आज डीआरएम च्या कार्यालयात झालेल्या बैठकीत रेल्वे विषयक विविध समस्यांचा पाठपुरावा करून त्या सुविधा लवकरात लवकर पूर्ण कराव्यात यासाठी निवेदन दिले. त्याप्रसंगी सोबत आमदार प्रशांतजी ठाकूर व इतर मान्यवर…
महाराष्ट्र माळी समाज महासंघ, डोंबिवली आयोजित कार्यक्रमात सर्व माळी समाज बांधवांशी संवाद… गुणगौरव सोहळ्यात सहभाग…
प्रोबेशनरी ऑफिसर (PO) [PGDBF] शैक्षणिक पात्रता – पदवीधर वयोमर्यादा – १ ऑगस्ट २०१८ रोजी २० ते ३० वर्षे इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत परीक्षा आणि प्रवेशपत्र – पूर्व परीक्षा प्रवेशपत्र – २४ सप्टेंबर २०१८ पूर्व परीक्षा – ६ ऑक्टोबर २०१८ मुख्य परीक्षा प्रवेशपत्र – २२ ऑक्टोबर २०१८ […]
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या ‘नागरी सेवा परीक्षा’ देणाऱ्यांसाठी राज्य प्रशासकीय व्यवसाय प्रशिक्षण केंद्रामार्फत ११ महिने पूर्णवेळ विनामूल्य परीक्षा पूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी प्रवेश मिळविण्याकरिता मुंबई केंद्रामार्फत ४ नोव्हेंबर २०१८ रोजी प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार असून संस्थेमार्फत www.siac.org.in या संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज […]
१९६६च्या महाराष्ट्र चित्रपट नियमानुसार कलम १२१ मध्ये सांगितल्याप्रमाणे मल्टिप्लेक्समध्ये खाद्यपदार्थ नेण्यास बंदी नाही. लोकांना असे करण्यापासून रोखण्याचा अधिकार कोणत्याही मालकाला नाही. आम्ही त्याबद्दल अगदी स्पष्ट आहोत. मी विधानसभेत माझ्या प्रतिसादात हे स्पष्ट केले आणि मी अजूनही माझा निर्णय कायम ठेवत आहे. ‘मुंबई मिरर’ वर्तमानपत्रातील याविषयावर आज (१० ऑगस्ट २०१८) रोजी आलेली माझी मुलाखत : https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/cover-story/multiplex-owners-are-misleading-moviegoers/articleshow/65345642.cms https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/cover-story/the-big-screen-fleece/articleshow/65380000.cms
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक केंद्राचे उद्घाटन व प्राथमिक सामंजस्य करार आदान प्रदान समारंभ येथील सह्याद्री अतिथीगृहात आज झाला. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री गिरीष महाजन, पश्चिम ऑस्ट्रेलियाचे पर्यटनमंत्री श्री पॉल पॅपेलीया, कुलगुरू डॉ. श्री दिलीप म्हैसेकर आणि मी यावेळी उपस्थित होतो. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या या नव्या विभागाच्या संकेतस्थळाचे लोकार्पण सुद्धा यावेळी […]
उत्तर काश्मिरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमध्ये भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात केलेल्या मोठ्या कारवाईत महाराष्ट्राचे सुपुत्र मेजर कौस्तुभ प्रकाश राणे यांना वीरमरण आलं. मीरा रोडच्या शीतल नगर येथील हिरल सागर इमारतीत राणे कुटुंब राहतं. ते मूळचे कोकणातल्या वैभववाडीचे आहेत. यंदा कौस्तुभ यांना सेना पदकाने सन्मानित करण्यात आले होते. मेजर कौस्तुभ प्रकाश राणे यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या […]
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील औरस येथील श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट, कासल च्या इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग आयोजित समारंभात उपस्थित प्राचार्य विद्यार्थी व इतर मान्यवरांशी सुसंवाद…
सिंधुदुर्ग जिल्हा दौरा औरस येथील ग्रामपंचायत विकास कामांबाबत प्रमुख पदाधिकारी व ग्रामपंचायतमधील सदस्यांसोबत बैठक घेऊन आढावा घेतला.
आमचे सहकारी मित्र व पनवेलचे आमदार श्री.प्रशांतजी ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मोफत महाआरोग्य शिबिराच्या उदघाटन प्रसंगी मान्यवरांसोबत