीला शॉट सर्किटमुळे आग लागली, सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला तसेच लवकरात लवकर काम पूर्ण करत वीज पूर्ववत करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. प्रसंगी स्थानिक नगरसेवक संदीपजी पुराणिक तसेच नगरसेवक राजनजी आभाळे हे उपस्थित होते.
ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज. जी. समुह रुग्णालये, मुंबई येथे रुग्ण सेवा तसेच विद्यार्थी यांच्यासाठी विविध नविन उपक्रम सुरु करण्यात आले.त्यांचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला : रक्तघटक विलगीकरण केंद्र (Blood component separation Unit), रक्तपेढी विभाग – लिथोट्रिप्सी विभाग, (Urology) दिव्यांग रुग्णांसाठी वेगळा बाह्य रुग्ण विभाग रुग्णालयाचा नवीन वातानुकूलीत औषध वितरण केंद्र रुग्णालयाचे […]
योग विद्या गुरुकुल, नाशिक संचलित, योग विद्या धाम, डोंबिवली आयोजित ‘षट चक्र ध्यान साधना’ योग गुरु व शिबीरात सहभागी इतर सर्व योगसाधकांशी संवाद.
आज शहापूर येथे अनुसूचित जनजाती प्रकल्प (भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र ) अंतर्गत ‘शहापूर विधानसभा आदिवासी कार्यकर्ता मेळावा’ आयोजित करण्यात आला होता, त्याप्रसंगी उपस्थित मान्यवर, पदाधिकारी व सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना…
कोकणातील प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी! गणपतीत कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी १८ विशेष गाड्या मध्यरेल्वेने उपलब्ध करून दिल्या आहेत. #Konkan #GaneshChaturthi
मुंबई गोवा महामार्ग पाहणी दौरा दरम्यान ज्येष्ठ नेते व महसूल, मदत व पुनर्वसन मंत्री ना. श्री. चंद्रकांतजी दादा पाटील यांच्यासमवेत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करतांना…
भाजपा चे ज्येष्ठ नेते व आमचे सहकारी मित्र कै. शिवाजी शेलार यांच्या जयंतीनिमित्त खंबालपाडा विभागात नगरसेवक श्री साई शेलार यांच्या प्रयत्नाने केडीएमसी ची बससेवा आज सुरु केली. या बससेवेच्या उदघाटन प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर, भाजपा पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते.
रत्नागिरी शहरातील विकासकांमासाठी भाजपाच्या माध्यमातून वैशिष्ट्यपूर्ण निधी दिला त्याबद्दल नगरसेवक राजू तोडणकर,प्रदेश कार्यकारणी सदस्य सचिन वहाळकर, नगरसेवक मुन्ना चंवडे, उमेश कुळकर्णी, अण्णा करमरकर या सर्वांनी विकासकामांचा आढावा म्हणून सदिच्छा भेट घेतली.